एक कप्पा ठेवला मुद्दाम बाकी

Submitted by सुप्रिया जाधव. on 3 February, 2016 - 08:55

पाहिजे टिकवायला हा कैफ बाक़ी
ओत पेला भरभरोनी दुःख साकी

मीर, ग़ालिब....सांग वाचावे कधी मी ?
अनुभवांचे बाड़ हे संपेचना की !

रंग वर्दीचा बदलला पाहिजे ना ?
फ़ार झाली आजवर बदनाम खाकी

मागणीने लेखणी उद्विग्न झाली
दुःख झिरपू दे म्हणाले एकटाकी

चोरकप्पे शोधले सगळे मनाचे
एक कप्पा ठेवला मुद्दाम बाक़ी

चाक अर्ध्यावर निखळते एक जेव्हा
ठप्प होते जीवनाची चारचाकी

(टीप - दुसऱ्या शेरामधे सूट घेण्यात आलेली आहे )

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आँ?

>>>पाहिजे टिकवायला हा कैफ बाक़ी
ओत पेला भरभरोनी दुःख साकी

मीर, ग़ालिब....सांग वाचावे कधी मी ?
अनुभवांचे बाड़ हे संपेचना की !

(टीप - दुसऱ्या शेरामधे घेण्यात आलेली आहे )<<<

अहो 'सूट घेण्यात आली आहे' हे स्पष्ट लिहा. नाहीतर मतला वाचून वाटायचे की दुसरा शेर रचताना काही घेतले की काय! Proud Light 1 (प्लीज हलके घ्या) (हा प्रतिसाद गंमत म्हणून तसाच ठेवणार आहे)

>>>चोरकप्पे शोधले सगळे मनाचे
एक कप्पा ठेवला मुद्दाम बाक़ी<<<

चांगला शेर!

आधीचे शेर जरा 'अधिक' काफियानुसारी किंवा अनैसर्गीक वाटले. शेवटच्या शेरात 'एक' हा शब्द भरीचा वाटला.

प्रतिसादाचा राग मानू नयेत.

-'बेफिकीर'!