स्पर्शांची भाषांतरे

Submitted by सत्यजित on 28 January, 2016 - 03:40

तुझे हात हाती आले
अन जगणे स्वप्न झाले
मागू कशास काही
मज सर्व सर्व मिळाले

हातात तुझे हात
देती अर्थ जीवनाला
हेची अर्चित माझे
मी सांगते मनाला

स्पर्शात जे तुझ्या ते
शब्दात येत  नाही
स्पर्शांची भाषांतरे
शब्दात होत नाहीत

-सत्यजित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर