फुसके बार – ११ फेब्रुवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 10 February, 2016 - 14:53

फुसके बार – ११ फेब्रुवारी २०१६
.

१) शाळेतअसताना मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा बराच गाजला होता.

सिनेमा पाहिल्यावर ब-याच दिवसांनी मधल्या सुटीत डबा खात असताना त्या सिनेमाचा पुन्हा विषय निघाला.

एकाने शंका विचारली, सिनेमाच्या नावाचा अर्थ काय रे? तेव्हापासूनच हिंदी हे थोडे वेगळे प्रकरण आहे, हे कळू लागकेले होते. सर्वांनाच प्रश्न पडला. खरेच की! अर्थ काय?

बराच वेळ वेगवेगळे अर्थ काढून झाल्यावर; आता ते फारसे आठवत नाहीत; शेवटी एकमत झालेला अर्थ म्हणजे मुकद्दर नावाचे गाव असणार आणि तो सिकंदर तिथला असणार, म्हणून हे नाव. अखेर अर्थ 'कळल्याचा' सर्वांना झालेला आनंदही आठवतो.

बरे झाले सिनेमा पाहिल्यावर त्यावर परीक्षा घेत नाहीत ते!

२) मुंबईला आमच्या युडीसीटीच्या वार्षिक महोत्सवात मुळचा दक्षिण भारतीय पण जन्माने मुंबईकर असलेला एक विद्यार्थी सुरेश वाडकरांनी गायलेले 'विठ्ठल आवडी प्रेमभावो' हे गाणे अगदी तल्लीन होऊन गात होता.
सगळे इतके सभ्य की 'विठ्ठल नामाचा रे टाहो' ही ओळ तो 'विठ्ठल नामाचा रेटा हो' अशी म्हणत होता, तरी कोणी त्याला हसले नाही.....सगळे म्हणजे ज्यांच्या लक्षात आले त्यांच्यापैकी.

३) गाताना ‘गाण्यात’ लक्ष नसेल व त्यातही शब्दांकडे नसेल तर कधीकधी घोटाळा होतो.
अलीकडेच एका कार्यक्रमात ऐकलेले शब्द

बेकरार कर के हमें यूं न जाईये
आप को हमारी कसम लौट जाईये

४) दोन लाखावरच्या सोनेखरेदीसाठी ग्राहकाचा पॅन अनिवार्य

सरकारने हा नियम काय आणला आणि देशभरातल्या सुवर्णकारांच्या पोटात दुखू लागले. ते चक्क एका दिवसाच्या संपावर गेलेत. खरे तर त्यांना बेमुदत संपावर जाऊ दे. कोणाचे अधिक नुकसान होते पाहू. पुण्यात जकातचोरीचे धंदे करणारा यांच्या संघटनेचा अध्यक्ष होतो. मराठमोळ्या परंपरेचा दावा करणारा दुसरा एकजण थेट गुन्हेगार सलमानला जाहिरातीत घेतो. हे सगळे कोणत्या सुत्रात बांधले गेलेले आहेत हे वेगळे सांगायला हवे का?

५) आधी हैद्राबाद केन्द्रीय विद्यापीठामध्ये डॉ. आंबेडकरांचे नाव घेतलेल्या संघटनेला याकूब मेमनसारख्या देशद्रोह्याचा पुळका आला होता व फाशीच नको या मानवतावादी ‘बुरख्याच्या’ आड आंदोलन केले होते. उद्या फाशीची शिक्षा रद्द झाली तरी दहशतवादासारख्या गुन्ह्यासाठीही ती रद्द होईल व आपली जनता तसे होऊ देईल असे कोणाला वाटते का? शिवाय दहशतवाद हे अघोषित युद्धच असते. आता युद्धातल्या शत्रुलाही मारू नये असे कोणाचे म्हणणे असेल तर काय बोलणार? तेव्हा हे झाले याकूबचे सहानुभूतीदार.

आता २००१च्या संसदेवरील हल्ल्याच्या निमित्ताने अफझल गुरूला दिलेली शिक्षा कशी चुकीची होती हे सांगणारी फिल्म जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) काल दाखवली जायची होती. त्याविरूद्ध अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असता प्रशासनाने ही फिल्म दाखवण्याचा कार्यक्रम रहित केला. तर मुळात हा कार्यक्रम आयोजित करणा-या विद्यार्थ्यांची अफझलला शहीद म्हणण्यापर्यंत आणि आझाद काश्मीरचे नारे देण्यापर्यंत मजल गेली.

या सगळ्या प्रकाराविरूद्ध अभाविपने आवाज उठवला. हो, तीच अभाविप, जिने डॉ. आंबेडकरांचे नाव धारण करत हैद्राबाद विद्यापीठात देशद्रोह्याची भलावण करणा-या राजकीय संघटनेचा राजकीय विरोध केला. दिल्लीतही या देशद्रोही प्रकाराचा विरोध करण्यात एनएसयुआय ही पप्पूची संघटना कोठेही दिसली नाही. कोठे अधिवेशन असेल तर ते सोडून तिथली वेश्यावस्ती शोधणा-या कार्यकर्त्यांची संघटना म्हणून आपल्याला एनएसयुआय माहित आहे. कोणी देशद्रोह करत असेल तर ते समजण्याचीही पप्पूच्या संघटनेची लायकी नाही. तेव्हा पुढच्यावेळी पप्पू जेव्हा त्याचे तोंड उघडेल तेव्हा त्याच्या थोबाडावर हे वास्तव फेकले पाहिजे. स्वत:च्या या संघटनेचा किंवा पक्षाचा नेभळटपणा लपवण्यासाठी पप्पूने आज केरळमध्ये मोदींवर हिंदू व मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा आरोप केला आहे. हे गंभीरपणे घेऊन पप्पूला आता त्याची खरी जागा दाखवलीच पाहिजे, कारण असा गंभीर आरोप करण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे.

आताही तथाकथित पुरोगामी हे अफजल गुरूवरील ही फिल्म दाखवण्याच्या जेएनयुमधल्या या प्रयत्नाला अभिव्यक्तीस्वातंत्र्यच म्हणतील यात शंका नाही. तेथे आझाद काश्मीरचे नारे देणा-यांच्या बाजुने कोण बोलते व त्यांची भलावण कोण करते आहे याकडे लक्ष ठेवुया. मला नथुरामबद्दल जराही घेणेदेणे नाही, पण त्याचा उल्लेख करणा-यांनाही हे तथाकथित पुरोगामी झोडपतात. तर मग सतत याकूबचे, अफझल गुरूचे नाव घेत रहायला यांच्याकडे हे दोघेच देशभक्त शिल्लक आहेत काय?

६) प्रफुल्ल पटेल व सलमान खान यांचा याराना व शाळकरी मुलांचे दुर्दैव

गोंदियातल्या एका शाळेत विद्यार्थ्यांसमोर भाषण करण्यासाठी भ्रष्टगुंडवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी सलमानखानला आमंत्रण दिले. शाळकरी मुलांसमोर कोणते आदर्श ठेवले जात आहेत याबाबत डोळ्यात अंजन पडावे असे सगळीकडे होत आहे. हे अतिशय संतापजनक प्रकार चालू आहेत.

ती एबीपी माझाची बेजबाबदार टीव्हीवाली शाळकरी मुलींना सलमानच्या लग्नाबद्दल त्यांना काय वाटते असे विचारताना दिसली. काय पत्रकारिता करतात हे लोक!

सलमानखानसारख्याला शाळेत बोलावणारे आपल्या सभोवताली बकालपणा पसरवणा-या मोठ्या षड्यंत्राच्या सुत्रधारांपैकी आहेत हे लक्षात ठेवायला हवे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users