फुसके बार - २६ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 25 December, 2015 - 15:14

फुसके बार - २६ डिसेंबर २०१५
.
१) काल दत्तजयंतीच्या निमित्ताने गाय व कुत्री यांच्यासाठी अन्नछत्र चालवले गेले. भटक्या गायी आणि कुत्र्यांना लाडवांसह इतर पक्वान्ने खाऊ घातली गेली. गावाचे नाव विसरलो. अंधश्रद्धा कुठपर्यंत पोहोचतील याचा आपल्याकडे काही नेम नाही.

२) पावसाळ्यामध्ये दर वर्षी ड्रेनेजच्या उघड्या ठेवलेल्या चेंबरमध्ये पडून लोकांचे जीव गेल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. या चेंबरना आतल्या बाजूने लोखंडी जाळी बसवल्यास त्यात पडून माणसे वाहून जाणे बंद होईल व काही जीव वाचू शकतील काय? अर्थात आपल्याकडे विजेच्या फिडरबॉक्सचे दरवाजे चोरून नेले जातात व नागरिकांना त्यांचा शॉक बसण्याची खुली संधी दिली जाते, तेथे या जाळ्या जागेवर राहतील याची काय शाश्वती?

३) अरूण जेटली ही व्यक्ती मला कधीच फार पटली नव्हती. ते नेहमीच वकीली पद्धतीने हातचे राखून अर्धसत्य सांगतात; किंबहुना पूर्ण सत्य सांगत नाहीत असे मला वाटत आलेले आहे. पंतप्रधानपदाच्या दावेदारीत सुषमा स्वराजांच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाई, तेव्हा खरे तर मला काळजी वाटे.

आता दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराच्या निमित्ताने मी संघटनेकडून एकही पैसा घेतला नाही असे ते सांगत आहेत. मात्र ते या संघटनेचे अध्यक्ष असताना जे गैरव्यवहार झाले असतील त्याची थोडीही जबाबदारी यांची कशी ठरत नाही?

आता तर सगळे करून नामानिराळे राहण्यात हातखंडा असणार्‍या भ्रष्टाचार्य पवारसाहेबांनीच जेटलींची जाहीर पाठराखण करण्यावरून उलट जेटलींच्या या प्रकरणातील जबाबदारीची जणू खात्रीच पटली आहे.

४) सॅव्हेज हारवेस्ट या सिनेमामध्ये दुष्काळामुळे मानवी वस्तीपर्यंत आलेल्या सिंहांचे फार सुंदर चित्रण आहे. त्यातला एक शिकारी अगदी रूबाबात बसलेल्या एका सिंहावर बंदुकीचा नेम धरतो आणि काही विचार करून गोळी न झाडता बंदुक बाजुला करतो.

काही डासदेखील कधीकधी विमानासारखी फार छान आकर्षक भरारी घेताना दिसले की हातातल्या जाळीच्या बॅटने त्यांना मारणे जीवावर येते.

५) नवीन वर्षाच्या निमित्ताने काही संकल्प करण्याची काही जणांची पद्धत असते.

माझ्या मते एखादा संकल्प तडीला जाण्यासाठी ती वेळच यावी लागते. तसे न होता केलेले संकल्प म्हणजे ‘आज कर उद्या विसर’ असेच राहतात. अर्थात प्रत्येक वेळी अशी वेळ जीवावर बेतल्यावरच यायला नको.

६) आज संध्याकाळी लॉ कॉलेज रोडवरून जाताना सिग्नल बंद होण्याच्या थोडेच आधी पुढे गेलो, तेही गाडीचा वेग न वाढवता. पुढे उभे असलेल्या वाहतुक पोलिसाने थांबण्यास सांगितले. तो बरोबर सिग्नलपाशी उभा नव्हता. काही पोलिसांची लोकांना थांबवण्याची पद्धतही असुरक्षित असते. सरळ गाडीच्या समोर येऊन उभे राहतात. न जाणो ड्रायव्हरचा पाय गडबडीत ब्रेकएवजी अॅक्सिलरेटरवर पडला तर....

मी थांबल्यावर मला लायसंस मागितले. मला म्हणाला मी का थांबवले त्याचे कारण विचारू नका. मीच म्हटले, की सिग्नल मोडला असे तुम्हाला वाटले म्हणून ना? हो असे म्हणाला.

त्याला म्हटले, मी मला असलेल्या सिग्नलच्या वेळेतच सिग्नल ओलांडला. दुस-या बाजुचे वाहनचालक त्यांचा सिग्नल चालू होण्यापूर्वीच पुढे येतात म्हणून तुम्हाला मीच सिग्नल तोडल्यासारखे वाटले असेल.

दाखवण्यासाठी लायसंस काढत होतो, तेवढ्यात मला म्हणाला की मलाही तसेच वाटले होते, की तुमची चूक नव्हती, पण शंका वाटली म्हणून थांबवले. आता फक्त लायसंस दाखवा आणि पुढे जा.

असेही आश्चर्याचे सुखद धक्के बसतात. आपली चूक नसली तरी.

७) अफगाणिस्तानहून भारतात परतण्यापूर्वी पंतप्रधान मोदी लाहोरमध्ये उतरले व पकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटले. यावरून मोदींचे विरोधक त्यांच्यावर भलभलते आरोप करत आहेतच.

मात्र अशी भेट अचानक ठरवणे हे आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे का? किंबहुना हा मुद्दा लक्षात घेतला, तर ही भेट केवळ आपल्या दृष्टीने आश्चर्यात पाडणारी म्हणावी लागेल. सरकारी पातळीवर पाकिस्तान सरकारला याची पुरेशी पूर्वसूचना दिली गेलेली असणार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजपाने विरोधी पक्षात असताना पाकशी चर्चेला विरोध केला होता आणि आज सत्तेत आल्यावर डिप्लोमॅसी आणि चर्चा करण्याचे सर्व प्रयत्न होत आहेत. कॉन्ग्रेस आज विरोधी पक्षात आहे आणि त्यान्ना यामधे देशहिता पेक्षाही काही निवडक खासगी उद्द्योग समुहान्च्या भल्यासाठी अशी अचानक भेट घडवली.

काल विरोधात असताना भाजपा सन्सदेचे कामकाज बन्द पाडत होता, आज भुमिका बदलल्या आहेत. काही मिनटात कुठल्याची चर्चेविना राज्यसभेत रखडलेली बिले पास होतात हे चिन्ताजनक आहे. शेवटी सामान्य जनतेचेच नुकसान होते.

सर्व पातळीवर चर्चेची दरवाजे नेहेमीच उघडी ठेवावीत, किमान तसा प्रामाणिक प्रयत्न करावा असे मला वाटते. मोदी यान्चे हे प्रयत्न धाडसी जरुर आहेत... पण आधीच्या अनुभवामुळे मनात शन्का आहेतच. सोबत जोडीला गाफिल राहुनही चालणार नाही.

<<याचाच अर्थ "भाजपा" नामक पार्टी "डब्बल ढोलकी" आहे>>
------ The Party with a Difference. Happy

डबल ढोलकी शब्द नक्कीच वापरणार नाही... पण दिलेली आश्वासने अजुनतरी पुर्ण होताना दिसत नाही आहे. सन्सदेत चर्चा न घडता विधेयक सम्मत होणे, दन्गा करणे यासाठी सत्ताधारी तसेच विरोध करणारे दोघेही जबाबदार आहेत.

भाजपा आणि कॉन्ग्रेस यान्चे केवळ रोल बदलले आहेत.

सत्ताधारी तसेच विरोध करणारे दोघेही जबाबदार आहेत. > अजिबात नाही फक्त आणि फक्त सत्ताधारीच जबाबदार आहे असे श्री. अरुण जेटली यांनीच सांगितले आहे. त्यामुळे संसद चालवण्याचे काम निव्वळ भाजपाचे आहे. त्यांना ते काम करता येत नसेल तर राजीनामा देऊन पायउतार व्हावे.

<<सत्ताधारी तसेच विरोध करणारे दोघेही जबाबदार आहेत. > अजिबात नाही फक्त आणि फक्त सत्ताधारीच जबाबदार आहे असे श्री. अरुण जेटली यांनीच सांगितले आहे.>>
------- अरुण जेटली यान्नी सान्गितले म्हणजे तेच सत्य आहे असे का समजायचे ? अनुमान तपासुन बघा.

विरोधी पक्षाचा अधिकार आहे असे म्हणत होते. मग तो अधिकार इतरांनी वापरला तर का मिर्ची लागावी?
यांचेच विधान यांच्यात तोंडावर मारावे हीच "राजनिती"

उदय,
बरोबर.
कॉंग्रेस सत्तेत असताना भाजप पाकिस्तानशी संबंध ठेवण्यावरून त्यांच्यावर टीका करे, तेव्हाही वाजपेयींची लाहोर बस, कारगिलवरून भाजपवर टीका केली जाईच.
पाकिस्तानातली लोकशाही लष्कराला पसंत पडेपर्यंतच जाऊ शकते. अन्यथा सरकारे उलथवली जातात हा इतिहास आहे. त्यामुळे नवाझ शरीफसारख्यांशी सख्य करून किती व काय साध्य होईल हा प्रश्न पडतात. त्यामुळे आपल्याकडे कॉंग्रेस सत्तेत असौ की भाजप या चर्चतून काय निष्पन्न व्हावे हा प्रश्न कायम राहतो.

मोदीन्चे परदेशभ्रमण जे सतत चालले आहे त्यावरून तरी ते भाजपचे शेवटचे पन्त्प्रधान असतिल. ते देशाच्या व्यवहारात लक्ष घालत नाहीत असे दिसत आहे कारण ते देशात फार थोडा वेळच असतात. उदाहरणार्थ त्यानी जेटलीना स्वतावरील आरोप मागे घेत नाहीत तो पर्यन्त मन्त्रिपदाचा राजिनामा द्यायला सन्गायला हवे होते. जेटलीवर्चे आरोप जर सिद्ध झले तर भाजपाचे नाकच कापले जाइल व पक्ष बन्द करावा लागेल. म्हणुन हा निर्णय मोदीनी घ्यायला हव होता. पण त्यान्ची परदेश्गमनाची हाव सुटतच नाही अहे. आजपर्यन्त तरी निराशा केली आहे त्यानी.

इतरांना लवलेटर लिहायला मनाई करणारे आज स्वतःहून गळाभेट घ्यायला गेले व्वा
म्हणे अचानक ठरवले ? अचानक व्हिसाची अरेंजमेंट होते अचानक सुरक्षतेचा आढावा घेतला जातो अचानक अफगाणीस्तानवरून विमान वळ्वून पाकिस्तानात जाते अचानक नवाजभाई "चहा प्यायला या" म्हणतात आणि साहेब "चहा... मग येतोच" म्हणत स्विकारतात? जणू काही नाक्याच्या पानटपरीवर गेलेल्या व्यक्तीला मित्र म्हणतो अरे इथे आलाच आहेस तर पलिकडे मस्त कटींग मिळते जाता जाता मारून जाऊ.

कैच्याकै भक्तांचे लॉजिक आहे.