सब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड : दुध व दुग्धजन्य पदार्थ

Submitted by चंपक on 27 January, 2016 - 05:17

मुळ लेखः चंप्या दुधवाला....! http://www.maayboli.com/node/12638

सब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नेवासा तर्फे पुणे येथे एस बी आय बॅंकेसमोर, ससानेनगर ला २५ डिसेंबर २०१५ पासुन सुरुवात झाली आहे. स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, ससाने नगर शाखेसमोर दुध व पनीर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.

शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री सेवा उपलब्ध असल्याने निर्भेळ, शुद्ध दुध उपलब्ध आहे. ५०० मिली पाऊच रु. २०/-

पनीरः प्रती १०० ग्राम : रु. २५/-

लवकरच खवा (मावा) उप्लब्ध केला जाईल.

सदर कंपनी शेतकर्‍यांची शेतकर्‍यांसाठी आहे!

ग्राहकाचा फायदा: शुद्ध निर्भेळ, भेसळ विरहित दुध मिळेल !

शेतकर्‍यांचा फायदा: डिस्ट्रिबुटर चेन मधुन बाजुला काढल्याने ३-४ रुपये प्रति लिटर भाव जास्त मिळेल. इतर कंपन्या शेतकर्‍यांना १७-१८ रु. भाव देतात. आम्ही २१ रु. देतो. शिवाय ते कंपनीचे सभासद असल्याने नफ्यात हक्क आहेच!

champy_doodhwala.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंपक साहेब - मोठाच व्यवसाय करता आहात, त्याबद्दल अभिनंदन. पण २ गोष्टी आपुलकीने सांगु म्हणतो.

१. जे काही करता आहात ते पूर्णपणे धंदा म्हणुनच करा. व्यवसाय कम समाजसेवा असे नको. समाजसेवा करायची असेल तर व्यवसायात फायदा मिळवुन तो समाजसेवे साठी वापरा. पण दोन्ही गोष्टी एकत्र आणण्याची गल्लत नको.
२. पूर्ण धंदेवाईक दृष्टीकोनातुनच करा. जर तुमच्या दर्जाचे दुध मार्केट मधे ५० रुपये लिटर नी उपलब्ध असेल तर तुम्ही ४८-४९ रुपयानी तरी विका. ५० रुपयाचे दुध ४० रुपयानी विकायची काही गरज नाही.
३. तसेच शेतकर्‍यांना बाकीची लोक १७ भाव देत असताना तुम्ही २१ रुपये देणे बरोबर नाही. दुध जमावे म्हणुन पाहिजे तर १८ रुपये द्या. पण मार्केट रेट पेक्षा जास्त का? वाटले तर हे जास्तीचे ३ रुपये वेगळे ठेवा आणि कोणाला मदत म्हणुन किंवा भांडवल म्हणुन द्या.

सचोटीनी आणि कष्ट करुन संपत्ती निर्माण करणे ही खरी समाजसेवा आहे. शेतकरी किंवा ग्राहकांना सबसीडी देऊन नको.

सर्वांचे आभार!

मुंबईत अजुन सुरुवात नाही. विले-पार्ले परिसरात सुरु करण्यासंबंधी बोलणे चालु आहे.

टोचा शेठ -- आपला सल्ला सर-आंखो पर! इतर उत्पादक हे "डिस्ट्रिब्युटर" ला २६-२७ रु. ने दुध देतात, आम्ही स्वतःच ३८ ने विकतो. Happy

चंपक साहेब,
मुंबई ग्राहक पंचायतीचा शुध्द दुध आमचा हक्क असे अभियान गेले २ वर्षे सुरु आहे. ग्राहक पंचायतीचे सभासद असे अभियानातील तपासणी शिबिर झाल्यानंतर चांगले दुुध कोठे मिळू शकेल अशी विचारणा करतात.
आपल्यासोबत किंवा आपल्या कंपनीच्या अधिकृत अधिकाऱ्यासोबत याबाबत चर्चा करुन सुरुवातीस पुण्यातील काही भागातील सभासदांकरीता व नंतर प्रयोग यशस्वी झाल्यास पुण्यातील सर्व सभासदांकरीता दुधाचे वितरण आपल्यामार्फत करता येईल का? असा विचार आहे. आपला संपर्क क्रमांक विपूतून कळवावा म्हणजे संपर्क करता येईल.

Pages