चंदनी

Submitted by मी प्राजक्ता on 5 January, 2016 - 03:38

पुन्हा पुन्हा उगाळते मी,तेच खोड चंदनाचे...
चंदनाचे हात माझे श्वास होती चंदनाचे...

एक एक चांदणी मी, जड हातानेच पुसते.
तरी पुन्हा पुन्हा नव्याने,तीच आकाशात दिसते.

काळोखाच्या गोधडीने बनवलेले एक पोते,
चंदनी चांदणे मग, ठासुनी मी त्यात भरते

तटतटून एक धागा,पुन्हा उसवतोच नेहमी,
प्रकाश चंदेरी पुन्हा मग,विखरुनी मनात भरतो.

गंध येतो चंदनाचा,या अनोख्या चांदण्याला
पुन्हा पुन्हा उगाळते मी, आठवांच्या चंदनाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

५ x १/६

* चंद्रावर कुठल्याही वस्तूचे वजन पृथ्वीवरील वजनाच्या १/६ पट असते हा संदर्भ विचारात घेऊन गुणांकन केलेले आहे ह्याची नोंद घ्यावी.

ही कविता मी आधी पोस्ट केली आहे. कवितेचं शिर्षक 'चंदनी 'असं आहे. गंध हा शब्द छान वाटेल. कापोचे,harshalc, प्रकु आणि आत्ममग्न धन्यवाद. धन्यवाद x1/6.