नंतर

Submitted by जयदीप. on 5 January, 2016 - 12:15

नेईल कुठे ही वणवण नंतर
सांग, कुठे पोचू आपण नंतर

तू घे शेवटचा निर्णय आता
येईल तुलाही दडपण, नंतर

लागेल तुला बदलावे धोरण
का तू अाधी अन् आपण नंतर

सध्या मी पाळत ठेवत आहे
ठेवीन तुझ्यावर राखण नंतर

जय, आज तुला पटणारच नाही...
देईन तुला मी कारण.....नंतर!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>लागेल तुला बदलावे धोरण
का तू अाधी अन् आपण नंतर

सध्या मी पाळत ठेवत आहे
ठेवीन तुझ्यावर राखण नंतर

जय, आज तुला पटणारच नाही...
देईन तुला मी कारण.....नंतर!<<<

वा! मक्ता विशेष!

मतलाही छान - पण मतला वाचून 'नंतर' ह्या रदिफेच्या आवश्यकतेबाबत विचार आला मनात

'नंतर' तो 'नंतर' आवश्यक होईल हे माहीत आहे.

Happy

रदीफ कफियाचे कॉम्बीनेशन (ण,नंतर) कानाला खटकत आहे.

राखण ठेवणे असा वाक्प्रचार अभिनव असला तरी 'राखण करणे' असा प्रचलित आहे.

गझल आशयाच्या अंगाने बरी आहे.

सहीच आहे कविता. मी कविता म्हणून वाचली ती जास्त आवडली. गझल मला ऐकायला आवडतात गाण्याच्या रुपात. वाचायला मात्र कविताच जास्त आवडतात Happy