वाटते खोटी , खरी आहे

Submitted by जयदीप. on 3 January, 2016 - 14:12

वाटते खोटी, खरी आहे
आपल्यामध्ये दरी आहे

एक तप होईल या वर्षी
तीच माझी नोकरी आहे

मावशी म्हणणे बरे नाही
ती हवाई सुंदरी आहे

थांबलो होतो तुझ्यासाठी
चाललो मीही घरी आहे

लागली आहे सवय, कळले
हीच पहिली पायरी आहे

चांगले वाटेल की नाही
वेगळे काहीतरी आहे

.....जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्यामध्ये दरी आहे ही ओळ आणि शेवटचा शेर छान.

सहज लिहिताना कधी कधी काही शेर उथळतेकडे झुकू शकतात. पण गंमत म्हणून तेही करायला हरकत नाही.