वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतरांपेक्षा वेगळे विचार असणे यात काही चूक नाही,

कालांतराने आपले विचार चुकीचे होते असं लक्षात येऊन वेळ नाहक गेला असं वाटण्यापेक्षा वेळीच आपले निर्णय आपण तपासून घेणेही योग्यच.

अॅमी म्हणताहेत तोच दृष्टिकोण ठेवायचा असेल तर पालकांनीही मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची योग्यता येईपर्यंतच सपोर्ट करावं.
त्यानंतर त्यांना परदेशी शिक्षणाला, लग्न करायला, स्वतंत्र घर घ्यायला अजिबात मदत करू नये. दोघांपैकी एकही पालक जिवंत आहे तोपर्यंत संपत्तीचा कोणताही हिस्सा मुलांकडे वळता करू नये. आणि मेल्यानंतर त्याचे काय होणार आहे हेही गुलदस्त्यात ठेवावे. बेस्टम्हणजे मुलं सज्ञान झाली की त्यांना घराबाहेर काढावे.
त्याहीपुढे जाऊन प्रत्येकाने स्वतःच्या निवृत्तीपश्चात आयुष्याचा प्रथम विचार करावा. मगच मुलांना जन्माला घालायचा विचार करावा.
>> हे सार्केस्टीकली लिहलं आहे का कल्पना नाही पण मी मात्र गंभीरपणे या विचारांशी सहमत आहे Happy

मुलांना वाढवताना घेतलेले कष्ट्, रात्र- रात्र केलेली जागरणे, भरभरुन दिलेले प्रेम, आणि महत्वाचे आईने पाजलेल्या दुधाची किंमत कशी लावायची. या जगात आणल्या बद्दल मुलांनी आई- वडिलांचे ऋण मानायचे की आई वडिलांनी मुलांचे ऋण मानायचे ज्या मुलांनी आई- वडिल होण्याचे सौभाग्य त्यांना दिले. >> Awww इमोसनल अत्याचार करणार्या आईवडलांना "तुमचे फक्डअप जिन्स आम्हाला ट्रांसफर केले" म्हणून मुलांनी स्यु करावे Proud

आज निवृत्त झालेली विशिष्ट वर्गातली मंडळीतरी आर्थिकदृष्ट्या बहुतांशी पुढच्या पिढीवर अवलंबून नसते. उलट पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र घर घेऊन ठेवल्याची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत.
त्यामुळे हा मुद्दा फक्त आर्थिकच आहे असं नाही.

फक्त आर्थिक मुद्दा घेतला, तर कायदा काय म्हणतो ते पहा.

ते तुम्ही मांडलेल्या मुद्द्याच्या उत्तरार्थ सर्कॅस्टिकली पण जे अजून सुपातही नाहीत त्यांच्यासाठी सिरियसली विचार करावा असं.
आपली मुलं उद्या आपल्याशी कसं वागतील, हा विचार करून पालक आजचे निर्णय घेत नाहीत. आपल्या म्हातारपणासाठी मुलांच्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवायचा विचार करणारे पालकही माहीत नाहीत. पण मुलांच्या भविष्याइतकाच स्वतःच्या म्हातारपणाचाही, तोही फक्त आर्थिक नव्हे तर शारीरिक, सामाजिक, मानसिक, विचार आधीपासूनच करून ठेवायला हवा, हे नक्की.

पण आता ज्यांच्यासमोर ही समस्या आहे त्यांनी काय करायचं. (बहुतेक मंगला गोडबोलेंनी वापरलेल्या संज्ञा) अतिवृद्ध आणि त्यांची सेवा करणारे नववृद्ध यांचा प्रश्न सध्या आहे. त्यांच्या पुढची पिढी पुरती व्यक्तिस्वातंत्र्यवादी असल्याने त्यांना एकप्रकारे दोन्हीकडून मार आहे.

काही पालक आपल्या मुलांशी वाईट वागतात हे खरं आहे. त्या मागे अनेक कारणं असू शकतात. स्वार्थ, परिस्थिती, सामाजिक दडपणं इत्यादींमधून कधी कधी नाईलाजानेही ते कठोर वागतात किंवा कधी कधी बेफिकीरी मुळेही वागू शकतात. पण ही उदाहरणे दुर्मिळ म्हणावीत. समाजाचं प्रातिनिधिक चित्रं नव्हे.

अर्थात अशांच्या मुलांची भावनिक कोंडी कशी होत असेल आणि त्याचा निचरा कसा व्हावा याची कल्पना करता येत नाही.

इमोसनल अत्याचार करणार्या आईवडलांना त्यांच्या मुलांकडुन इमोसनल अत्याचारच मिळत असतो.

जनरेशन गॅप हे नैसर्गिक आहे. निसर्गाचे काही मुलभुत नियम मानले किंवा स्विकारले तर जिवन जगणे सोपे होते.
परंपरेला सोडुन त्यासाठी एका वेगळा दृष्ट्कोना असावा लागतो बर्‍याच गोष्टी परंपरेने चालतायत म्हणुन चालु द्यायच्या की निसर्ग नियमा नुसार चालनारे सत्य स्विकारायचे हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतिचा प्रश्न.

दोन पिढ्या म्हणजे भारत-पाकिस्तान असल्यासारखे का बोलतायत लोक?>>> +१ एकमेकांना पूरक असलं की फारच कमी प्रॉब्लेम्स येतात. जितके येतात तितके तर एकाच पिढीतल्या लोकांमध्येही येवू शकतात.

>>>> दोन पिढ्या म्हणजे भारत-पाकिस्तान असल्यासारखे का बोलतायत लोक? <<<<<
नीरजे, जगभरातल्या नै तरी किमान भारतातल्या "सासवा-सुना" या दोन पिढ्यांचेच प्रतिनिधित्व करतात. अन इसवी सन १९६०-७० च्या दशकातील तारुण्य अनुभवलेली सासू अजुनही त्याच भावविश्वात असते तर सुन इसवीसन २००० च्या पुढील कालखंडातील. आता या दोन भावविश्वांचे जळ्ळे कर्माचे कसे जुळावे?
माझ्या माहितीतील दहा टक्के सोडले तर नव्वद टक्के उदाहरणात याच ग्याप मुळे अडचणी होताहेत असे दिसते.
(अर्थात या मागे सूप्त कारण म्हणजे वैचारिक आडमुठेपणा, हेकेखोरपणा, आमच्या वेळचे अस्से होते नि तस्से होते वगैरे आचरटपणे, थोडक्यात स्वतःच्या स्वभावात आवडीनिवडीत कसलाही बदल करता न येणे इत्यादि अनेकानेक दोष कारणीभूत असतात हे मान्यच, पण मूळ कारण पिढीतील अंतर, व जगण्याच्या पद्धतीतील अन त्याद्वारे केल्या जाणार्‍या विचारातील तफावत हेच्च आहे , अन सुनेशी पटले नाही की बसायचे बोम्बलत..... म्हातार्‍यांना वार्‍यावर सोडता म्हणूण... घरोघरी हेच्च चालु आहे..... त्याचे उलट घरात एकही म्हातारे नसेल तरच लग्नाला उभ्या रहाणार्‍या ललनाही बघितल्यात.... त्यांचे पुढे काय झाले त्याचा मागोवा ठेवला नाही, पण येतिल. जातिल कुठे? कधी तरी कुंडली घेऊन येतिलच समोर प्रश्न विचारायला की आस्से का झाले नी तस्से का झाले.... Proud हल्ली तर मी कुम्डली बघायच्या आधिच विचारतो, की विचारल्या प्रश्नाला तुमचीच कर्मे किती कारणीभूत झाली आहेत याचा मागोवा घेतलाय का? नसेल घेतला तर आधी तो घ्या, कुंडली बघायचीही गरज पडणार नाही कदाचित. )

दोघा पिढ्या म्हणजे भारत पाकिस्तान नाही ही समज दोन्ही पार्ट्यानां आली तर दोन पिढ्यांमधे प्राब्लेम्स यायलाच नाही पाहिजे Happy

मागे माझ्या वाचन्यात एक लेख आला होता.
आईच्या काळजी पोटी एक मुलगा आपल्या वृध आईला घरात कोंडुन ऑफिसला जायचा तिला मुलाचे ते कोंडुन जाणे अजिबात आवडायचे नाहि ती मुलाला विनवण्या व गयावया करायची तु मला घरात कोंडु नकोस मला भिती वाटते म्हणुन पण तो म्हणायचा की हे मी तुझ्या सुरक्षतेती साठी करतोय.

या कृती मागचे कारण हे होते की लहानपणी ती आई मुलाला अशिच घरात कोंडुन बाहेर जायची ते त्या मुलाच्या अचेतन मनात साठुन राहिलेल होते व त्याच्याही नकळत तो अश्या प्रकारे आईला तिच्या कृत्याचा परतावा देत होता.

>>> आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु <<<<
माझ्या सर्व पोस्टी या वाक्याच्या अनुषंगाने वाचाव्यात.
व स्वतःचे म्हातारपण शारिरीक दृष्ट्या सुखाचे जाण्यासाठी आज नव्हे आत्तापासुन सायकल चालविण्यास सुरुवात करावी.

लिंब्या, इथे तू एक गृहितक स्पष्ट केलंस की वृद्धांची जबाबदारी म्हणजे मुलाने आणि सुनेने आपल्या आईबापांची घ्यायची असलेली जबाबदारी.
बहुतेक वेळेला तेवढेच असते सगळ्यात आणि सुनांना नावे ठेवलेली असतात.

मुलीच्या आईवडिलांचं काय? त्यांच्याबरोबर एका घरात राहणे याला जावईलोक नकार देतातच ना?

मुलीच्या आईवडिलांनी मुलीच्या घरात राहणे म्हणजे चुकीचे वगैरे समजुती अजूनही आहेतच.

मुलाचे आईवडिल ही त्याची जबाबदारी असते तर मुलींचे आईवडिल ही मुलींची जबाबदारी नसते का?

एकाच वेळेला आजारी पडलेली सासू आणि आजारी पडलेली आई यामधे मुलीने स्वतःच्या आईकडे जास्त लक्ष दिले तर काय चूक आहे?

आम्ही दोघे एकुलते एक आहोत. भावंडे नाहीत. माझ्या लग्नाच्या आधी माझ्या सासर्‍यांनी माझ्या नवर्‍याला 'नीरजा तिच्या आईवडिलांची एकटी मुलगी आहे. तिचे आईवडिल ही पण तुझी जबाबदारी आहे.' असे स्पष्ट सांगितले होते. किती जणांना ही जाण असते?

आता लिंबूकाका यावर 'मी कशी माझ्या सासूसासर्‍यांची जबाबदारी घेतली' याची जंत्री लिहितील. समाजातले किती पुरुष जबाबदारी घेतात याविषयी काही लिहिणार नाहीत. पण सुनांमुळेच घरात भांडणं होतात हे जनरलाईज्ड विधान मात्र बोल्ड करून लिहितील.

वृद्धाश्रम हा विचार मनात शिवत नाही. आइ-वडील, सासु सासरे याना साम्भाळ्णार, या दोन्ही नात्यात भावनीक गुन्तवणुक आहे. मग भलेही साबा साबु शि पटो न पटो. बाकी निरजा, मजुडि याच्याशि सहमत.

>>>>> आता लिंबूकाका यावर 'मी कशी माझ्या सासूसासर्‍यांची जबाबदारी घेतली' याची जंत्री लिहितील. <<<<<

>>>> मुलीच्या आईवडिलांचं काय? त्यांच्याबरोबर एका घरात राहणे याला जावईलोक नकार देतातच ना? <<<<<
होय मंजुडी, मी अनुभव व अनुभुती याशिवाय बोलतच नसल्याने, याचेही उदाहरण माझ्याच सख्ख्या मेव्हण्याचे आहे, व त्याचे सासरे इसवी सन २००७ मधे वारल्यापासुन त्याच्या सासु त्याचेजवळ इकडेच असतात, व हे घडवुन आणण्यात लिंबीचाच पुढाकार राहिला आहे.

>>>> मुलीच्या आईवडिलांनी मुलीच्या घरात राहणे म्हणजे चुकीचे वगैरे समजुती अजूनही आहेतच. <<<<<
वैयक्तिक वा घराण्याच्या तथाकथित इगो पोटी मूर्ख, घातक व समाज तोडणार्‍या समजुती आहेत या. मी या अमान्य करतो. पण मी अमान्य करुन उपयोग नाही.
मी लिंबीच्या माहेरी बिनधास्त कामे करतो हे पाहुन, मला कुत्सितरित्या दुसर्‍याच्या उदाहरणातुन "बघा तो सासरीदेखिल कसा घरगड्यासारखा वागतो, त्यावरुनच त्याची किंमत कळते" असे ऐकविणारेही कमी भेटलेले नाहीत. अर्थात मी अशांना फाट्यावर तोलत असल्याने मला फरक पडत नाही. पण बाहेर समाजात आहे हे असे आहे व ते चुकीचे आहे.

>>>>> मुलाचे आईवडिल ही त्याची जबाबदारी असते तर मुलींचे आईवडिल ही मुलींची जबाबदारी नसते का? <<<<< ते परिस्थितीवर अवलंबुन आहे, त्या मुलिच्या आईवडिलांस जर मुलगा नसेलच, तर निश्चित पणे त्यांचा जावई व मुलीची ती जबाबदारी आहे. मात्र त्यांना मुलगा/सुन असुनही उगाचच मुलिकडे तोंडे वेंगाडण्यातही अर्थ नाही. अन वेंगाडायची असलीच तर मुलाच्या कानाखाली लावली का ते तपासावे लागेलच, शिवाय इस्टेटिचे काय केले हे देखिल बघाव एलागेल, नै तर इस्टेट मुल/सुनेच्या नावावर, राबायला मात्र मुलगी असे बरेच ठिकाणी दिसते ते देखिल व्हायला नकोय.

>>>> एकाच वेळेला आजारी पडलेली सासू आणि आजारी पडलेली आई यामधे मुलीने स्वतःच्या आईकडे जास्त लक्ष दिले तर काय चूक आहे? <<<<< बर्का मंजुडी, मी या देखिल अनुभवातुन नुकताच गेलेलो आहे, व आम्हा दोघांच्याही आया परलोकवासी झाल्या आहेत. तरीही, हा प्रश्नच माझ्याकडे तरी निर्माण झालेला नव्हता. उलट सोईस्कर जवळीक म्हणून ज्यानेत्याने आपापल्या आईचे बघावे असे अलिखित ठरले होते.

>>>> पण सुनांमुळेच घरात भांडणं होतात हे जनरलाईज्ड विधान मात्र बोल्ड करून लिहितील. <<<<<
मी निव्वळ सुनांमुळे भांडणे होतात यावर भर दिला नसुन दोन पिढ्यातील फरकात मागिल पिढीस पुढिल पिढीच्या बदलत्या गरजांबरोबर जुळवुन घेणे अवघड होते यावर भर दिला आहे. व सासु/सुना दोघीही जबाबदार असतात, पैकी वरिष्ठ/वयाने ज्येष्ठ या न्यायाने सासु जास्त जबाबदार असते असेच एकंदरीत वर्णन केले आहे.

काये मंजुडी, तुम्ही निवडक लोक माझ्या पोस्टिंवरुन उड्यामारुन न वाचता जाता हे माहित आहे, पण निदान जेव्हा पोस्ट चुकुन माकुन वाचलित, तर वाचता वाचता अधल्यामधल्या वाक्यांवरुन उड्या मारुन जाऊ नका... जसे लहानपणी इतिहास/भुगोलाची पुस्तके वाचताना केले जायचे.... Wink

नीरजे, तुला तितकेच सोईस्कर तेव्हडे दिसणार....
>>>> शिवाय इस्टेटिचे काय केले हे देखिल बघाव एलागेल, नै तर इस्टेट मुल/सुनेच्या नावावर, राबायला मात्र मुलगी असे बरेच ठिकाणी दिसते ते देखिल व्हायला नकोय. <<<
हे वाक्य नाहीच दिसणार. नै का?

काय बोलतोयस कळतंय का?
समजा नसेलच इस्टेट तर? मग मुला-सुनेनेही फेकावे नाही का आईवडिलांना?

स्वतःपुरते जेमतेम पुरेल अशी पेन्शन यापलिकडे अनेक वृद्धांची काही इस्टेट नसते. सेविंग, इन्व्हेस्टमेंटस असे काही करणे धाकट्या भावंडांची शिक्षणे, मुलांची शिक्षणे, आईवडिलांचे करणे यामधे त्यांना शक्य झालेले नसते.
अश्या आईबापांना कुणी सांभाळावे तुझ्यामते?

शी...

व त्याचे सासरे इसवी सन २००७ मधे वारल्यापासुन त्याच्या सासु त्याचेजवळ इकडेच असतात, व हे घडवुन आणण्यात लिंबीचाच पुढाकार राहिला आहे.>>> बरोबर!! हे घडवून आणण्यात लिंबीला (म्हणजे एका स्त्रीला) पुढाकार घ्यावा लागला.

मी निव्वळ सुनांमुळे भांडणे होतात यावर भर दिला नसुन दोन पिढ्यातील फरकात मागिल पिढीस पुढिल पिढीच्या बदलत्या गरजांबरोबर जुळवुन घेणे अवघड होते यावर भर दिला आहे. व सासु/सुना दोघीही जबाबदार असतात, पैकी वरिष्ठ/वयाने ज्येष्ठ या न्यायाने सासु जास्त जबाबदार असते असेच एकंदरीत वर्णन केले आहे.>>
घरांतल्या ताणतणावांना सासू सुना जबाबदार असतात, पण मग त्या दोघींमधला दुवा - म्हणजे घरातला पुरुष - जबाबदार नसतो का? घरात सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न त्याच्याकडून का होत नाहीत?
असो!
बाफचा विषय वेगळा आहे. त्याला वेगळे वळण लागायला नको.

>>>> ण मग त्या दोघींमधला दुवा - म्हणजे घरातला पुरुष - जबाबदार नसतो का? घरात सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न त्याच्याकडून का होत नाहीत? <<<<<< Lol
आज काय सगळ्यांनीच विनोदावर विनोद करायचे ठरविले आहे का?
आई अन बायको यांच्या चिमटीमधे सापडून दामटला गेलेला, सँडवीच झालेला पुरुष घराघरात दिसेल, अन त्यास टिकुन रहायचे असेल, तर कोणा एकाची बाजु घ्यावीच लागते, व तशी घेतली की दुसरी बाजु घमासान युद्धास तयार होते हे हिंदुस्थानपुरते वैश्विक सत्य आहे. या धाग्याचा विषय नाही, पण म्हणून असोच.

वेल.. दुसर्‍याही बाजुने काहीतरी लिहिलेस याबद्दल सर्वप्रथम तुझे अभिनंदन..

आणि त्या आधीच्या धाग्यावर "आपण जिवंत असतांना आपली इस्टेट/ दागिने मुळ्ळीमुळ्ळी मुलांना देऊ नयेत" असं लिहिलंय.. तर हे मुलगा आणि सून तुमच्या घरात राहातांना..

पण जेव्हा सून स्वतःच्या पगारातुन कर्ज काढुन घर घेते आणि सासुसासरे "हे आमच्या मुलाचे घर आहे" असं सांगुन तिथे ठाण मांडतात. आणि हक्क गाजवत बसतात तेव्हा तिने काय करावे?

'नटसम्राट' एवढा गाजला.. पण तिथेही मुलगी आणि सुन या बायकांनाच खलनायक ठरवले आहे.
एकुणात काय तर.. बायकांचेच वृद्धांशी पटत नाही.

मागे कोणीतरी इथेच (मायबोलीवर) म्हणाले होते कि लग्न म्हणजे लहान मुले आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी समाजाने केलेली एक सोय. तर हि काळजी कोणी घ्यायची. बाईनेच. आणि मग तिने कधी चुकुनही कुरकुर केली.. कि सुन कजाग आहे आणि छळ करते म्हणून गळे काढायला मोकळे.

लग्नाला ३०-३० वर्ष होऊनही. घरासाठी खस्ता खाउनही "सुन बाहेरुन आलेली.. तिचा या घरात काही हक्क नाही" अश्या टाईपची वाक्य ऐकलेली आहेत.. पाहिलेली आहेत. फेसबुकवर.. "इतकी वर्ष संसार करुनही तुझ्या घरातली सुईही माझ्या मालकीची नाही" अश्या आशयाची पोस्ट पटते अश्यावेळी.

मुलगी हे परक्याचं धन.. म्हणून माहेरावर तिचा हक्क नाही.. आणि सासरी बाहेरुन आलेली.. त्यामुळे तिला कसेही वागवलेले चालते.. सुन म्हणजे एक कुठेच रुजु न शकणारं झाड आहे जणू..

आणि या सगळ्या परीस्थितिला घरातले ज्येना मुळ्ळी मुळ्ळी जबाबदार नसतात. फक्त ते वृद्धश्रमात गेले (भले मुलगा का पाठवेना) कि सुन नालायक.

अजुन एक म्हणजे सून बाहेरुन येणार.. त्यामुळे घरातल्या माणसांना जोडण्याची.. त्यांना आपला चांगुलपणा प्रुव्ह करायची.. सासरच्यांवर आपण प्रेम करतो हे दाखवण्याची सर्व जबाबदारी त्या बाहेरुन आलेल्या मुलीची.. घरातल्या वृद्धांची आयमीन मोठे.. वडीलधारे वगैरेंची नाही.

पियु , "अगदी .. अगदी" झालं गं Happy

३० वर्शाच्या संसारात काल आलेल्या सूनेने केलेले बदल चालत नाहीत. .
आणि मग , " आम्हाला काय तुमचा संसार ,तुम्हाला हवं ते करा" ,पण तो ३० वर्शाचा संसार सोडवत ही नाही.

म्हणजे शेवटी सून उपमुख्यमंत्री , फक्त नावाचचं पद , बाकी सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या हातात.

रच्याकने , बाफ वेगळं वळण घेतोय . Happy

ते अपरिहार्य आहे. बघावं तेव्हा वृद्धांच्या प्रश्नाबद्दल बोलताना मुलगा-सून आणि मेनली सून आरोपीच्या पिंजर्‍यात उभी केलेली असते.
केवळ मुलींना जन्म दिलेले आमचे आईबाप महत्वाचे नाहीतच जसे काही.

Pages