ताळेबंद

Submitted by मंदार खरे on 26 January, 2016 - 23:17

बर्‍याचदा मीच बसतो माझ्यासोबत एकांतात कुठेतरी

कधी चिडतो, रागावतो, सावरतो, विचरतो मलाच
गेलेल्या दिवसाचा, महिन्याचा किंवा वर्षाचा जमाखर्च
बघत असतो जुळतो आहे का कधीतरी

जमेच्या बाजू मोजाताना तशा कमीच असतात
खर्च मात्र सारखी आठवण करून देतात
झालेल्या भांडणांची भंगलेल्या मनांची कुणीतरी

नाही म्हणायला एखादा प्रसंग आठवतो जमेचा
नकळत कुणीतरी दिलेल्या शुभेच्छा वा मदतीचा
अथवा अनुभवलेला उत्कट प्रेमाचा क्षण कधीतरी

मग सगळी जमवाजमव करूम त्या ताळेबंदाची
मीच मांडतो आखणी उरलेल्या Assets व Liability ची
भोळ्या आशेच्या समजूतीने नफा होईल केव्हातरी

अर्थात एक मात्र बरे असते या खेळात
न सुट्लेल्या गणिताचा वाद नसतो दोघात
आश्वासतो मीच मला सोडवून दाखवीन एकदातरी

बर्‍याचदा मीच बसतो माझ्यासोबत एकांतात कुठेतरी

© मंदार खरे
mandar.khare@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉमर्सची परिभाषा असल्याने आवडली Wink

'जमवाजमव' ला टाइपो झालिये....ती सुधारली की बेस होइल.. .:)
मग सगळी जमचामव करूम त्या ताळेबंदाची