जशाला तसे आता वागायचे

Submitted by घायल on 10 February, 2016 - 11:16

ना तुला काही समजावुनी घ्यायचे
मला ही ना काहीही सांगायचे
मैफिलीतूनी गेली उठूनी जसे
मला ही तसे आता वागायचे

बोलली फक्तं तू ना मला ऐकले
आता तुझे ना प्रस्ताव ऐकायचे
तुझ्या बंद खिडकीचे कौतुक गं
बंद माझ्या खिडक्यांनी दावायचे

चुकूनी नजरेस भिडता नजर
शब्द अर्धं -उन्मिलीत शोधायचे
लज्जागुंठीत अधरांत आहे हासू
तू ना हासता बळे ना हसवायचे

कराण्णा पोचाण्णा चेट्टीयाड (कपोचे)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users