सब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड : दुध व दुग्धजन्य पदार्थ

Submitted by चंपक on 27 January, 2016 - 05:17

मुळ लेखः चंप्या दुधवाला....! http://www.maayboli.com/node/12638

सब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नेवासा तर्फे पुणे येथे एस बी आय बॅंकेसमोर, ससानेनगर ला २५ डिसेंबर २०१५ पासुन सुरुवात झाली आहे. स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, ससाने नगर शाखेसमोर दुध व पनीर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.

शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री सेवा उपलब्ध असल्याने निर्भेळ, शुद्ध दुध उपलब्ध आहे. ५०० मिली पाऊच रु. २०/-

पनीरः प्रती १०० ग्राम : रु. २५/-

लवकरच खवा (मावा) उप्लब्ध केला जाईल.

सदर कंपनी शेतकर्‍यांची शेतकर्‍यांसाठी आहे!

ग्राहकाचा फायदा: शुद्ध निर्भेळ, भेसळ विरहित दुध मिळेल !

शेतकर्‍यांचा फायदा: डिस्ट्रिबुटर चेन मधुन बाजुला काढल्याने ३-४ रुपये प्रति लिटर भाव जास्त मिळेल. इतर कंपन्या शेतकर्‍यांना १७-१८ रु. भाव देतात. आम्ही २१ रु. देतो. शिवाय ते कंपनीचे सभासद असल्याने नफ्यात हक्क आहेच!

champy_doodhwala.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन चंपक.

एक माहीती हवी होती.
आता बाजारात जे दुध मिळतं त्या दुधाच्या पिशवीवर Tonned Milk असं लिहीलेलं असते.
हा टोनर म्हणजे एक प्रकारचं केमिकलचं असते काय ??

एक परिचीत जो गोकुळमध्ये काम करतो त्याने सांगितले कि जितक जास्त घट्टं दुध तितका जास्त टोनर वापरला जातो.

सध्या आमच्या इथे पराग मिल्क फुडसचं 'प्राईड ऑफ काऊ' हे दुध प्लॅस्टिक बाटल्यांतून मि़ळत आहे. ३.५% फॅटवालं दूध रु. ८० प्रति लिटर या भावानं विकताहेत.

तसंच नाशिकच्या सारडा गृपचं 'सारडा मिल्क' हे गाईचं दूध काचेच्या बाटल्यांतून मिळत आहे. त्यांची सिस्टिमही खूप एलॉबोरेट आहे. त्यांची ऐकूण ४ प्रकारची दुधं आहेत - कच्चं, पाश्चराईज्ड होमोजनाईज्ड, पाश्चराईज्ड २%, पाश्चराईज्ड ३.५%.

पैकी ३.५% वालं कमीतकमी रु. ६५ प्रति लिटर पडतं (जर त्यांच्याबरोबर ५२ लिटर दूधाचा करार केला तर). जर कमी लिटरांचा केला तर दूध आणखी महाग पडतं. आपण त्यांनी दिलेली इन्स्युलेटेट पिशवी त्यातील कोल्ड पॅकसह ( जो आपल्याकडे राहिल्यानं कोल्ड राहिलेला नसतो) आणि आदल्या दिवशीची दुधाची रिकामी काचेची बाटली रात्री बाहेर ठेवायची. दुसर्‍या दिवशी भल्यापहाटे ५ वाजता त्यांचा माणूस येऊन रिकामी बाटली आणि कोपॅ काढून त्यात भरलेली बाटली ठेवतो आणि त्यात थंड केलेला कोपॅ ठेवतो.

आम्ही दोन्ही ब्रँडची दुधं सध्या मागवतो आहोत. रोज प्राईड ऑफ काऊ आणि आठवड्यातून एकदा सारडा. पण गंमत म्हणजे दोन्ही गाईचीच आणि ३.५% दुधं असूनही प्राऑका मध्ये साईचा अगदी थर येतो तर सारडामध्ये बर्‍यापैकी जाड थर असतो. म्हणजे सारडाच्या दुधाची साय जमवून घरी लोणी करता येण्याइतपत. प्राईडची साय जेमतेमच असते.

हे असं कसं?

काचेच्या बाटलीपासुन सुरु होऊन प्लास्टिक ची बॅग व्हाया मार्गे टेट्रा पॅक अन पुन्हा कचेची बाटली हा प्रवास निसर्गाचे वर्तुळ पुर्ण करणारा आहे.

दरांमधील तफावत ही केवळ दिलेली सेवा किती तत्पर अन दर्जेदार आहे त्यावर अवलंबुन दिसते.

२% अन ३.५% चे दुध अनुक्रमे ३० ते ४० रुपये दराने मिळु शकते. उर्वरीत पैसे घरपोच सेवेचे आहेत.

साईबद्दल- होमोजिनाईज करताना वापरले जाणारे यंत्र अर्थात होमोजिनाईजर कोणत्या कंपनीचा आहे, उदा. गावलीन, गोमा कि अन्य देशी यंत्र, अन त्यात किती प्रेशर देऊन ते होमोजिनाईजर सेट केलेले आहे, त्यावर साय कशी येणार हे ठरते. जास्त होमोजिनाईज केलेले दुध कमी साय देते.

पास्चात्य देशांत आता होमोजिनाईज दुध नको, असा ट्रेंड येतो आहे. यामुळे प्रोटीन मध्ये बदल होऊन पुढील पिढीला त्रास होऊ शकतो असा काही संशोधकांचा दावा आहे.

"सब फार्मर" चे दुध मुंबईत १ जुलै २०१६ नंतर सुरु होईल.

कंपनीचा विस्तारीत प्रकल्प (प्रती दिन १०,००० लिटर क्षमता) जुलै महिन्यात सुरु होत आहे. शक्य असेल त्यांनी भेट द्यावी ही विनंती.

Pages