फुसके बार – ०९ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 8 January, 2016 - 14:17

फुसके बार – ०९ जानेवारी २०१६

१) नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर नॅनो कारची कहाणी दाखवली. बंगालमध्ये नॅनो कारचे उत्पादन काही आठवड्यांवर येऊन ठेपलेले असताना ममता बॅनर्जींच्या बेजबाबदारपणामुळे टाटांना नॅनोचा कारखाना तेथून हलवावा लागला. त्यानंतर त्यांनी विक्रमी वेळात म्हणजे केवळ एका वर्षात गुजरातमध्ये या कारचे उत्पादन चालू केले.

गुजरातमध्ये हा कारखाना हलवण्याचे ठरल्यावरचे सर्वात मोठे आव्हान होते ते तेथे असलेल्या मनुष्यबळाचा विकास करणे. तेथील स्थानिक लोकांना नटबोल्ट टाइट करण्यापासूनचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना कामाच्याबाबतीत आत्मविश्वास मिळावा, कामावर लक्ष केंद्रित करणे शक्य व्हावे याकरता त्यांना ध्यानधारणेचेही शिक्षण देण्यात आले.

अखेर इतक्या विक्रमी वेळात हा प्लॅंट गुजरातमध्ये कार्यांनवित करण्यात आला.

कम्युनिस्ट जाऊन तृणमूल कॉंग्रेस येणे म्हणजे बंगाली लोकांच्या नशीबी आगीतून सुटका झाली तरी फुफाट्यात जाणेच असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सिद्ध केले. गुंडांच्या जागी महागुंड आले. दळभद्रीपणाचे दुसरे नाव ममता बॅनर्जी.

२) माल्दाचा हिंसाचार

पूर्वी बंगालमधील माल्दाचे नाव गनिखान चौधरी या कॉंग्रेसी खासदाराच्या या मतदारसंघामुळे प्रसिद्ध होते.

यावेळी मात्र ते चुकीच्या कारणासाठी प्रकाशझोतात आले आहे.
उत्तर प्रेशातील हलकट नेता आझम खाने याने संघाच्या नेत्यांना होमोसेक्स्युअल म्हटल्यावर हिंदू महासभेचा नेता म्हणवणा-या कमलेश तिवारीनेही प्रेषिताबद्दल तसेच अनुद्गार काढल्याबद्दल माल्दामध्ये मुस्लिमांचा जवळजवळ अडीच लाखांचा मोर्चा काढण्यात आला व त्यात सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान करण्यात आले. हे नुकसान आपण कल्पनाही करू शकत नाही इतके प्रचंड आहे. त्या परिसरातले पोलिस ठाणेही त्यात जाळण्यात आले. पोलिसांची व बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची वाहने जाळली गेली. जवळच्या रेल्वे स्टेशनची नासधूस करण्यात आली. परिसरातील काही हिंदू मंदिरे जाळली गेली वा त्यांची नासधूस करण्यात आली असेही काही ठिकाणी वाचण्यात आले.

या तिवारीला द्वेषमूलक भाषणे करण्यावरून हा हिंसाचार होण्याच्या आधीच अटकेत टाकल्याचे कळते.

इतक्या प्रचंड प्रमाणात झालेला हा हिंसाचार पाहता अडीच लाखांच्या हिंसक जमावाकडून काय होऊ शकते याचा प्रत्यय आला. सलग तीन दिवस कमीअधिक तीव्रतेने हा प्रकार चालू होता असे दिसते.

बांगला देशातील घुसखोरांमुळे बंगालची मान वाटावी अशा या भागातील काही जिल्हे मुस्लिमबहुल झालेले आहेत असेवाचण्यात येते. त्यांना भारतीयत्वाशी काहीही घेणेदेणे नाही. हा भाग टाइमबॉंबवर बसलेला आहे.

ममता बॅनर्जीसारख्या दळभद्र्या व स्वार्थी राजकारण्यांमुळे देशहिताला प्राधान्य मिळणे शक्य होणार नाही. केन्द्र सरकार जीएसटी सारख्या प्रलंबित बिलांमुळे बॅनजींसारख्याची मनधरणी करत आहे. त्यात देशहिताला तिलांजली दिली जात आहे.

विधानसभेत अर्थमंत्री अमित मित्रा व संसदेत डेरेक ओब्रायन हे त्यातल्या त्यात सभ्य चेहरे पुढे करून ममता बॅनर्जी मागच्या दरवाजाने केंद्र सरकारपुढे व पर्यायाने देशापुढे खूप घातक आव्हान निर्माण करत आहेत. कारण तेथील मुस्लि मतदार ही त्यांची व्होटबॅंक आहे.

केन्द्र सरकारने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काबूत न राहणारी राज्य सरकारे बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रकार अलीकडे जवळजवळ बंदच झालेला आहे. ते हत्यार वापरायचे झाले तर तातडीने बरखास्त करण्याच्या योग्यतेचे म्हणावे असे ममता बॅनर्जी यांचेच सरकार असेल असे म्हणता येईल.

आपल्याकडे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा ठेका परंपरेने शिवसेनेकडे आहे. अलीकडे शेतकरी संघटनांच्या काही आंदोलनांमध्येही अशी नासधूस होताना दिसते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या सर्वात अभ्यासू म्हणवल्या जाणा-या शिवसेनेच्या नेत्या नीलम गो-हे यांचे व त्यांचेच दुसरे एक नेते नार्वेकर यांच्यातले एस.टी. महामंडळाची बस जाळण्याबद्दलचे संभाषण कैद करण्यात आले होते. त्यावर आजतागायत काही पक्की कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.

माल्दाचा हा भयंकर प्रकार काहीही प्रभावी कारवाई न होता विसरला गेला तर भविष्यात अशा प्रकारांची वारंवार पुनरावृत्ती होईल यात शंका नाही. मागे म्यानमारमधील मुस्लिमांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता व त्यात बरेच अभद्र प्रकार झाले होते. आताही सदर वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशात झालेले दिसते तर त्याची अशी भयानक प्रतिक्रिया झालेली दिसेते ती बंगालमध्ये. त्यातला मतितार्थही लक्षात घेतला पाहिजे.

३) माधव विद्वांस यांच्या दिनमहिमा या सदरामधून काही इंटरेस्टिंग आठवणी कळत असतात.

“१९५७ - गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.”

बाकी कोणी नाही, पण थेट अण्णादुराईंनी पोरतुगालमधील तुरूंगात खितपत पडलेल्या मोहन रानडेंच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे हेही विशेष. वर इंटरेस्टिंग आठवणी असे म्हटले, तरी रानडे व त्यांच्याबरोबर ही शिक्षा सोसणा-यांनी सोसलेल्या हालांची कल्पनाही करू शकत नाही.

“१८८० - सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्ची न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.”

याच यादीमध्ये ८ जानेवारीचा वरीलप्रमाणे आणखीही एक उल्लेख आहे. अशा बाबींमध्येही न्यायालयाची मोहर लागते हे आज कदाचित आश्चर्यकारक वाटेल. तेव्हा मात्र या बातमीचे महत्त्व फार मोठे असणार.

४) अॅबर्डीनला नुकताच गेलेलो असताना आपल्याकडे जसे पावभाजी किंवा वडापावचे स्टॉल्स दिसतात; अगदी तेवढे नाहीत तरी तशा फिश अँड चिप्सच्या ब-याच गाड्या दिसत. त्यावरून तिथल्या माझ्या ब्रिटिश मित्राला रोजचे इंग्लिश फुड कशाला म्हणता येईल असे मोठ्या उत्सुकतेने विचारले.

त्याने आवंढा गिळल्याचे स्पष्ट दिसले. थोडा विचार करून तो म्हणाला की वेऽऽल, वुई हॅव करी, वुई हॅव पास्ता, वुई हॅव पिझ्झा. वुई हॅव ग्रेट व्हरायटी, यु नो!

५) पुन्हा एकदा लग्न – जेवणाचा मेनु ठरवणे

बाकी सारे जमले तरी लग्नात मेनू काय ठेवायचा यावरून दोन पक्षात वाद होऊ शकतात. त्यातही जर वधुपक्षाने सगळा खर्च करायचा असेल तर वरपक्षाचा ताठा पाहण्यासारखा असतो. भाजी-उसळ कोणती हवी याबरोबरच गोड पदार्थ कोणता हवा हा वादाचा मुद्दा असतो. एका बैठकीत एका सासुबाईंचे मला हा पदार्थ आवडतो, आमच्या याला (म्हणजे नवरदेवाला) तर हा गोड पदार्थ चालतच नाही, असे चालले होते. तेव्हा अमुकच हवे, तमुकच हवे असा प्रकार चालला होता. अर्थात त्या प्रकारात वधुच्या पित्याचा खिसा आणखी रिकामा होणार होता. अगदी मान्य होणार नाही इतपत exploitation चालले होते.

यावरून सहसा लग्न मोडण्याचा धोका नसतो, पण तरी वधुकडचे कोणीतरी खमके लागतेच. विविध प्रकारे सांगूनही सासूबाई ऐकत नाहीत हे पाहिल्यावर वधुकडचे एक काका म्हणाले की ‘तुमचे म्हणणे अगदी मान्य’. सासूबाई खुष. पणे ते पुढे म्हणाले, ‘नाही तरी नवरदेवासह तुम्ही शेवटीच जेवायला बसणार. त्या पंगतीला अगदी पंचपक्वान्ने ठेवू. तुमच्या व जावईबापूंच्या आवडीचे सगळेच त्यात येईल. मग तर झाले?’

स्वत:च्या व मुलाच्या आवडीच्या नावावर आपल्याकडच्या सगळ्या व-हाडींना तो महागाचा मेनू वधुकडच्यांना द्यायला लावून स्वत:चा ताठा मिरवू पाहणा-या सासूबाईंचा चेहरा खर्रकन उतरला. त्यांना बोलायला जागाच राहिली नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा दिवस साक्षात्काराचा दिवस होता.

एका हस्पिटलात लोकम ड्युटी करायला गेलो होतो.. एक मध्यमवयीन मुस्लिम पेशंट आला... दोन दिवसापुर्वी पाय मुरगळून गुढग्याला इन्जुरी झाली होती.

हे बोलुन झाले की लोक जनरली ज्या अ‍ॅक्शनमध्ये प्रॉब्लेम येतो , ते बोलतात... जीना चढता येत नाही , चालता येत नाही , उठता येत नाही इ इ इ ...

त्याची पहिली तक्रार ..... साहाब , नमाज पढने को नही आता !

( आमचा गुढगा मोडला तेंव्हा आमच्या चिंता ... चालता येइइल का , रेल्वेतून जाता येइल का , उठता येइल का इ इ होत्या ... )

नॅनो च्या वेळेस ती फॅक्टरी महाराष्ट्रातही आणण्याचे प्रयत्न सुरू होते असे वाचले होते. त्याचे नक्की काय झाले? टाटांनी भोसरी/पिंपरी/चिंचवड मधे पहिल्यांदा ट्रक्स साठी व नंतर कार्स साठी (इंडिका) अनेक छोटे मोठे उद्योग तयार व्हायला मदत केली होती. साधारण किमान हजार एक- बहुधा जास्तच- असे उद्योग निर्माण होण्यात टाटांची मदत झाली असेल (टेल्को - टाटा मोटर्स). तो सगळा बेस तयार असताना नॅनो फॅक्टरीला ते सहज वापरता आले असते. भोसरी-चाकण भागात जमीनही मुबलक होती, निदान तेव्हा तरी. मग हे का झाले नाही कोणास ठाऊक.