फुसके बार – १८ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 17 January, 2016 - 14:43

फुसके बार – १८ जानेवारी २०१६

१) माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग हे निर्बुद्ध समजले जायचे.

त्याच्याबद्दलचा एक किस्सा मौजच्या दिवाळी अंकात आलेला आहे. विजय कुवळेकरांनी खुशवंत सिंगावर लिहिलेल्या लेखातून.

खुशवंतसिंगांनी त्यांची एक आठवण सांगितली. त्यांच्या विनोदी बुद्धीची एक झलक. ते निवृत्त होण्याच्या दोनेक आठवडे आधी खुशवंत सिंग यांच्या एक पुस्तकाचे प्रकाशन होते. खुशवंत सिंग त्यांची पुस्तके एखाद्या सुंदर स्त्रीला अर्पण करत आणि शक्यतो ती स्त्री प्रकाशनावेळी हजर राहील असेही पहात. प्रमुख पाहुण्याने सर्वात शेवटी अर्पणपत्रिका वाचायची व त्या पुस्तकाची प्रत त्या स्त्रीला द्यायची अशी त्यांची पद्धत असे.

झैलसिंग अर्पणपत्रिका वाचू लागले. “जिने आमच्या अनेक मैफिलींमध्ये रंग भरला, वगैरे वगैरे”. ती स्त्री खुशवंत सिंगांच्या घनिष्ट कौटुंबिक संबंधातली होती. ते एकेक ओळ वाचू लागले, तसे तिच्या लक्षात येऊ लागले की ती अर्पणपत्रिका तिच्यासाठीच आहे व ती खुशीने लालेलाल होत गेली. शेवटी ग्यानींनी तिचे नाव उच्चारले. टाळ्यांच्या कडकडाटात ती व्यासपीठावर आली. आणि तिने खुशवंतसिंगांचे चुंबन घेतले. ग्यानी अगदी बापुडवाण्या चेहयाने तिच्याकडे पहात म्हणाले, “देखो जी, हम तो ठहरे देहाती आदमी, देहात में ऐसा होता है, की जो डाकिया डाक लाता है, उसे कुछ ना कुछ मिलता ही है। लेकिन जो पढ के बताता है, उसे भी चवन्नी-अठन्नी मिल ही जाती है। असे म्हणून ते क्षणभर थांबले आणि तसेच बापुडवाण्या नजरेने बघत म्हणाले की “तो ये रही आप की किताब”. असे म्हणत पुस्तक तिच्या हातात ठेवले. त्यांचा ढंग इतका लाजवाव होता की सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून व हसून त्यांना दाद दिली.

२) याच लेखात भारत-पाक युद्धाच्यावेळचीही खुशवंतसिंगांची एक आठवण सांगितली आहे. न्यूयॉर्क टाइम्सला भारत-पाक संबंधांवर एक लेख तातडीने हवा होता. त्यांनी खुशवंत सिंगना भारतात फोन केला. तेव्हा त्यांना कळले की ते अमेरिकेतच आहेत व ते दीडदोन तासातच भारतात परतायला निघणार आहेत. त्यांनी विचारले की उद्या किती वाजेपर्यंत लेख देऊ शकाल?

या विषयावरचे सगळे संदर्भ त्यांच्या लक्षात होतेच. तेव्हा ते भारतात परतल्यावर दोन-तीन तासांमध्ये हा लेख देता येईल, असे ठरले. विमानातच त्यांनी बराचसा लेख लिहून पूर्ण केला. ठरल्याप्रमाणे टाइम्सवाल्यांचा फोन आला व फोनवरच चाळीस मिनिटांमध्ये तीन हजार शब्दांचा लेख तिकडच्या स्टेनोने उतरवून घेतला. ती म्हणाली की थोडा वेळ घरीच थांबा. लेख वाचून झाल्यावर वाचून दाखवते. बरोबर पाउणेक तासाने पुन्हा फोन आला. भारतीय शब्दांचे स्पेलिंग, अचुकपणा वगैरे सगळे तपासून घेतले.

न्यूयॉर्क टाइम्समधला हा लेख खूप गाजला. त्यांना या लेखाच्या मोबदल्याच्या स्वरूपात शब्दाला सहा रूपये मिळाले होते. तेव्हापासून अनेक परदेशी वृत्तपत्रे त्यांच्याकडून लेख मागवू लागली.

३) मालद्याची हिंसक घटना म्हणजे हिंदू-मुस्लिम जातीय दंगल नव्हती. मात्र “आता खरी ‘हिंदू-मुस्लीम’ दंगल घडवून आणण्याचं निमित्तच संघ परिवाराला मिळणार आहे. संघ परिवाराची कार्यपद्धती बघता एखाद्या मंदिराचा विध्वंस मुद्दामच केला जाऊ शकतो अथवा एखाद्या धार्मिक नेत्याचा खूनही केला जाऊ शकतो. त्यावरून सहज दंगल पेटेल आणि मग ती खऱ्या अर्थानं ‘हिंदू-मुस्लिम’ दंगल असेल.” असे प्रकाश बाळ यांच्या लोकमतमधील एका लेखातील विधान उद्धृत करून राजीव साने यांनी बाळ यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उठवले आहे.

बाळ काहीही म्हणोत, हिंदू-मुस्लिम नसली तरी मुळात मालद्याची घटना जातीयच होती व हिंसक होती. एवढे पुरेसे आहे. पण ती केवल हिंदू-मुस्लिम दंगल नव्हती म्हणून त्यास जबाबदार असणा-यांना बाळ दोषी धरत नाहीत हा त्यांच्या बुद्धीचा दोष आहे. आता ते म्हणतात तशी दंगल झालीच, तर पहा मी म्हटले नव्हते असे होईल म्हणून टीव्हीवर झळकायला तयार. असा हा डाव आहे.

एरवी ते ज्या आक्रमकतेने संघाविरूद्ध बोलतात, तेवढ्याच आक्रमकतेने अशा वाईटाला वाईट म्हणायची त्यांची तयारी दिसत नाही, यातच त्यांचा एकांगीपणा दिसून येतो. संघ दंगल घडवून आणू शकेल असा दावा ते करतात. खरे तर एवढी मोठी हिंसा झाली तरी आपल्याला सरकारी संरक्षण मिळते व कोणतीही मोठी कारवाई होत नाही हे दिसल्यावर कोण अधिक निर्ढावल्यासारखे वागेल व कोणापासून अधिक धोका संभवतो? पण बाळ यांच्यासारख्या ठरवून खोडसाळपणा करणा-यांना हे प्रश्न पडणार नाहीत. मालदा व तेथील भागात असलेली बांगलादेशींची मोठी संख्या पाहता हा देशाच्या सुरक्षिततेचाही मुद्दा आहे. बाळ यांच्यासारख्यांना सोयीकरपणे हे मुद्दे दिसत नाहीत.

४) टीव्हीवरील चर्चेत भाग घेणा-यांना किती बिदागी मिळते? त्यात राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना कदाचित त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करायची संधी दिली मिळते म्हणून त्यांना काहीच मोबदला दिला जात नसावा (की दिला जातो?).

मात्र जे राजकीय पक्षांशी संबंधित नाहीत, त्यांना याबद्दल किती मोबदला मिळतो? त्यातही काही प्रमुख वाहिन्या आणि फार प्रेक्षक मिळत नसलेल्या वाहिन्या यांच्याकडून मिळणा-या मोबदल्यात फरक असतो का?
मुद्देसूद बोलणा-यांची वानवाच दिसते, पण काही जण नव्हत्याचे होते करून खोडसाळपणे मते मांडताना दिसतात. वर प्रकाश बाळ यांच्या खोडसाळपणाचे उदाहरण दिलेच आहे. ते किती मोबदल्यासाठी असे करायला तयार होतात, त्याचाही अंदाज यावरून येईल.

५) साहित्य संमेलनाध्यक्षांवर टीका करणारा लेख लिहिल्यामुळे संमेलनात असलेल्या चपराकच्या स्टॉलवरील आयोजकांनी जबरदस्तीने हलवले. खरे तर हा लेख संमेलन चालू होण्यापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर चपराक या प्रकाशनाला त्यांचा स्टॉल उभा करण्यास परवानगी कशी दिली?

शिवाय कशाबद्दल आक्षेप असेल तर महामंडळाने त्याबाबतची भूमिका घ्यायला हवी होती. चपराकच्या कोणा प्रतिनिधीने तेथे काही गैरवर्तन केलेले नव्हते. तेव्हा आयोजकांनी त्यांच्या अधिकारात हा उद्योग करण्याचे कारणच नव्हते.

या अशा कारणावरून अशी मनमानी करणा-या या शिक्षणसम्राटांच्या संस्थांमधले वातावरण किती मोकळे असेल याची यावरून कल्पना यावी.

६) काल साहित्य संमेलनात गुलजार यांनी कुसुमाग्रजांची कणा ही त्यांनी रीड या नावाने हिंदीत अनुवादीत केलेली कविता ऐकवली.

त्यांची मूळ मराठी कविता पुढे देत आहे.

कणा

ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकाल नेमके काय झाले आहे ते समजत नाही. जे प्रश्न प्रशासकांनी विचारायचे असतात ते काही सदस्य विचारू लागले आहेत. ज्या हरकती प्रशासकांनी नोंदवायच्या असतात त्या काही सदस्य नोंदवू लागले आहेत. परवा मला कोणीतरी कसलीतरी लेखी परवानगी घेतली आहे का म्हणून विचारले. जी व्यक्ती स्थळाच्या प्रशासनापैकी एक नाही, तिच्या ह्या प्रश्नाला मी महत्त्व का द्यावे?

ज्या बाबी विसरल्या असाव्यात त्याची आठवण करून देणे वाईट नाही. तुमच्याही प्रताधिकाराची अधिकृत तक्रार केलेली नाही, फक्त आठवण करून दिलेली आहे.

गेले काही दिवस तुमच्याकडे दुर्लक्ष करीत होतो, आता पुन्हा लक्ष देणे सुरू करू का?

बाकी "प्रशासकांनी हरकती नोंदवायच्या असतात" हा माज आवडला. आवरा वेगाला, सावरा जीवाला, बेफी. Wink

चुकीच्या ठिकाणी ही म्हण वापरली आहेत तुम्ही. झालेल्या घटना, म्हणींचे अर्थ ह्याबाबत थोडे वाचन वाढवावेत.

अहो,

तुमच्या त्या ह्याला देखिल १० अवतार घेतले तरी तुमच्यासारख्या विशिष्ट प्रवृत्तींचे संपूर्ण निर्दालन करता आले नाही.
माझे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत तुम्हीही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. येईल तुमचाही (आय मीन तुमच्या ह्याही आयडीचा) नंबर.

- (अ)द्वितिय अवतारपुरुष

ता.क.
"ती" लेखी परवानगी अवलोकनार्थ कधी पब्लिश करताहात?

इथले प्रतिसाद वाचून एव्हढेच म्हणावेसे वाटते की सोनारानेच कान टोचावे अशी इच्छाच असेल तर ते ही घडवून आणता येतेच की !

एखादा संदर्भ देताना कधीकधी नक्की कोठे पाहिले/ऐकले/वाचले होते हे स्मरणात रहात नाही. तेही शोधण्याचा प्रयत्न करतोच. पण अनेकदा सफलता मिळत नाही. मात्र संदर्भ माहित असेल तर मूळ लेखकाचा उल्लेख जरूर करतो. तेवढेच. 'प्रताधिकार' म्हणजे या संदर्भातच असेल तर. अन्यथा चालू दे.