फुसके बार - ३१ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 30 December, 2015 - 14:28

फुसके बार - ३१ डिसेंबर २०१५
.
१) पाडगावकर गेले.

निखळ आनंदच स्वत: आज आपल्या आनंदयात्रेला निघून गेला. त्यांच्यासाठी तर शोकही करता येत नाही.

२) शेतक-यांकडून कळलेल्या काही गोष्टी

एक सत्य

जिरायती शेती करा – आहात त्यापेक्षा गरीब व्हा.

बागायती शेती करा – आहात त्यापेक्षा अधिक कर्जबाजारी व्हा.

आणि नुकतीच कळलेली म्हण.

माजला मराठा, धाडा राजकारणात
माजला बामण, धाडा शेती करायला

३) नाही म्हणायला महाराष्ट्रातले शेतकरी एका गोष्टीत तरी विक्रम करत आहेत.

पंढरपूर भागात पाण्यासाठी ३०० फूट, सोलापूर भागात ४०० फूट तर नळदुर्ग-उमरगा भागात ५५०-६०० फूट खाली जावे लागत आहे.

कोणास ठाऊक, या ड्रिलिंग कंपन्यांना एके दिवशी आणखी खोल जाता जाता तेलदेखील मिळेल.

फक्त सरकारने पाण्याच्या अनियंत्रित उपशाच्या नावाखाली या उद्योगावर बंदी आणू नये म्हणजे मिळवली.

४) आताच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रचंड गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या आहेत. विजयी होण्याकरता उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमध्ये वारेमाप पैशाचे वाटप केल्याच्या बातम्या आहेत.

ही विधानपरिषदेची भानगडच बंद केली तर? कितीतरी राज्यांमध्ये विधानपरिषदच नाही. त्यामुळे त्यांचे काही अडताना दिसते का?

नसेल, तर लोकशाहीवरची ही बांडगुळे का सांभाळावीत आपण?

५) कोलावरी डी या गाण्यानंतर आता शांताबाई हे सर्वाधिक निरर्थक गाजलेले गाणे आहे.

६) ३१ डिसेंबरला वर्षाच्या शेवटी दारूऐवजी दूध प्या वगैरे आवाहन केले जाताना दिसते. तसा या आवाहनाचा काही उपयोग नसतो. एरवी ‘छान’ वाटणारे अभय बंग दारूबंदीबद्दल सांगताना ऐकणे नकोसे वाटतात अनेकांना.

असो. वर्षभरात काहीही भरीव केलेले नसतानाही केवळ आपल्या जन्मदिवसाची तारीख आली या केवळ एका कारणाने अनेक लोक बरेच पेग आपल्या व इतरांच्या घशाखाली उतरवतात.

त्यामानाने एक वर्ष संपले यात तर आपले काहीही योगदान नाही. तरी आपल्याला दारूचे काहीतरी निमित्त हवे असल्याने ते साधता येते एवढेच.

७) ‘आभाळ पाठीवर घेऊन फिरणा-या हत्तींना विचारून पहा. तेही सांगतील, कोणीही कोणाचं नसतं’ अशा शब्दबंबाळ संवादांचे नाना पाटेकरांच्या नटसम्राटमध्ये काय होते ते पहायचे.

८) Gerard Depardieu (जेरार्द द्युपार्दू) हा प्रसिद्ध फ्रेंच अभिनेता फ्रान्समध्ये असलेल्या करविषयक कायद्यांना कंटाळून रशियात गेला व तेथील नागरिकत्व घेतले. मागे तो लाइफ ऑफ पाय या सुंदर सिनेमात अगदी छोट्या भुमिकेत दिसला होता.

परंतु आता तो स्टॅलिनवरील सिनेमामध्ये त्याची भूमिका करणार आहे. स्टॅलिनहा हिटलर, माओ व पॉल पॉट अशा क्रूरकर्म्यांच्या रांगेत बसणारा खलनायक होता. सदर सिनेमाचा विषय नक्की काय आहे ते कळलेले नाही.

गंमत म्हणजे त्यानेच यापूर्वी झारच्या काळातील रासपुटीनचीही भुमिका केली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अॅडमिन,
शाहिर या सदस्याच्या वरील कमेंटकडे मी आपले लक्ष वेधतो..अशा लोकांसाठीच मायबोली हा मंच आहे का ते एकदा सांगावे. मी याबाबत आपल्याकडे अनेकदा तक्रार केलेली आहे. तरीदेखील हे नालायक लोक माझ्या पोस्टवर येऊन घाण करतच आहेत. माझ्या इतर पोस्टवरही हाच प्रकार वारंवार चालू आहे. त्याबद्दलही मी आपल्याला कळवलेले आहे. विषयांतर करणे ही तर अगदी नेहमीची गोष्ट झाली आहे. त्यामुळे मी कोणत्याही कमेंटवर उत्तर देण्याचे टाळत आहे.
येथेही असंबद्ध कमेंट व त्यावर खिदळणा-या इतर कमेंट्स असे सगळे निरर्थक चालले आहे. माझे लिखाण अगदी हलक्या दर्जाचे असेलही, पण या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा ही पुन्हा एकदा विनंती. यापुढे माझ्या पोस्टवर अशा प्रकारच्या कमेंट्स करणा-यांचा बंदोबस्त झाला नाही, तर अशा प्रकारच्या टवाळखोरीतून सदस्यांची harassment करण्याचा येथे मुक्त परवाना आहे व हेच मायबोली या पोर्टलचे अधिक्ृत धोरण आहे असे मी समजू काय?

>>>विषयांतर करणे ही तर अगदी नेहमीची गोष्ट झाली आहे. <<<

कुलकर्णी, एक करून बघा. एकाच कोणत्यातरी विषयावर धागा काढून बघा एकदा! म्हणजे मग विषयांतर नाही होणार कदाचित. वरच्या धाग्यात बरेच विषय आहेत असे दिसत आहे. त्यामुळे मूळ धाग्यातच सारखे विषयांतर होत आहे असे वाटून प्रतिसाददात्यांनी तीच री पुढे ओढली असेल एखादवेळेस!

खोटारडे राकु
शस्त्रपरवाना धाग्यावर खोटी माहिती दिली आहे आणि तसे सांगितल्यावर कोणतेही स्पष्टीकरण ना देता दुसरे धागे काढत आहेत.