काळचक्र

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 11 January, 2016 - 02:16

भूतकाळातल्या विचारांत हरवायचं
भविष्यकाळातल्या विचारांत रमायचं ....
आणि मग काय ?
वर्तमानकाळात फक्त रडायचं.

भूतकाळ परत येणार नाही .
भविष्यकाळ येईल का याची शाश्वतीही नाही..
आणि अस कुठवर ?
वर्तमानकाळ हि घडणार नाही.

काळचक्र हे असच चालू राहणार
त्याचा क्रम आपण का हो बदलणार ?
भूत, वर्तमान, भविष्य असच चालावं..
अन त्यानेच जीवन घडत रहाव.

आजचा वर्तमान हा उद्याचा भूतकाळ आहे,
उद्याचं भविष्य हे आजच वर्तमान होणार आहे..
विचारचक्रात अडकून काय साध्य होणार आहे?
अरे...
वर्तमानाला महत्व द्या कारण आयुष्य जगायचं आहे.

….मयुरी चवाथे - शिंदे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users