फुसके बार - २८ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 27 December, 2015 - 12:36

फुसके बार - २८ डिसेंबर २०१५
.
१) हौशी रिक्षावाले व चित्रपटगृहमालक

काही रिक्षावाले हौशी असतात. गि-हाइकांकडून मिळणा-या पैशामधूनच काही रक्कम ते रिक्षा सजवण्यासाठी व ती सजलेली राहण्यासाठी खर्च करतात.

अलिबागमध्ये एका चित्रपटगृहात सध्या बाजीराव-मस्तानी हा सिनेमा दाखवला जात आहे. तेथील मालकांनी या निमित्ताने बाजीरावाचे पूर्ण आयुष्यच उलगडेल असे देखावे तेथे उभारले आहेत. ते सारे पाहण्यासाठी सिनेमा सुरू होण्याच्या आधी खास थोडा वेळ काढून या असे आवाहन ते करत आहेत. चित्रपटातून मिळणा-या उत्पन्नातूनच ते हे करत असावेत. ते केले नसते तरी ज्यांना सिनेमा पहायचा आहे ते प्रेक्षक तेथे आलेच असते.

तरी हा अवांतर खर्च करण्यामागे कोणती अंतर्प्रेरणा असावी?

२) जेटलींना क्लीनचिट

केजरीवाल सरकारने दिल्ली क्रिकेट संघटनेच्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय आयोगाने आपला आहवाल दिलाही. त्यात अरूण जेटलींना क्लीनचिट देण्यात आलेली आहे. अर्थात हा जेटलींवर बेछूट आरोप करणा-या केजरीवालांना मोठा धक्का मानला जात आहे.

आता कोठे हा आयोग नेमला होता आणि त्यांनी २३७ पानांचा अहवाल दिला देखील? कमालीची कार्यक्षमता म्हणायला हवी.

याच त्रिसदस्यीय आयोगाला महाराष्ट्रातील जलसंपदा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमले पाहिजे.

३) पुन्हा शनिशिंगणापूर

सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर जाऊन दर्शन घेतल्यावर सगळ्या महिला आनंदित होतील व त्यांना पाठिंबा देतील असे वाटले होते. पण झाले वेगळेच.

त्याची प्रतिक्रिया उमटली साता-याजवळच्या एका गावात. तेथील महिलांनी देशपांडे यांना नास्तिक ठरवत त्यांनी या धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करू नये असा ठराव मंजूर केला आहे.

४) मूर्ख चंद्रशेखर राव, त्याचा यज्ञ आणि अपशकून

तेलंगणाचा मूर्ख मुख्यमंत्री चंद्रशेखर राव २००० ब्राह्मणांनिशी सर्वत्र शांती व सदाचार प्रस्थापित होण्यासाठी यज्ञ करत आहे. याच मुर्खाने तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी हिंसक आंदोलन केले होते आणि आता वेगळे राज्य मिळाल्यावे हा यज्ञ करत आहे. हा किती मागासलेल्या मनाचा आहे याची कल्पना यावरून यावी. यज्ञानेच सगळे मिळणार असते तर त्याला तेलंगणाचा विकासही वेगळे न होता केवळ यज्ञ करूनच करून घेता आला असता की.

तर या यज्ञातल्या एका मंडपाला नुकतीच आग लागली. अर्थात चालू असलेला मूर्खपणा मुख्यमंत्र्यांचा असल्यामुळे ती लगेच विझवली गेली. पण आता हा अपशकून समजून त्याने आणखी मूर्खपणा करू नये म्हणजे मिळवली. नाहीतर त्या २००० ब्राह्मणांची काही खैर नाही.

५) स्वीडनमध्ये केवळ सहा तासांचा कामाचा दिवस करण्याचे सार्वत्रिक धोरण ठरत आहे. लोकांना दिवसातले आठ तास कामावर लक्ष केंद्रित करता येत नसल्याचे कारण यासाठी दिले जात आहे.

काही वर्षांपूर्वी फ्रान्समधील कामगार संघटनांनी असाच बदल तेथेही व्हावा यासाठी आंदोलन केल्याचे आठवते.

आपल्याकडेही कधी ना कधी याचे लोण येणारच आहे.

६) मागे आम्ही पॅरीसमध्ये असताना त्या दिवशी फारच ढगाळ वातावरन होते व तुफान पाऊस पडत होता. आयफेल टॉवरजवळ असताना त्याच वेळेस आपल्याकडच्या केसरी ट्रॅव्हल्सचा ग्रुप तेथे आला. त्या वातावरणात टॉवर कसा ठीक दिसणार? तरी ठरल्याप्रमाणे तेथे तासभर घालवून ग्रुप पुढच्या दिवशी दुसरा देश पाहण्यास पुढे गेलादेखील.

सात दिवसात सात देश अशी मौजेची जाहिरात या कंपन्या करतात व लोक त्याला बळी पडतातही.

मागे नायगारा धबधब्यापाशी पोहोचले असता चालूही न शकणा-या एक आजी बसमध्येच बसून राहिल्या होत्या. त्यांना नायगारा पाहता न आल्याचे दु:ख अजिबात नव्हते. उलट त्या खुश होत्या तेथेही कंपनीने जेवणासाठी पुरणपोळीची सोय केली होती.

धन्य असे पर्यटक.

७) माझ्या परिचयातील एकजण योरपमध्ये हॉलंडमध्ये काम करतो. तेथून भारतात येताना तो एकही बॅग चेक-इन करत नाही व त्याच्या हातातही लॅपटॉपच्या बॅगेशिवाय काहीही नसते.

यावरून तेथून निघताना तेथील इमिग्रेशनमध्ये त्याची हटकून चौकशी होते. की तू एवढ्या मोठ्या विमानप्रवासाला निघाला आहेस, तर तुझ्याजवळ अजिबातच काही सामान कसे काय नाही? त्या अधिका-यांना शंका की याचा दहशतवादी लोकांशी संबंध आहे की काय? प्रत्येक वेळी त्याला असे अडवून त्याची चौकशी केली जाते. तर हा पठ्ठ्या उलट त्यांनाच विचारतो, असे सामान बरोबर असणे कंपल्सरी आहे काय?

अखेर तो ज्या कंपनीसाठी तेथे काम करतो ते पाहून त्याला सोडून देतात. हा काही दाखवण्यासाठी का होईना, पण एक बॅग म्हणून जवळ ठेवत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक त्याला बळी पडतातही. >>> यात लोक बळी पडतात असेच अगदी नाही. लोकांनाही कल्पना असते की एखाद दुसरे ठिकाण हवामानामुळे नीट दिसणार नाही. ७ दिवसांत ७ ठिकाणी जरी स्वतः प्लॅन करून गेलो तरी काही ठिकाणी असे होणार. याउलट भरपूर वेळ ठेवून जायचे असेल तर तसे कस्टम ट्रीप्स ही हे लोक देतात ना करून?

आम्ही आत्तापर्यंत सगळ्या ट्रीप्स स्वतः बुक करून केल्या आहेत पण कधीतरी असे करायला हवे की विमानतळावर कंपनीकडे बॅग्ज दिल्या की पुढचे काही दिवस आपण कसलेही (ट्रीप संबंधी) काम करायचे नाही.

२. तुमची मायबोली तुमच्या धाग्यांपुरतीच मर्यादित आहे. याबद्दल कालच अन्यत्र लिहिलं गेलंय.
ज्या चौकशी आयोगाच्या अहवालाबद्दल लिहिलंय तो आयोग वेगळा आणि जुना आहे. या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल येऊनही उणेपुरे ५ आठवडे होऊन गेलेत. भारत -दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेतला शेवटचा सामना फिरोजशहा कोटलावर खेळला जाणार होता, त्या सुमारास हा अहवाल आला होता.
त्यात जेटलींचा नामोल्लेख नाही म्हणजे त्यांना क्लीनचिट मिळाली आहे असा साक्षात्कार भाजपच्या प्रवक्त्यांना आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांतील काहींना आणि सर्व भक्तगणांना झाला.
बीसीसीआयने डीडीसीएला बरखास्त करावं आणि त्यांच्या कारभाराची तपासणी व्हावी असंही याच अहवालात म्हटलेलं आहे.
That report is a very broad report, which doesn’t pinpoint to the role of individuals for the alleged corruption and irregularities. It has been grossly misunderstood. The Commission of Inquiry under me would do a much bigger job.” असं नव्या आयोगाचे प्रमुख गोपाल सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.
he would “conduct all proceedings in public, transparently except when an in-camera hearing is necessary”. -असंही ते पुढे म्हणालेत.