फुसके बार – ०३ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 2 January, 2016 - 15:29

फुसके बार – ०३ जानेवारी २०१६

१) अमेरिकेतल्या साहिलचे आई-वडील तेथे स्वतंत्र व्यवसाय करतात व ब-याचदा घरून काम करतात. साहिलच्या घरात चित्रकला, स्थापत्य, मूर्तिकलेचे अनेक चित्रग्रंथ आहेत. त्यात मोने, वॉन गॉग, रोंदॉ असे प्रतिभावंत आहेत. लॉरा ही साहिलची बेबीसिटर. तिने दोन वर्षांच्या साहिलला एकेका चित्रावर बोट ठेवून मोने, रॉकवेल असे म्हणायला शिकवले आहे. त्याचे डॅडी त्याला चित्रे दाखवून रमवतात. एखादे चित्र आवडले की का सुरात दाद देतात, “ओहो, वॉव”. वसंत ऋतुतील एका दिवशी सारेजण नदीकाठच्या इटालियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. काचेच्या विस्तृत तावदानातून पलीकडच्या विलामेट नदीचे विस्तृत पात्र दिसत होते. पांढ-या शिडांच्या नावा तरंगत होत्या. नदीत आकाशातल्या ढगांचे प्रतिबिंब पडले होते. थोड्या वेळाने आकाशातले रंग बदलले, हलत्या पाण्यावर हलु मोडु जुळु लागले. उंच खुर्चीत बसलेला साहिल पुढ्यातले खाणे सोडून मोने मोने म्हणू लागला. आरंभी मोठ्यांच्या लक्षात आले नाही. घरी आल्यावर साहिलने चित्रांचा अल्बम उघडला आणि विशिष्ठ चित्रावर बोट ठेवले. चित्रात अगदी तसाच देखावा होता. कागदाच्या झेंड्यासकट. वा-यामुळे विस्कटलेला.

पद्मजा फाटक यांनी गर्भश्रीमंतीच्या झाडापाठोपाठ रत्नाचे झाड आपल्याला दिलेले आहे.

ज्या मुलांचे लहानपण अशा वातावरणात जाते ती किती नशीबवान?

अन्यथा आजचे बहुतेक आई-बाप मुलांना बिझी ठेवण्यासाठी त्यांच्या हाती व्हिडियो लावून मोबाइल फोन देतात.

आधुनिक आई-बाप. पण त्यांना आई-बापाची मूलभूत कर्तव्ये तरी समजतात असे वाटते का?

याच पुस्तकात सहज अंमलात आणता येतील अशी भरपूर आणखी उदाहरणे आहेत. अगदी भारतातलीदेखील.

वाचा जरूर.

२) पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील हल्ल्यामुळे पाकिस्तानला म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अचानक भेटणारे आपले पंतप्रधान मोदी तोंडघशी पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजकारण्यांनी मधूनमधून कितीही चर्चेची नाटके केली तरी पाकिस्तान सरकारच्या नाकातली खरी वेसण ही तिथल्या लष्कराच्या ताब्यात आहे हे पुन:पुन्हा स्पष्ट होत आहे.

यावरचा उपाय म्हणजे यापुढे राजकारण्यांच्या भेटीमध्ये दोन्ही देशांच्या लष्करप्रमुखांनाही सामील करावे. त्यानंतरही भारतात दहशतवादी कारवाया झाल्याच तर पाकिस्तानातल्या परिस्थितीवर तेथील लष्कराचेही नियंत्रण नाही हे दाखवणेही पाकिस्तानच्या लष्करशहांना अवघड वाटणारे व लाजीरवाणे ठरेल.

अर्थात हाही उपाय बहुतेक फसेल. मात्र एक फायदा होईल, राजकारण्यांच्या भेटी तरी बंद होतील. कारण आता देशवासियांना द्यायला त्यांच्याकडे चर्चा, संबंध सुधारणे वगैरे पोकळ दावे नसतील. त्यामुळे सध्या चालू असलेली नाटके थांबून काही नवीन तरी निष्पन्न होऊ शकेल.

३) थंडीचे दिवस आले आणि स्टॅटिक चार्जमुळे शॉक बसण्याचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे गाडीच्या दरवाजाचे धातुचे हॅंडल असो, धातुचे दरवाजे असोत किंवा पाण्याचा नळ असो, हात लावला की शॉक बसायचे प्रकार सुरू. रात्रीच्या वेळी हा शॉक बसतानाची वीज अगदी स्पष्ट दिसते. त्यामुळे असा हात लावायचा तर शॉक बसण्याची भीती. त्यामुळे भलेभलेही या प्रकारामुळे कॉन्शस झालेले दिसतात. कशाला हात लावण्यास टाळाटाळ होताना दिसली की समजायचे याला स्टॅटिक चार्जच्या शॉकची भीती वाटते आहे.

यावरचा सोपा उपाय म्हणजे ज्यांना हा त्रास होतो त्यांनी धातुच्या वस्तुंना बोटाना स्पर्श करण्याऐवजी हाताच्या तळव्याने स्पर्श करणे.

४) चने के पेड पर चढाना या अर्थाची म्हण मराठीतही आहे. या म्हणीचे मूळ भारतीयच आहे की भारताबाहेरचे?

५) कट्यार, दिलवाले, बाजीराव मस्तानी व आता नटसम्राट यांच्याकडून काहीही अपेक्षा नसताना आवर्जून पहावा असा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

आधुनिक शेरलॉक होम्सच्या चौथ्या सिझनचा पहिला भाग उपलब्ध झाला आहे.

६) आज शनिवार असूनही रेस्टॉरंटसमोरील गर्दी कमी होती. थंडीचा परिणाम म्हणावा की ३१ डिसेंबर नुकताच साजरा झालेला असल्यामुळे पुणेकरांनी चक्क ब्रेक घेतला?

अन्यथा शनिवार-रविवारी घरी जेवणे म्हणजे पाप समजणारे पुणेकर रेस्टॉरंटच्या रांगेत तास न तास घालवतील, पण घरी जेवणार नाहीत. असे बरेचसे पुणेकर चक्क घरात?

७) नियोजित साहित्यसंमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बेजबाबदार वक्तव्य केले खरे, आता त्याची प्रतिक्रियाही तशीच टोकाची होऊ लागली आहे.

साहित्य संमेलन उधळून लावण्यापासून स्वत: सबनीस यांना धमक्या येऊ लागल्या आहेत.

एकाचा निषेध करण्याचे धड समाधानही हे दुस-या बाजूचे लोक मिळू देत नाहीत. तर मग आपण तरी का कशाबद्दल वाईट मानून घ्यायचे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या लोकसत्तेतील अग्रलेख वाचा त्यात सम्मेलनाध्यक्ष सबनीसाना चान्गले टोले हाणले आहेत.
पठाणकोटवरल्या हल्ल्याच्या बातमीवर आलेल्या पाकिस्तानी व्रुत्त्पत्रात आलेल्या कोमेन्ट वाचल्या त्यात अनेकानी असे लिहिले आहे की या हल्ल्यात भारतीय टेररिस्ट सन्घटनान्चा हात आहे. त्यात शिवसेनेचा उल्लेख आहे.

यावरचा उपाय म्हणजे यापुढे राजकारण्यांच्या भेटीमध्ये दोन्ही देशांच्या लष्करप्रमुखांनाही सामील करावे. त्यानंतरही भारतात दहशतवादी कारवाया झाल्याच तर पाकिस्तानातल्या परिस्थितीवर तेथील लष्कराचेही नियंत्रण नाही हे दाखवणेही पाकिस्तानच्या लष्करशहांना अवघड वाटणारे व लाजीरवाणे ठरेल.

अर्थात हाही उपाय बहुतेक फसेल. मात्र एक फायदा होईल, राजकारण्यांच्या भेटी तरी बंद होतील. कारण आता देशवासियांना द्यायला त्यांच्याकडे चर्चा, संबंध सुधारणे वगैरे पोकळ दावे नसतील. त्यामुळे सध्या चालू असलेली नाटके थांबून काही नवीन तरी निष्पन्न होऊ शकेल.>>>>> हे लय भारी! पण काहीच उपयोग होणार नाही हे खरे. तिथल्या दहशतवाद्याला त्याची आईच सान्गते की बाबारे मरायच्या आधी काहीतरी खा. म्हणजे जस काय खर युद्ध सुरु आहे, आणी हे भेकड, सैनिक म्हणून इकड मरायला येतय.

अमेरिकेतल्या साहिलचे आई-वडील >>> कुठल्या साहिलचे लिंक द्याल का ?

आमच्या बाबतित तर असे काही नाही आहे. सगळे फावल्या वेळात मोबाईल मध्ये डोके खुपसुन असतात.

साहिल,

हा हा हा. तर मग तुम्हाला त्यांचे रत्नांचे झाड हे पुस्तक वाचावे जागेल.