फुसके बार – ०२ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 1 January, 2016 - 15:23

फुसके बार – ०२ जानेवारी २०१६

१) शेअर बाजाराबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यानांमध्ये सांगितले जाणारे किस्से
चंद्रशेखर ठाकूर हे शेअर बाजाराबद्दलचे मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध तज्ज्ञ, त्यांच्या व्याख्यानांमधून ते अनेक किस्से सांगत उपस्थितांचे मनोरंजन करत उपयोगी माहितीदेखील सांगतात.

त्यांच्या एका व्याख्यानानिमित्त भोपाळला दिलेल्या भेटीच्या वेळचा एक किस्सा त्यांनी सांगितला. तेथे एका चहाच्या टपरीवाल्याकडे कोणत्या तरी बॅंकेच्या सौजन्याने असा फलक लावलेला पाहिला. त्यांनी त्याला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की त्या बॅंकेचे कर्ज केव्हाच फेडलेले आहे. मात्र माझ्याकडे उधारीवर पैसे मागणारे अनेकजण आहेत. त्यांना कटवण्यासाठी मी त्या फलकाचा आजही उपयोग करतो की माझ्यावरच कर्ज असताना मी तुला उधार कोठून देऊ?

अगदी सामान्यातली सामान्य व्यक्तीही कशी हुशार असू शकते याचे हे उदाहरण.

२) किल्लारीला झालेल्या भूकंपाच्या वेळची ही आठवण. माझ्या एका मित्राचा तेथे असलेला तीन फुटी जाडीच्या भिंती असलेला दगडी वाडा पाडून त्यांनी आधुनिक पद्धतीचा बंगला बांधला होता. त्याची वास्तुशांत केली आणि त्यानंतर एकाच महिन्यात भूकंप होऊन नव्याने बांधलेला हा बंगला जमीनदोस्त झाला.

ते या नैसर्गिक आपत्तीने खचले तर नाहीतच. उलट त्यानंतरही त्यांनी हिमतीने अनेक इमले बांधले. अशाच का इमल्याची गोष्ट कदाचित येत्या चार-पाच महिन्यात सविस्तार सांगू शकेन. त्या सुमारास त्यांनी हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाला जाईल.

३) आज माझ्या मित्राच्या एका पोस्टमध्ये त्यांच्या देशविदेशातील प्रवासाच्या भरगच्च कार्यक्रमातूनही ते त्यांची मिसळीची आवड कशी जपतात याबद्दल लिहिले आहे.

त्यावरून आठवले, फलटणला एके ठिकाणी (मला वाटते श्रीराम मिसळ) मिसळ खायला थांबलेलो असताना ज्यांना पहिल्या घासाचा आस्वाद घेतल्याक्षणीच त्यात मीठ किंवा साखर कमी आहे असे वाटते, त्यांच्यापैकी एकाने थोडे मीठ मागितले. तर मालक म्हणाला, काय राव, जरा दोन-तीन घास जाऊ दे पोटात, (नाकातून ओठावर आले की) मीठ बरोबर वाटेल. आता वेगळे मीठ घेतले तर नंतर खारट लागेल.

४) सोलापुरातल्या शेंगदाण्याच्या चटणीचे प्रस्थ जरा जास्तच झालेले आहे. अशा पदार्थांचे ब्रॅंडिंग होऊन उद्योजकांना त्याचा योग्य मोबदला मिळावा ही अपेक्षा रास्तच आहे.

मात्र, सध्या अशा चटणीला लाल रंग दिसण्याच्या ग्राहकांच्या हव्यासापोटी त्यात रंग घालणे, चटणीला तेल सुटल्यासारखे दिसावे म्हणून ती व्यवस्थित न कुटता त्यात थेट तेलच घालणे असेही प्रकार सर्रास चालू आहेत.

५) पुण्यात दरदिवसाआड पाणी येते. त्यामुळे पाण्याअभावी अनेक महाविद्यालयांमधल्या मुता-यांची अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे.

त्यामुळे काही विद्यार्थी विशेषत: मुली शेजारच्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन त्या भयंकर वासापासून थोडीफार सुटका करून घेतात. हे विद्यार्थी यांचे एरवीचे नेहमीचे गि-हाइक असल्यामुळे अजून तरी रेस्टॉरंटमालकांच्या चेह-यावर आठ्या दिसत नाहीत.

पण हेच कायम राहिले तर लवकरच ‘एक कप कॉफीवर किंवा अमुक रकमेच्या बिलावर प्रसाधनगृहाचा वापर मोफत’ अशी पाटी दिसेल यात शंका नाही.

६) साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वी श्रीपाल सबनीस हे फारसे परिचित नव्हते. निवडणुकीनंतर त्यांची ग्रंथसंपदा दाखवल्यावर एवढे लिहूनही ते आपल्याला माहित कसे नव्हते याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

आज पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना मात्र ते ज्या आवेशाने बोलत होते, त्यावरून त्यांचे नक्की काय बिनसलेले आहे हे कळायला मार्ग नव्हता. पंतप्रधानांच्या पाकिस्तानला अचानक दिलेल्या भेटीवरून बोलताना तर ते या विषयात किती कच्चे आहेत याचीच त्यांनी प्रचिती दिली. शिवाय मोदींना गोध्रा दंगलीबद्दल ते कलंकीत समजतात, त्यांच्या त्या मतात फरक पडलेला नाही असे ते म्हणाले. मात्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावर जे चांगले काम केले आहे ते पाहणे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.

याबाबत लोकसत्तातील वृत्त हे फारच मवाळपणे दिले आहे तर महाराष्ट्र टाइम्समधील वृत्तात त्यांचे प्रत्यक्ष शब्द दिले आहेत. नंतर टीव्हीवर पाहतानाही त्यांच्या भाषेतला आक्रमकपणा दिसला. या सर्वाची आवश्यकता होती का? की जाहिरपणे बोलताना ते असेच वाहवत जातात? आता त्यांच्या विधानांवरची प्रतिक्रिया देतानाही त्यांची यात काहीच चूक नाही असे ते आग्रहाने सांगत आहेत. पंतप्रधान मोदींचा वारंवार एकेरी उल्लेख करण्याबद्दलही त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नाही.

तेव्हा सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची ही त्यांची नेहमीचीच पद्धत आहे की काय हे त्यांच्या पुढील वक्तव्यांवरूनही कळू शकेल. मोदींना तत्वत:च नव्हे अगदी कडवा विरोध असला, बोलण्यात रांगडेपणा असला तरी समजू शकतो, मात्र आजची त्यांची वक्तव्ये साहित्य संमलनाध्यक्षपदाबरोबर जी जबाबदारी येते त्यादृष्टीने फार आश्वासक वाटत नाहीत हे निश्चित.

७) कट्यारपाठोपाठ नटसम्राटमध्येही लेखनाच्याबाबतीत भरपूर अभिव्यक्तिस्वातंत्र्य घेतलेले दिसते. तेव्हा पुन्हा एकदा मूळ नाटकाची या सिनेमाशी तुलना करू नका असे सांगायलाही मोकळे. आता बेलवलकरांचा एक मित्र दाखवावा लागणे म्हणजे तत्सम बदल दाखवणे याचे कारण आजच्या काळात त्यांच्या एकट्यावर सिनेमा बेतणे शक्य नव्हते हे आहे की काय असे वाटते.

बाकी या सिनेमाचे पैसे दुष्काळग्रस्तांना देणार आहेत, या एका कारणासाठी हा सिनेमा पाहण्याची गरज नाही.

हवे तसे अभिव्यक्तीस्वातंत्र्य घेणा-यांचे आम्ही काही देणे लागत नाही. मूळ नाटकातील बेलवलकरांच्या भुमिकेचे इतर पात्रांच्या मानाने असलेले वेटेज व या सिनेमातले वेटेज यांची तुलना करा, म्हणजे हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य कोणत्या थराला गेले अहे याची कल्पना येईल.

वर सिनेमा कसाही असो, त्या निमित्ताने नव्या पिढीला या नाटकाची व शिरवाडकरांच्या प्रतिभेची ओळख तरी होईल हा युक्तिवाद आहेच की.

यातला धोका असा की यापुढेही मागे गाजलेल्या कलाकृतींना नाना, विक्रम गोखले यांचा मुलामा देत अशीच तोडमोड करण्याचा परवाना या पब्लिकला मिळेल असे वाटते.

मी अजूनही वाट पाहतो आहे की त्याकाळातल्या या म्हाता-याचे वर्णन आजचा कोणी त्याच्या मेडिकल ‘कंडिशन’च्या आधारावर वा मानसशास्त्रीयदृष्ट्या करतो का? नाटकातल्या त्या काळातल्या पात्राचे वर्णन माझ्या लेखी भ्रमिष्ट असे होते व ते तेव्हाही अनेकांना आवडत नसे.

एखादे नाटक का गाजले असा नवीन पिढीला भविष्यात प्रश्न पडावा अशांपैकी नटसम्राट हे बोजड नाटक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

महाराष्ट्र टाइम्समधील या सिनेमाच्या परीक्षणामध्ये मारलेल्या काही कोलांटउड्या:

“या नव्या व्यक्तिरेखा घेताना दिग्दर्शकाने विठोबा, राजा यांसारख्या काही मूळ संहितेत असलेल्या व्यक्तिरेखांची उंची कमी केली आहे. हा चित्रपट नाटकावर बेतला असला तरी तात्यासाहेबांनी लिहिलेला 'नटसम्राट' जसाच्या तसा मांडण्याचा दिग्दर्शकाचा अट्टहास नाही. पण नाट्यानुभवाशी बरोबरी साधण्याचा.. ती मानसिकता पकडण्याचा प्रामाणिक प्रयत्न यात केला आहे. चित्रपटासाठी आवश्यक वाटणारं स्वातंत्र्य घेत यात काही प्रसंग नव्याने दिसतात. पण काहीवेळा त्याची नेमकी गरज लक्षात येत नाही.”

यावरून काही अर्थबोध होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५) पुण्यात दरदिवसाआड पाणी येते. त्यामुळे पाण्याअभावी अनेक महाविद्यालयांमधल्या मुता-यांची अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे.
त्यामुळे काही विद्यार्थी विशेषत: मुली शेजारच्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन त्या भयंकर वासापासून थोडीफार सुटका करून घेतात.

>>>

ओह्ह.. पुण्याची खरेच अशी स्थिती आहे..
मुंबईखालोखाल असलेल्या महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या शहराची अशी स्थिती असेल तर कठीण आहे.. Sad

मला आजच्या फुसक्या बारमधले सर्व मुद्दे आवडले.

पन्तप्रधान्नान्चा एकेरी उल्लेख झालेला आवडला नाही. मतभेद, वेगळे विचार असणे मान्य आहे, आणि स्वागतार्ह आहे. पण भाषा एकेरी नसावी... पन्तप्रधानान्चा दौरा ठरवण्यासाठी मोठा ताफा काम करतो, योग्य पडताळणी करुनच त्यान्नी हा धाडसी निर्णय घेतलेला होता. अचानक असे काही ठरले नव्हते.

<<किल्लारीला झालेल्या भूकंपाच्या वेळची ही आठवण. माझ्या एका मित्राचा तेथे असलेला तीन फुटी जाडीच्या भिंती असलेला दगडी वाडा पाडून त्यांनी आधुनिक पद्धतीचा बंगला बांधला होता. त्याची वास्तुशांत केली आणि त्यानंतर एकाच महिन्यात भूकंप होऊन नव्याने बांधलेला हा बंगला जमीनदोस्त झाला.>>
----- माझी एक शन्का आहे. किल्लारी येथे २९ सप्टेम्बर १९९३ रोजी झालेला भुकम्प खुप मोठा अशा प्रकारातला नव्हता, रिश्टर मापकावर त्याची तिव्रता ६.२ अशी होती. त्यामानाने जिवीत हानी आणि वित्त हानी खुपच मोठी झाली. हजारो घरे उध्वस्त झाली, १०,००० लोकान्नी प्राण गमावले.

मुख्य दोष घरान्च्या बान्धणीचा होता, घरे दगडी होती, जाड दगडी भिन्तीची होती म्हणुन भुकम्पाची तिव्रता कमी असतानाही प्रचन्ड प्राणहानी झाली.
आधुनिक पद्धतीचा बन्गला होता तर बन्गल्याची का झाली, तो जमीनदोस्त का झाला?

आजकाल प्रत्येक प्रतिसादात दुसर्यावर टिका करायची हे टीकाकाराचे लक्षण दिसुन येते. सबनीसानी हा नियम पाळलेला दिसतो. कोणाचाही उल्लेख एकेरी करु नये ती व्यक्ती मित्र नसेल तर.

नाटकातल्या त्या काळातल्या पात्राचे वर्णन माझ्या लेखी भ्रमिष्ट असे होते व ते तेव्हाही अनेकांना आवडत नसे.
>>
तेव्हाचे कशाला, आज मितीसही अगदी इथे, मायबोली वर देखील काही धागाकर्ते असे आहेत की माझ्या लेखी भ्रमिष्ट असे आहेत आणि त्या अनेक धागाकर्त्य्ना ना ते आवडणारही नाही. काय म्हणता?

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वी श्रीपाल सबनीस हे फारसे परिचित नव्हते. निवडणुकीनंतर त्यांची ग्रंथसंपदा दाखवल्यावर एवढे लिहूनही ते आपल्याला माहित कसे नव्हते याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
>>
तुम्हाला आणि तुमच्या काल्पनिक 'अनेकांना' परिचित नसतील हो कारण तुम्ही दुसर्‍याचे काही वाचीतच नाहीत ना ! महारष्ट्रातल्या साहित्यिक , सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात वावरणार्‍या लोकाना हे नाव कित्येक दशके माहीत आहे. अनेकांच्या नावाखाली तुमचे स्वतःचे वाचकीय अज्ञान कशाला दाखवताय. ? 'असे बोलले जाते, अशी चर्चा आहे, असा सूर व्यक्त होतो 'अशी पत्रकारी 'विश्वामित्री 'स्टाईल सोडा. ते अफवांचे बातमीकरण असते. स्वतःचे प्रचितीचे बोलणे लिवा पावणं !
बाकी सबनीसांचे गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले अशी अवस्था झाली आहे. बोलून झक मारली आणि आता मोदी किती धैर्याचे असा गळा काढताहेत. टेबल कागद आणि लेखणीतून अभिव्यक्त होनार्‍यांना व्यास पीठा वरील बोलण्याचे संकेत पाळता येतीलच असे नाही . ते पारावर बोल्ल्यासारखेच बोलले. 'पाद गेला निघून , अन ** धरला आवळून 'अशा इरसाल ग्रामीण म्हणीसारखी त्यांची अवस्था झाली आहे.
आता तर आणखीच अनवस्था आहे. माफी मागितल्याशिवाय त्याना पिम्परीत प्रवेश करू दिला जाणार नाही असा दम भाजपने दिला आहे( ते रास्तही आहे .भाजपची शैली उचलतात म्हणजे काय ;))आणि सम्मेलन तर पिम्परीतच आहे. आणि हे भाषण त्यानी शाळकरी मुलांसमोर केले हे आणखी !

उदय,
धन्यवाद.
६.२ही भुकंपाची तीव्रताही भरपूर नुकसान करण्यास पुरेशी आहे. भूकंपविरोधी तंत्रज्ञान अजुनही सगळीकडे अालेले नाही. तेव्हा तर प्रश्नच नव्हता. शिवाय नवीन बांधकामही जमीनदोस्त झाले म्हणजे ते सुरक्षिततेच्या द्ृष्टीने राहण्यायोग्य राहिले नाही असेहि असू शकेल.

पादुकानंद,
माझ्या पोस्ट्सवर तुमचे स्वागत नाही.
येथे कोणाला ब्लॉक करता येत नाही किंवा कोणाचे प्रतिसाद पोस्टकर्त्याला काढून टाकता येत नाहीत याचा गैरफायदा घेत तुमचे चालू द्या.

येथे कोणाला ब्लॉक करता येत नाही
>> ब्लॉक कोण होतेय त्याची काळजी तुम्हीच करा . तारखेकडे लक्ष ठेवा....
लवकर धागे टाकून घ्या.

कठीण शब्दांचे अर्थ :
जमीनदोस्त झाले म्हणजे ते सुरक्षिततेच्या द्ृष्टीने राहण्यायोग्य राहिले नाही

Rofl

एक पूर्णांक एक द्वितीयांश , तुमचा सेन्स ऑफ ह्यूमर जबरा आहे बुवा. पण तो कधी कधी लै टोचरा होऊन जातो. (या पोस्टबाबत नाही )

सबनिस जे बोलले ते चुकिचेच होते मात्र त्या निमित्ताने बाळ ठाकरेंच्या ठाकरी भाषेची आठवण आली

नाही हो, बालासाहेब देखील एवढे खाली घसरत नसत. एक डिसेन्सी होती त्यांच्यात. एक राजकारणासाठी घेतलेले सोंग जर सोडले तर कलावंत काळजाचा आणि फार गोड आणि प्रेमळ माणूस होता तो. हे सबनीस लईच थर्ड क्लास निघालं . हे भाषण पुन्हा त्याने शाळकरी मुलांसमोर केलं नाहीतर दुसरीकडे लगेच 'वाजवला'असता त्याला....

दीड मायबोलिकर,
उदय व माझ्या संभाषणात नाक खुपसल्याबद्दल धन्यवाद. दुस-याकडून कळलेल्या हकिकतीबद्दलचा माझा कयास सांगितला होता. ते लक्षात न घेता जी कमेंत केलीत, त्यापेक्षा वेगळी अपेक्षाही नाही.

जुना मायबोलीकर,
धन्यवाद.
फार काही विचार न करता ठेवलेले नाव आहे ते. शिवाय आपणच आपले कौतुक करून घ्यायला नको हाही हेतु.

पादुकानंद,
तुम्ही धमकी देताय म्हणजे गंभीरच असली पाहिजे. बाकी त्यामुळे जाम घाबरून गेलोय.
बाकी कोणी येथे स्वागत नाही, येथे येऊ नका म्हणून सांगितले तरी घोटाळणा-या मनोव्ृत्तीबद्दल काही लिहित नाही. तरीही याबाबतीत माझ्या हातात काही नाही या कारणामुळे तुमचे चालू द्यात.

राकु genuinely विचारतोय,

तुमचीच मते सर्वांगपूर्ण आहेत असे तुम्ही समजता काय?

मी धमकी देत नाही , धोक्याची जाणीव करून देत आहे. तुम्हाला व्यवस्थित 'घेरण्यात ' आलेले आहे. तुम्ही बॅटिंग करीत क्रीजच्या बाहेर आलेले आहात. अनेक दिग्गज आय डी या तंत्राने उडवण्यात आलेले आहेत. अतिरेक्यांचा तळ कुठे आहे ते शोधा. आणि सावध रहा. फुलटॉस येत आहेत ::फिदी:

सोन्याबापू,
मी काय समजतो हे विचारण्यापेक्षा येथे काय लिहिले आहे त्यावर व त्याबद्दल लिहिले तर अधिक बरे होईल असे वाटते. पोस्टकर्त्याचा हेतु विचारणा-या, वैयक्तिक, विषयांतर, टवाळकी करणा-या, असंबद्ध कमेंट्स केल्या नाहीत तर मायबोली हे चांगले ठिकाण होईल असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

दीड मायबोलिकर,
उदय व माझ्या संभाषणात नाक खुपसल्याबद्दल धन्यवाद. दुस-याकडून कळलेल्या हकिकतीबद्दलचा माझा कयास सांगितला होता. ते लक्षात न घेता जी कमेंत केलीत, त्यापेक्षा वेगळी अपेक्षाही नाही.
<<

राकु,

तुम्ही चव्हाट्यावर धुणी धुवायला आणलीत, की काय धुताय ते आम्ही पहाणारच.

तुम्ही तुमच्या स्वतःच्या (मालकीच्या) घरी बसून तिथेच खासगी संभाषण करा, त्यात नाक खुपसायला कुण्णीच येणार नाही. ब्रोबर ना? Wink

दुसरी गोष्ट म्हणजे, मी फक्त जमीनदोस्त होणे या शब्दाचा तुम्हीच लिहिलेला अर्थ तिथे जस्साच्या तस्सा कॉपी पेस्ट केला. त्यात नाक खुपसणे कसे काय आले?

पादुकानंदा,
तुम्ही चुकीच्या बंदूकीचे बार माझ्यावर काढत आहात. खेम्यात तुमचे-त्यांचे जे समज-गैरसमज झाले त्याच्याशी माझे काहीच घेणेदेणे नाही. मात्र त्यावरून हे जे काय तुमच्या मागेमागे जबरी म्हणत आलंय, ते तुम्हाला चिकटेल हे ध्यानी घेतलंत तर बरं.

पोस्टकर्त्याचा हेतु विचारणा-या, वैयक्तिक, विषयांतर, टवाळकी करणा-या, असंबद्ध कमेंट्स केल्या नाहीत तर मायबोली हे चांगले ठिकाण होईल असे वाटते. तुम्हाला काय वाटते?<<<
माबो चांगले ठिकाण होऊन झाले आहे.ते ऑलरेडी आहे.त्यामुळे आता ते काय काहीही कसेही झाले तरी काय फरक पडतो इथे कोणाला...दोन मि. चा विरंगूळा त्याला माबो ऐसे नाव.

मात्र त्यावरून हे जे काय तुमच्या मागेमागे जबरी म्हणत आलंय, ते तुम्हाला चिकटेल हे ध्यानी घेतलंत तर बरं.
<<

Lol

शब्दरचना आवडली म्हणून हसतोय बर. गैरसमज नसावा.