फेक कॉल्स - तक्रार कुठे नोन्दवावी?

Submitted by यक्ष on 31 December, 2015 - 22:38

मित्रान्नो! नविन वर्षाच्या शुभेच्छा!!

आमच्या नविन वर्षाची सुरुवात मात्र एका फेक कॉल नी झाली.

कुणितरी 'भैय्या'आंग्ळाळ्लेल्या हिन्दित माझ्या आईस तिच्या बँकेच्या खात्याविषयी विचारत होता. मला वेळेतच शंका आल्याने तो कॉल पुढे मी घेतला. मुद्दाम माहिती देतोय असे भासवून त्याची माहिती विचारली तेव्हा गडी एकदम घाण शिव्यावर उतरला!.

तर अशा फोन नंबरची तक्रार कुठे करावी व आईस तिच्या फोन वर 'त्या' नंबरहून त्रास होउ नये म्हणून काय काळजी ह्या विषयी महिती व सल्ला हवाय.

आधीच मनःपुर्वक धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यक्षप्रश्न Happy

नक्की कल्पना नाही. इथले जाणकार सुचवतीलच योग्य मार्ग.
पण नुकताच आमच्याही घरी घडलेला सिमिलर किस्सा आठवला.

आईला कोणीतरी राँग नंबर ३-४ वेळा कॉल करून अमुक तमुक आहे का विचारत होता. तो सुद्धा भैय्याच होता बहुतेक. हिंदीत बोलत होता आणि आई त्याला सांगतेय राँग नंबर आहे, पण गडी हे ऐकूनच घेत नव्हता. मी ऑफिसमधून घरी गेल्यावर पुन्हा त्याचा फोन वाजताच आईने मला हे सांगितले. मी सुद्धा त्याला एकदा शांत टोनमध्ये प्रेमाने सांगून बघितले कारण काही लोकं बिचारी याबाबतीत अडाणी असतात. पण हा सहानुभूती दाखवण्याची केस नाहीये असे समजताच...

अबे ए चु ## समजता नही क्या तेरे को. राँग नंबर है बोला ना. अभी वापस तेरा फोन नही आना चाहिये इस नंबर पे.. म्हणत जरा तोंड साफ केले.. काम झाले.

अर्थात हा आपल्या केसचा उपाय नाहीये आणि फोन आईचा असल्याने पुढच्या परीणामांचीही काळजी घेणे भाग आहे.

अवांतर - ती शिवी रागाने वा संतापून नव्हती दिली. तर अपेक्षित परीणाम साधण्यासाठी ठरवून दिलेली.

पोलिसात तक्रार करावी. आता मुंबई पोलीस ट्विटरवर आहे त्यांना ट्विट करून नंबर द्यावा
मला सुध्दा ३-४ वेळा बँकेची माहीती विचारायला फोन आलेला. तेव्हा अतिशय उत्तम मधूर भाषेत समजावून सांगितले.
अश्या फोन वर मनसोक्त भडास काढावी. Wink

मुंबई पोलिसचा ट्विटर अकाउंट काय आहे?

मला पुर्वी एकदा LIC च्या नावाने आणि दोन वेळा SBIच्या नावाने फेक कॉल्स आले होते. दोन्ही वेळा "तुम्ही फ्रॉड आहात, पुन्हा फोन करायची हिंमत करु नका" असे तोंडावर (फोनवर) सांगून फोन आदळला.

गूड Happy

एका फेक कॉल्सबद्दल -

५-६ दिवसापुर्वी मी एका बँकेत मॅनेजरच्या केबिनमध्ये काही कामासाठी बसले असताना तिथे एक मुलगा साधारण १९-२० वर्षाचा आपल्या वडिलांसोबत आला. त्याने सांगितल्याप्रमाणे त्या मुलाच्या वडिलांना एक कॉल आलेला त्यात त्या फोनवरील माणसाने 'तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे त्यामुळे तुम्ही दहा हजार व तुमची बँक डिटेल द्या आणि २५ लाख मिळवा' असे सांगितले. तो मुलगा मॅनेजरला बँक डिटेल देऊ का म्हणुन विचारत होता.

त्याला आम्ही समजावले की तो माणुस फ्रॉड आहे पण त्याला सं पुर्ण विश्वास बसत नव्हता त्यामुळे मी त्याला सांगितले की तु त्याला सांग की दहा हजार नाही तर २५ लाखातले १ लाख कापुन घेऊन उरलेले २४ मला दे.
तसा फोन त्याने त्या माणसाला केला, अर्थातच समोरच्याने अशी स्किम नाही म्हणुन सांगितले. नंतर मॅनेजरने परत त्याला फोन करुन 'मी क्राईम ब्रँच मधुन बोलतोय, तुम्ही अमक्याला तमकं सांगितल का' असे विचारल तेव्हा त्याने लगेचच फोन कट केला व नंतर त्याचा फोन बंद होता.

वडिलधार्‍या माणसांकडुन माहिती देण्याची चुक होवु शकते.
तस्मात त्यांना त्याबाबत जागरुक करुन ठेवा. का ही ही झाले तरी बँक व्यवहार, एटीएम व त्याच्याशी रिलेटेड माहिती कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला विचारल्याशिवाय देवु नये हे ठसवुन ठेवा.
अजुन एक सोपा उपाय त्यांचाकडे तुमचे एक्स्पायर झालेले कोणतेही डेबीट्/क्रेडीट कार्ड देवुन ठेवा, असा कॉल आला की ह्यावरची सगळी माहिती द्या म्हणा. (जे मी सध्या करतो, एक्स्पायरी डेट ठोकुन देतो पुढील काही वर्षातली)

याबाबत माझे एकुण तीन अनुभव आहेत. एक माझा, एक बॉसचा(यात मी त्याला वाचवले), आणी एक मित्राचा.

काढु काय तीन धागे काढु ? अं.....(ये धमकी नही चेतावनी है,)

धन्यवाद!
ट्विटर वर टाकतोय! ही एक उत्तम सुविधा आहे आणी माननिय रेल्वेमंत्री ह्यांचा ह्याबाबत स्पृहणीय अनुभव आहे!

यक्ष +१. ट्विटरवर माननीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही ताबडतोब रिस्पॉन्स देताना पाहिल्या आहेत.

खरंच ट्विटर सकारात्मक वापर केल्यास जबरदस्त आहे. निव्वळ उखाळ्यापाखाळ्या करणारे ट्विट्स आणि रिट्विट्स न करता ह्या माध्यमाचा फायदा यंत्रणा आणि सामान्यजन ह्यांमधील दरी, मिसकम्युनिकेशन कमी करण्यासाठी, जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी केला जावो.