उमराव जानला नेसवती नउवारी

Submitted by बेफ़िकीर on 16 January, 2016 - 09:45

उमराव जानला नेसवती नउवारी
पद्मासन घालुन बसती मग दरबारी
चषकांत जसे गोमुत्र ओतते साकी
होऊन जाउद्याची उठते ललकारी

केळीच्या पानावर बिर्याणी वाढा
मदिरेच्या जागी घेत बसा रे काढा
वेशाचे ठेवू नका भान थोडेही
बस मराठमोळा वाचत राहा पाढा

बुरख्यामध्ये तर महाकाव्य दडलेले
हे समजण्यात घोडे तुमचे अडलेले
उतरवा पुराण्या संतकवींच्या झूली
अध्यात्म आपले केव्हाचे सडलेले

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users