पास्ता

Submitted by टयुलिप on 8 February, 2016 - 10:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पास्ता
फ्लॉवर बारीक चिरून
ढोबळी मिरची (लाल / हिरवी) बारीक उभी चिरून
मटार दाणे
गाजर उभे / गोल चिरून
५-६ टोमॅटो
टोमॅटो सॉस
१ मध्यम कांदा
कोथिंबीर
मीठ
२ चमचे लाल तिखट
१ चमचा हळद

क्रमवार पाककृती: 

१. पास्ता पाकिटावर दिलेल्या सूचनेनुसार पाण्यात उकळून घ्यावा,
२. टोमॅटो सॉस साठीपाणी उकळत ठेवावे. उकळल्यावर त्यात टोमॅटो टाकावेत.
३. पास्ता आणि टोमॅटो शिजेपर्यंतसगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.
1.jpg
४. टोमॅटो १० मिनिटानंतर गार पाण्यात टाकावेत. त्याची साल काढून घ्यावेत, आणि मिक्सरमधे प्युरे करावी.
५. पास्ता उकळल्यानंतर चाळनीमधे काढून घ्यावा.
3.jpg
६. कढईमधे तेल टाकून , जिरे मोहरी आणि थोडे हिंग टाकावे.
७. आता कांदा परतून घ्यावा.
८. मग सगळ्या भाज्या टाकव्यात.
९. एक वाफ काढून शिजवून घ्याव्यात.
4.jpg
१०. त्यात पास्ता टाकावा.
5.jpg
११. वरुन घरी केलेली प्युरे आणि सॉस टाकावा. हळद , लाल तिखट, मीठ टाकावे. आणि हलवुन घ्यावे.
6.jpg
१२. कोथिंबीर टाकून गरमा गरम पस्ता वाढावा.
8.jpg

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी पुरेन
अधिक टिपा: 

विकतचा सॉस खूप आवडत नाही , म्हणून घरची प्युरे आणि सॉस एकत्र केलाय.
भाज्या जेवढ्या बारीक, तेवढा शिजायला वेळ कमी लागेन.
चीज़ आवडत नाही, म्हणून टाकले नाही.
घरात असतीन त्या बहुतेक भाज्या यात वापरता येतीन.
फोटो आहेत, पण अपलोड करणे जमेना. म्हणून सध्या पाककृतीच.

तळटिप: ती ट्युलिप मी नाही Happy

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे काही वेरीयेशन्स
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरणफळात भाज्या घालत नाही ते बरोबर. पण तुम्ही पास्त्याला देशी पर्याय विचारत होतात. वेळलेल्या शेवया, किंवा डायरेक्ट पाण्यात शिजवायचे डाळफळं, किंवा शेंगोळ्या असे पदार्थ पास्त्यासारख्याच कृतीचे आहेत, व संपूर्ण देशी ढंगाचे आहेत, ते सांगत होतो. शेवया नूडल्स म्हणून वापरता येतील.

गव्हले, बोटवे , असे शेवयांचे प्रकार पास्त्याला पर्याय म्हणून वापरता येतील.
(खरं तर ते प्रकार म्हणजे इंडीयन पास्तेच आहेत.)

उकडून घेतलेले ब्रोकन व्हीटपण!

अजून इंडियन टच साठी मी धणे जीरे पुड देखील घालते!!! वेरीयेशन म्हणाल तर मी भाज्या वाफवून झाल्याकी थोडा शेजवान चटणी घालते. वर कांद्याची पात. छान लागतो पास्ता!! बर्याच इंडियन पास्ता पेकेट वर ट्युलीप यांची रेसिपी आसते.

Pages