रहस्यमय हिंदी चित्रपट

Submitted by अंजली on 12 January, 2016 - 10:59

रहस्यमय / थ्रिलर हिंदी चित्रपटांविषयी गप्पा. चित्रपटांची लिस्ट बनवता येईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुरा लिया है तुमने हा मी आजवर (पैसे देऊन) बघितलेला सर्वात वाईट चित्रपट आहे! Sad

अहल्या ओव्हरहाईप्ड आहे! अनेक अनुत्तरित प्रश्न राहतात. रहस्यकथेच्या शेवटी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं जे अहल्यामध्ये मिळत नाही. राधिका आपटेसाठी बघायचा असेल तर गोष्ट वेगळी Happy

शॉर्ट फिल्म चालत असतील तर अजून एक.... राधिका आपटेची 'अहल्या'>>>
भारी आहे हां .. फिल्म आणि राधिका आपटे , दोन्ही . Happy

मला जे सगळ्यात बेस्ट वाटले ते 'शेरलोक होम्स', 'शटर आयलंड', जेम्स बॉन्ड' आणि 'द विकर मॅन' सिनेमे.
याशिवाय टॉम क्रुझच्या 'मिशन इमपॉसिबल' सीरिजही एक से बढकर एक आहेत. गुगलवर सर्च केलेत तर अनेक सस्पेंन्स थ्रिलर सिनेमे दिसतील.
http://www.imdb.com/list/ls050884649/

कहानी
भुलभुलैय्या
कार्तिक कॉलिंग कार्तिक
वझीर
दिवानगी (अजर देवगण आणि उर्मिलाचा)
चेकमेट / रिंगा रिंगा (मराठी)

फिल्म आणि राधिका आपटे , दोन्ही>> एकदम बरोबर Happy
मुळात शेवट इतका अनपेक्षित आहे , की असं का होतं, होऊ शकतं का असले प्रश्न पडलेच नाहीत !

रत्नाकर मतकरींच्या बंद घड्याळाचे टोल असलेल्या एका कथेवर एक शॉर्ट फिल्म आहे. पण मराठीत. इथे चालेल का ?

पुर्वी काही चित्रपटात एखादा कलाकाराच रहस्य असायचा..

खामोशी मधे धर्मेंद्र, ऊंचे लोग मधे विजया चौधरी, कोहरा मधली सहनायिका, यादे मधे नर्गिस... हे सर्व कलाकार त्या चित्रपटात होते, तरीही त्यांचा चेहरा कधीच दिसत नाही.

खामोशी मधे धर्मेंद्रचा चेहरा न दाखवण्याची कल्पना खूप आवडली.
नंतर धर्मेंद्रचे फोटो सर्च करून पाहून घेतलं की त्या सिनेमात तो नेमका कसा होता ते .. Proud

पडछाया की पाठलाग मध्येही एका टोपीवाल्याची फक्त सावलीच दाखवितात. बेनाम मध्ये बराच वेळ खलनायक दाखवित नाहीत पण त्याचा आवाज ऐकवितात. शेवटी कळते की तो प्रेम चोप्रा आहे पण चित्रपटभर त्याकरिता कादर खानचा आवाज वापरला आहे. प्रत्यक्ष चित्रपटात कादर खान नाही. शेवटी आवाजावरून नायक खलनायकाला ओळखतो त्या दृश्यानंतर मात्र प्रेम चोप्रा स्वतःच्याच आवाजात बोलतो मग आधी त्याकरिता कादर खानचा आवाज वापरण्याचा हास्यास्पद प्रयत्न कशाकरिता? अर्थात तरीही चित्रपट यशस्वी झालाच.

Pages