एक भाडेकरू आतला

Submitted by जयदीप. on 25 December, 2015 - 14:15

घेत आहे मजा सारखा
रोग नाही भयासारखा

नागमोडी निघाला म्हणे
एक रस्ता तुझ्यासारखा

ठेव विश्वास प्रत्येकदा
घात होईल का सारखा

चेहरा हे कुठे सांगतो
कोण आहे कुणासारखा

एक भाडेकरू आतला
वागतो मालकासारखा

बोलतो फार आहेस जय
हातचे राखल्यासारखा

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेहरा हे कुठे सांगतो
कोण आहे कुणासारखा

एक भाडेकरू आतला
वागतो मालकासारखा

खासच.

-दिलीप बिरुटे