सेल्फी ...

Submitted by कविता क्षीरसागर on 29 January, 2016 - 00:12

सेल्फी

आजकाल सेल्फीचं भलतं फॅडच निघालंय
आणि या तरुणाईला तर अगदी वेडच लागलय

वेगवेगळ्या लोकांसोबत , वेगवेगळ्या ठिकाणी
फ्रंट कॅमेरा लगेच होतो ऑन होतो त्यांचा त्या त्याचक्षणी

कधी ऐतिहासिक स्थळांना भेट देताना
तर कधी एकमेकांनाच प्रेमाचा विश्वास देताना

कधी मॉलमधे मित्र मैत्रिणींसोबत
कधी सिनेमा हॉलमध्ये , पॉपकॉर्न आणि पेप्सीसोबत

कधी आनंदात बेभान होऊन डुंबत असताना
तर कधी भर गर्दीतही एकटेच फिरताना

अशा अनेक सेल्फीज अपलोड होतायत फेसबुकवर , व्हॉट्सॲपवर
त्यावरच्या कॉमेंट्स आणि लाईक्सने मग पडत जाते त्यात भर

स्वतःशिवाय जणू कुणाला दिसतच नाहीये जग
आयुष्यातले अनमोल क्षण निसटून जातात हातातून मग

आणि या सेल्फीत तरी कुठे होतो , आपला खरा चेहरा कॅप्चर
तो तर लपलेला असतो आतच कुठेतरी खोलवर

तो चेहरा येऊ द्या ना कधी तरी या सेल्फीत
आपणच आपल्याला मग नव्यानेच सापडू कदाचित ....

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users