जातो

Submitted by जयदीप. on 30 December, 2015 - 20:05

विषयांचा डोंगर खोदत जातो
हल्ली मी रस्ता काढत जातो

त्याच्याशी कोणी बोलत नाही
कोणाशी वेडा बोलत जातो

एखादी चर्चा रंगत जाते
एखादा निर्णय लांबत जातो

त्याचा मग डोळा लागत नाही
जेव्हा ती गाणी ऎकत जातो

ती मागे पाहत पाहत जाते
तोसुद्धा मागे पाहत जातो

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users