डिटॉक्स!

Submitted by mrsbarve on 13 January, 2016 - 14:27

वीकेंडच्या भटकंतीत एका लहानशा बेटावर जायचा योग आला .बोटितुन शहरापासून बेटावर पोचायला फक्त पंधरा मिनिटे लागली . हवा एकदम मस्त होती ,चमचमत्या सकाळच्या उन्हात निळ्या आकाशाखाली आणि निळ्या समुद्रात बोट चालली होती . फोटो चा क्लिक्क्लिकाट अखंड चालू होता !लोक निसर्गाच्या सानिध्यात सगळे क्षण भरभरून का नाही जगू शकत?सतत फोटो घेणं ,मोबाइल वरती सेल्फी घेणं आणि ते झालं कि मेसेजेस चेक करणं हेच चालू होतं बहुतेकांचं !

डेक वरती जाउन त्या निळाइचे दर्शन खूपच सुरेख होत होते ,पण बहुतेक जण हातातल्या मोबाइलवर आणि बरोबरच्या डिजिटल क्यामेरयावर खचाखच हजारोनी फोटो खेचत होते !आमच्याच गृप मधल्या एक दोघ जणांनी काही फोटो फेसबुकवर आणि 'वोत्साप्पावर' पण टाकले ! अरे! आधी समोरच्या या निसर्गाला भेटा जरा कडकडून ! ती नीरवता साठवा आपल्या आत!करा एन्जोय सगळं ह्र्य्दयापासुन! त्यात तरी विडीओ शुटिङ्गच्या खुळा चे तर काही विचारू नका ! मागे एका बागेत मोराने अगदी समोर येउन मस्त पिसारा फुलवला ,लोक अनिमिष नेत्राने कि काय म्हणतात तसे पाहायचे सोडून विडिओ घेण्यातच दंग!

"कॉय ग फेसबुक वर तुझा आज काल वावरच नाही ,मिस यु सो मच" म्हणून खास इमेल वर गळा काढणाऱ्या मैत्रिणीला मुद्दा म फोन केला तर तिच्याकडे नसत्या चौ कशा न्शिवाय बोलायला काहीच नव्हते हे लक्षात आल्यावर कमालच वाटली! लोक असे खरेच कोरडे का होतात ?दिखाव्याच्या फंदात फसवत रहातात स्वत:ला ?कि दुसर्यांना? का ? कशासाठी?कसली वेडी धावपळ?कसली स्पर्धा आहे का?कुणाशी? कोण स्पर्धक?कोण परीक्षक? तुम्हाला जिंकलच पाहिजेय का?ढाल कि करंडक मिळणार आहे?

आमचा मैत्रिणिञ्चा ग्रुप पण कधी कधी बोर व्हायचा त्या वोत्सापाच्या नादात म्हणजे अस व्हायचं कि फावल्या वेळात काही वेळ हे फेसबुक आणि फेस्बुकी गप्पा टप्पा ठीक आहे पण तुम्ही मैतरणी एकत्र जमला आहात आणि गप्पा मारायच्या सोडून सगळ्या आपल्या ओन्लाइन फ्रें चे मेसेजेस वाचताहेत! खरेच दिवसातून किती वेळा मेसेजेस चेक करायचे,फोन वर किती बोलायचं ,ओन्लाइन किती वेळ रहायचं,भट्कन्तित किती फोटो /किती वेळ घ्यायचे, यावर सिरिअसलि कंट्रोल हवाच!

विडिओ शुटींग करण्या आधी आपण त्या 'साईट' चे खरेच 'सीइंग' करतो आहोत का कि नंतर विडिओ पहातच अपूर्व समाधान मानत रहातोय? नाही तर हातचे क्षण सुटले आणि धुपाटणे मिरवले! असेच नाही का काहीसे ते?

कधी कधी वाटतं कि तब्येतीसाठी लोक डिटोक्स करून घेतात तसे डिजिटल डिटोक्स करून घ्यायला हवे स्वत:च स्वत:चे! दिवसातून फक्त एकदा मेसेजेस चेक करणे ,फक्त एकच पोस्ट टाकणे किंवा न च टाकणे ,सतत सेल्फ्या न काढणे,सतत फोटो खेचत न राहणे,समोर बसलेल्या फ्रेंडशी जर अशक्य नसेल तर मनापासून गप्पा मारणे ,हाताशी फोन न ठेवता! भट्कन्तितला निसर्ग मनापासुन ,उत्कटतेनअनुभवणे, इत्यादी साध्ध्या(!) गोष्टी करून पण किती फरक पडतो ,नाही का?!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे. फेबुवर तर हल्ली लोक आपल्या आनंदाचे प्रदर्शनच करतात. ते केल्याशिवाय त्यांना राहवतच नाही.

छान विषय मांडला.

अरे! मी भलतच डिटॉक्स समजून उघडल होत! मस्त विषय. गेल्याच महिन्यात नो कॅमेरा ट्रीप केली होती. निव्वळ अप्रतिम अनुभव.

छोटुसा अनै छान लेख.
मलाही वाटल डीटॉक्स,,,काहीतरी वेगळ असेन.पण हे ही तितकेच गरजेचे सध्याच्या काळात.

मी ही हाच अनुभव घेतोय. जे उघड्या डोळ्यांनी पहायचं आहे, ते मनात साठवलंच जात नाही. भारंभार फोटो काढून घेतो, आणि नंतर पुन्हा कधी ते बघतही नाही आपण, बर्‍याचदा. खरंच, डीटॉक्स करायला हवं Happy
छान मांडलंत.

हो, हे अतिच्या अति झालेय. गेलेल्या स्पॉटवर ग्रूपातल्या सगळ्यांचे मनसोक्त फोटो काढून झाले की तिथे गेल्याचा उद्देश सुफळ संपूर्ण. त्या फोटोच्या पलीकडे काय आहे, हे बघायची आवश्यकता भासत नाही. कारण मग लगोलग नाक्यांवर स्टेटस अपडेट टाकण्यातला चार्म शिळा होईल ना!