सभोती जर तुझा नाहीच वावर

Submitted by सुप्रिया जाधव. on 3 February, 2016 - 11:14

नको घालूस साधे घांव वरवर
चिघळणारी जखम दे दयायची तर !

दम्याची ढांस होती जीवघेणी
हवेने पावसाळी घातली भर !

उबारा दे म्हणाले गोठल्यावर
निखारा घातला पदरात सत्वर !

मनामध्ये दिला मी आसरा घे..
मनाला वादळा उद्ध्वस्त तू कर

समस्यांच्या मुळाशी घाव घालू
समस्यांची उकल साधायची तर !

कसा मिळवू पुरेसा प्राणवायू
सभोती जर तुझा नाहीच वावर ?

पहाटेला धुके स्वप्नात आले
दवाचा थेंब होता पापणीवर

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>कसा मिळवू पुरेसा प्राणवायू
सभोती जर तुझा नाहीच वावर ?

पहाटेला धुके स्वप्नात आले
दवाचा थेंब होता पापणीवर<<<

अप्रतीम.

सुरेख गझल. व्वा वा!