खारीचा वाटा

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 19 December, 2015 - 06:56

एक प्रसंग घडलेला; जो आज सांगावासा वाटतोय...

स्टेशनवर नेहमीप्रमाणेच ट्रेन साठी गर्दी जमली होती. माझी ट्रेन यायला उशीर असल्याने मी थोडी निवांतच होते. शिड्यांच्या पायऱ्या उतरतानाच "त्या" मुलावर नजर गेली. जिन्याच्या टोकाशी तो अशा रीतीने उभा होता कि घाईत असणाऱ्या मुलीला त्याचा धक्का त्याला "हव्या" त्या ठिकाणी मारण त्याला सहज जमत होत. त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत मी माझ बचाव शस्त्र माझी पर्स समोर केली होती पण त्याच्या जवळ जाताच लक्षात आल कि तो तोंडाने देखील अश्लील शब्दांचा वापर करतोय, आणि मुळात त्या शब्दांमुळेच मुली आणखीन बिचकत आहेत... पुढे कोणाला काही कळायच्या आत त्याच्या मुस्काटात बजावली आणि तो भानावर आला.. बाकीच्या पण एक दोन जणी आता पुढे सरसावणार तितक्यात येणाऱ्या धोक्याची शंका त्याला आली आणि त्याने पळ काढला. नक्की काय घडल ? किंवा काय घडत होत यावर चर्चा रंगण्याच्या आतच ट्रेन आली आणि त्या घटनेचे बरेचसे साक्षीदार त्या ट्रेनमध्ये चढून घटनेला पूर्णविराम देऊन गेले.

एखाद्याने छेड काढावी आणि त्याच्या थोबाडात बसावी अशा घटना घडत असल्याने ते सत्र तिथेच थांबवायला हरकत नव्हती. पण......................

आता थोडी गर्दी कमी झाली आणि एक महिला समोर येउन म्हणाली, "बर झाल तू त्याला अद्दल शिकवलीस.. केंव्हापासून त्याचे नखरे पाहत होते... " आता त्या मुलावर कमी आणि ह्या बाईवर डोक जास्त फिरलं आणि त्यांना म्हणाले , "मग तेव्हापासून तुम्ही त्याच्याकडून मुलींची छेड कशी काढतात याचे धडे गिरवत होता काय ?? " बाईंची दातखिळी बसली आणि मी हि तिच्यासामोरून निघून आले.

गुन्हेगारी वाढलीय म्हणून फक्त चकाट्या पिटत राहायचं का ? कितीतरी मार्ग होते... पोलिस थोड्याच अंतरावर उभे होते.. जागरुकता सामान्य माणसाने दाखवायला हवी ना? प्रत्येकवेळी समोरच्याकडे एक बोट उगारताना बाकीची बोटे स्वतःकडे असतात हे लक्षात येत नाही का? बाजूच्याच घर जळतय पण त्याची ठिणगी तुमच्या घरावर मध्येच पडू शकते आणि तुम्हालाही राख करू शकते हे लक्षात घ्यायला हव ना?

सांगायचं एवढाच आहे... दुसरे बदल घडवून आणतील त्याची वाट नका पाहू तुम्ही स्वतः तो "बदल" व्हा. शेवटी खारीचा वाटाही महत्त्वाचा असतोच. जो अमुलाग्र बदल घडवतो. “Don't wait for change be the change”.

---- मयुरी चवाथे-शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही मुस्काटात मारलीत .. सही
माझ्या ग'फ्रेंडनेही एकाचे बसमध्ये असेच मुस्काट फोडले होते.. तिचेही मला कौतुक आहे.
पण तरी सर्वांनाच नाही जमत हे.

आभार सर्वांचे.

परंतु दुर्देवाने समाजातील निष्क्रिय लोक वाढलेत ह्याची जाणीव देखील सोबत होती.

मस्त.