रतनवाडी आणि कुमशेतला स्वतःचे वाहन न वापरता, एकट्याने कसे पोचता येईल?

Submitted by प्र on 25 December, 2015 - 02:09

नमस्कार!

१. पुण्याहून रतनवाडीला सकाळी १० पर्यंत कसे पोचता येईल? (स्वतःचे वाहन न वापरता)
२. पुण्याहून कुमशेतला दुपारी १ पर्यंत कसे पोचता येईल? (स्वतःचे वाहन न वापरता)

समजा वरील अपेक्षित वेळी पोचणे शक्य नसेल तर लवकरात लवकर किती वाजता
पोचता येईल? कसे?

प्र

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्री पुणे-इगतपुरी गाडी आहे, ती राजूरवरून जाते.
दिवसा पुणे-अकोले (नगर जिल्हा) बस सेवा आहे. स्वारगेट स्थानकात चौकशी करा.
अकोले हून राजूरला यावे लागेल . अकोले ते राजूर १८ km.

राजूर हून कुमशेत ला मर्यादित बस सेवा आहे, अन्यथा काळीपिवळी जीप. एकटे असल्याने जास्त भाड्याची शक्यता गृहीत धरावी.
राजूर स्थानकात 02424-251045 फोन करून बसविषयी आगाऊ चौकशी करा. सकाळी गावकरी शहराच्या दिशेने प्रवास करीत असल्याने तुम्हाला उलट दिशेस बस मिळणे थोडे कठीण आहे.

रतनवाडीकरिता तुम्हाला शेंडीला यावे लागेल. वर दिलेली पुणे-इगतपुरी गाडी कदाचित शेंडीवरून जाते किंवा वारंघुशी फाट्यावर उतरून शेंडीला जावे लागेल. शेंडीहून होडीने, बसने किंवा जीपने रतनवाडीला जावे लागेल. यातील दोन पर्याय होडी आणि जीप एकट्याला खर्चिक आहेत. सकाळी फारशी वर्दळ नसल्याने रतनवाडीत जाण्यासाठी वाहन मिळत नाहीत त्यामुळे तुम्हाला २० km अंतरासाठी ४००-५०० रुपये देऊन एकट्यालाच वाहन भाड्याने घ्यावे लागेल. दुर्दैवाने बस फक्त संध्याकाळीच आहे.

स्वतःचे वाहन न वापरता दहा वाजेपर्यन्त कुमशेत किंवा रतनवाडीला पोचणे शक्य नाही. कारण एस्टीने आळेफाट्यालाच दोन अडीच तास लागतात. सध्या ह्या रस्त्याची रुंदीकरणाची कामेही चालू आहेत. आळेफाटा बोटा ब्राम्हणवाडा, राजूर ह्यारस्त्याला फारशा बसेस नसतात एवढ्या सकाळी तर नसतातच. राजूर ते शेण्दी (भंडारदरा धरण) हे अन्तर २२ किमी आहे. रस्ता वळणावळणाचा आहे. एस्ट्या थाम्बत थाम्बत सावकाश जातात. शेंडी ते रतनवाडी हा पायी जाण्याचा रस्ता आहे. डेडिकेटेड काळी पिवळी घ्यायची असेल तर पैसे जास्त द्यावे लागतील. हा भाग विरळ वस्तीचा असल्याने फारशी वहतूक नसते. सकाळी तरी अन तीही उलटी. तोच प्रकार राजूर ते कुमशेतचा. बाकी सुनटून्या यानी लिहिलेले अचूक आहे.

आत्ताच राजूर स्थानकात (सूनटून्या यांनी दिलेल्या नंबर वर) फोन केला.
तिथून कुमशेतला चक्क सकाळी ८.४५ ला आणि संध्याकाळी ५.३० ला (मुक्कामी) बस आहे.
शिरपुंजे मार्गे. आणि १ तासात पोचते म्हणे! म्हणजे माझं काम झालंच की!

नाही, पण अजून झालं नाही.
पुण्याहून राजूरला सकाळी ८.४५ च्या आधी कसं पोचणार???

प्र

मी जातो एकटाच पण सकाळी दहाच्या आतचा तिढा भयानक आहे.निरनिराळ्या मार्गाने गेलो आहे.कसला कार्यक्रम आहे इतक्या सक्काळी?फक्त रतनवाडीलाच जायचंय का वरती गडावर ?

नाही नाही, ट्रेकला एकटाच जाणार नाहीये
बाकी मित्रांना मी तिथे भेटणार आणि मग त्यांच्याबरोबर भटकणार!