पुन्हा बाजीराव व भन्साळी

Submitted by Rajesh Kulkarni on 18 December, 2015 - 23:28

पुन्हा बाजीराव व भन्साळी
.
असे चित्रपट पुन्हापुन्हा निर्माण होत नाहीत म्हणून त्यांची अचुकता महत्त्वाची समजायला हवी.

शिवाय आघाडीच्या दोन नायिका चित्रपटात आहेत. त्यांना नाचवले नाही तर माझे पैसे कसे वसूल होतील असा पूर्णपणे धंदेवाईक प्रश्न भन्साळी साहेबांनी देवदास सारख्या अनैतिहासिक चित्रपटावेळी विचारला होता. तोच निकष ते या ऐतिहासिक विषयालाही लावत आहेत. हे सर्वथा चूकच आहे.

तेव्हा या पाच मिनिटांच्या खोडसाळपणामुळे बाजीरावाबद्दलच्या प्रतिमेचे काही बिघडेल काय हा उलटा प्रश्न विचारणे अयोग्य आहे.

भन्साळीची ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची थेरे कुठवर जातील याचा नेम नाही. त्याला या निमित्ताने कोणीतरी ठणकावून सांगून शुद्धीवर आणणारे कोणी नाही हे दुर्देव आहे. कारण इतिहासाची मोडतोड हा विषय सेंसर बोर्डाच्या अखत्यारीत येईलच असे नाही. तेव्हा प्रत्येक वेळी हा चित्रपट इतिहासावर आधारित नाही ही एक ओळ सुरुवातीला दाखवून या लोकांना पळवाट काढण्याची संधी मिळत आहे.

धुम्रपानाच्या दृष्याच्या वेळी 'धुम्रपान आरोग्याला अपायकारक आहे' अशी पट्टी फिरवणे बंधनकारक आहे तसे अशा इतिहासाला धरून नसलेल्या प्रसंगी ' हा प्रसंग इतिहासाला धरून नाही, निर्माता - दिग्दर्शकाची अधिक पैसे मिळवण्याची खाज पूर्ण करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटात घातला आहे' अशी पट्टी फिरवायला लावली, तर या धंदेवाईकांना ते चालेल काय?

तेव्हा त्यांचा पैसा, त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे म्हणत प्रेक्षक म्हणून आपली ही हतबलता पाहता कमीत कमी अशा लबाडांचे समर्थन तरी नको. शिवाय एवढे आहे, तर चित्रपट पाहण्याची सक्ती नाही हा उपदेश आहेच.

एकीकडे इंडियन एक्सप्रेसने या चित्रपटाला दीड स्टार दिला आहे तर दुसरीकडे काहीजणांनी हा सिनेमा दुस-यांदा पाहणार असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे.

आता चित्रपट प्रदर्शीतही झाला आहे. त्याच्या झगमगाटात आपण हे सारे विसरून जाऊ आणि आता भन्साळीची नजर आणखी कोणत्या महापुरूषावर किंवा साहित्यावर पडते याची वाट पाहू. 'वाट' हा शब्द मुद्दाम योजलेला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग्गोबै !

साधं चौथीचे गणित आहे.

बाजीरावासाठी सुरु ठेवलेल्या टॉकिजची संख्या = ०

गांधीजींसाठी नथ्थुनाटकासाठी सुरु ठेवलेल्या नाट्यगृहांची संख्या= क्ष

क्ष > ०
म्।म्हणजे बाजीराव सिनेमा नकॉ म्हणणारे लोक गांधी नाटक बघत होते हे सिद्ध होते.

ज्यांना पायचा नैये त्यांनी पाकिस्तानात जाऊन राहावे ... तिथ ब्यान आहे Proud Light 1
आस कोणी कसं बोलल नाहीये, ह्याचा विचार करतोय Wink

बाजीरावाच्या घरचे लोक मस्तानी व तिच्या मुलाच्या जिवावर उठले होते , याचा बोभाटा आधीच झालेला होता.. त्यामुळे समशेर नाहीसा झालाअसता तर जनतेने पेशवे कुटुम्बियानाच गृहीत धरले असते.

त्ञामुळे बाजीरावाच्या निधनानंतर समशेरचा संभाळ त्यानी ( झक्क मारत ) केला . जर त्याला सन्मानपूर्वक जीवन द्यायचेच असते तर ते पूर्वीच दिले असते , त्यालाही अन मस्तानीलाही.

>>

इतिहासाचार्य रियासतकार मोगेश्वर म्हाराज,

गंडा बांधा पामराला _/\_

त्या व्हिलन पेशव्याच पोर भाऊ का काय ते, अन तो त्या हिरोचा नातू ... विश्वास फिश्वास ...
ते कुठ मेलते मग?

<<<त्याना अशा प्रकारे तोच इतिहास नव्या अतिरेकी नाट्यमय पद्धतीने इतिहास दाखवला जावा आणि तो त्याना आवडावा अशी निर्माते दिग्दर्शक अपेक्षा करत आहेत / आग्रह धरत आहेत, हे अयोग्य आहे.>>

अपेक्षा आणि आग्रह धरण्यात काय चूक आहे? त्यात कसली जबरदस्ती तर नाहीए. उलट जे लोक चित्रपटाचं प्रदर्शन बंद पाडत आहेत ते मात्र ज्यांना तो पाहायचा आहे त्यांच्यावर जबरदस्ती करत आहेत.

तो अख्खा परिच्छेद आणखी एका तथाकथित इतिहासावर आधारित नावाजलेल्या कलाकृतीलाही लागू शकेल. त्यावर आधीच पुरेसा वाद झालाय म्हणून फक्त आठवण करून देतोय.

एका फिल्मबद्दल किती बोलताय?
हिंदी वा मराठी सिनेमांच्यात गेल्या बरेच वर्षात तरी ऐतिहासिक सिनेमांमधे काळ, घटना, समाज, वातावरण, व्यक्तिरेखा इत्यादी पातळ्यांवर इतिहासाचा खरोखर तपशिलात अभ्यास करून आणि केलेल्या अभ्यासाला जागून असलेले सादरीकरण नसल्यातच जमा आहे. (क्वचित एखादा अपवाद असेल तर पण मला आठवत नाही.)
मग याच सिनेमाने किंवा भंसाळीनेच काय घोडे मारलेय?
याहून काही भली अपेक्षा होती का? असेल तर का? आजवरच्या भंसाळीच्या सिनेमांमधून तो उत्तम आणि ऑथेंटिक बायोपिक बनवू शकेल अशी काही अपेक्षा निर्माण होण्यासारखी स्थिती होती का? देवदासच्या कचर्‍यातून पुरेसे सिद्ध झाले नव्हते का?

ज्यांना ऑथेंटिसिटीच्या अपेक्षा होत्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
निगेटीव्ह पब्लिसिटीवर फिल्म जोरदार धंदा करण्याचे उत्तम उदाहरण म्हणून हा सिनेमा नोंदवता येईल नक्की.

"बानात पोचवणारा, मस्तानीच्या कृष्णाचं नामकरण नाकारणा-या ब्राह्मणांच्या विरोधात बंड पुकारून पेशव्यांच्या वंशजाचं नाव समशेर बहाद्दुर ठेवणारा, जाती धर्माच्या, कर्मकांडाच्या प्रथांना लाथ मारणारा, 40 लढाया लढून अपराजीत राहिलेला बाजीराव शेवटी आप्तस्वकियांकडून मात्र हरला..
मस्तानी... स्त्री कशी असावी तर मस्तानी सारखी... बापावर संकट आलं म्हणून रणांगणात उतरणारी, आई मुस्लिम म्हणून नमाज पढणारी, बाप राजपूत म्हणून कृष्णभक्तीत लीन राहणारी, प्रेम मिळवण्यासाठी बुधवार पेठेतल्या वेश्यावस्तीत राहून बाजीरावाची वाट पाहणारी, रखेल म्हणून समाजानं हिनवलं तरी प्रेमापोटी तो अपमान गिळून प्रेम देणारी, ज्या पेशव्यांनी हाल हाल करून प्राण घेतले, त्यांच्यात रक्षणासाठी आपला मुलगा समशेर बहाद्दुरला लढायला सांगणारी, विरांगणा, नृत्यांगणा, स्वर्गसुंदरी आणि एक आदर्श पत्नी, पतीच्या विरहात प्राण त्यागणारी.. "मस्तानी" इतिहासात उपेक्षीतच राहिली...
काशी....... नव-याचं दुस-या स्त्रीवर प्रेम आहे. हे माहित असतानाही कर्तव्यं निभावणारी, सवतीची मंगळागौरीची ओटी भरणारी.. बाजीरावांसाठी मस्तानीची बंदिवासातून सुटका करावी यासाठी प्रयत्न करणारी... एक आदर्श पत्नी काशीबाई...
भंसाळीनं मांडलेला इतिहास रंगवलेला असेलही.. पण, घटना सत्य आहे... चित्रपट बघण्याआधीच ओकणा-यांना सणसणीत चपराक आहे, जेव्हा पिंगा गाणं संपल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतात.. सवत असली तरी काशीबाई मस्तानीची खणा नारळानं ओटी भरते, कुंकु लावते.. ही आदर्शवत मराठी संस्कृती भंसाळीनं जगाच्या कानाकोप-यात पोचवली... इतिहास चुकीचा दाखवता म्हणून पेशव्यांच्या वंशजांनी टी.व्ही. चॅनेल डोक्यावर घेतले, अरे तुमच्याच पेशव्यांनी बाजीराव संपवला.. आणि मस्तानीचे हाल हाल केलेत.. तुम्ही कसली रे शालीनतेची भाषा करता, पहिल्या बाजीरावांनी जसं पेशव्यांना वैभव प्राप्त करून दिलं.. तिथंच दुस-या बाजीरावानं शेण खात, गणिका नाचवत, दारूच्या नशेत इंग्रजांच्या पायावर पेशवाई ठेवली.. तो इतिहास तुम्हाला शरमेचा नाही वाटत.. ज्या मस्तानीला हाल हाल करून मारलं तिच्याच मुलानं समशेर बहाद्दुरनं शेवटच्या श्वासापर्यंत मराठा साम्राज्याचं रक्षण केलं.. पेशवे करत नसत, त्यांच्या बायका नाचत नसत, हे तोंड वर करून सांगणा-यांनी पेशव्यांच्या बायका कपटीपणाचा कळस गाठत एखाद्याचे प्राणही घेतात.. हा तुमचाच इतिहास आहे.. तेव्हा कुठे जाते तुमच्या घराण्याची इभ्रत..
भंसाळींनी दाखवलेला बाजीराव हा आजच्या भाषेत सांगायचं तर सेक्युलर राजा आहे... रणवीरचं विशेष कौतुक... मल्हारी डांस भारीच.. विजयानंतर राजा सैनिकांसोबत नाचला तर तुमच्या बापाचं काय गेलं,. दुस-याच्या बायका नाचवता, आपली एक काल्पनिक नाचताना दाखवली तर एवढा गहजब.. वाह रे संस्कृतीरक्षक... दीपिकाबद्दल काय बोलायचं,. मस्तानी हिच्यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.. शेवटी काशीबाईला न्याय मिळवून देणा-या प्रियंकाचे विशेष कौतुक.... भव्य सेट, मराठी थाटबाट, उत्तम दिग्दर्शन करून.. सुश्राव्य संगीताची धुरा सांभाळणा-या संजय लिला भंसाली यांचे विशेष अभिनंदन.

.

....

.
.

.....

व्हाट्सप आहे

विजयानंतर राजा सैनिकांसोबत नाचला तर तुमच्या बापाचं काय गेलं,. दुस-याच्या बायका नाचवता, आपली एक काल्पनिक नाचताना दाखवली तर एवढा गहजब.. वाह रे संस्कृतीरक्षक..

Proud

>>>>> कारण सुजाण नागरिक नथ्थ्याच्या खोट्या वाक्यांवर टाळ्या मारत नाही <<<<<
अगदी बरोबर.... Happy
सुजाण नागरिकांना ती वाक्ये आधीच ठाउक असतात, ठाऊक नसली तर ठाऊक करुन घेतात, प्रातःस्मरणीय आहेत ती वाक्ये !

मोगा, तुला बरे निमित्तच मिळाले ना ब्रिगेडी इतिहास इथे ओकायला? .. Proud
चालुदे तुझे. त्यानिमित्ताने तरी नेटविश्वातील देशापरदेशातील "सुजाण/सूज्ञ/चाणाक्ष" लोकांना कळून येईल की कशाप्रकारचे वीष पेरण्याची तयारी या ब्रिगेडींनी गेल्या १९८५ पासुन करुन ठेवली आहे.
त्यामुळेच तुझ्या व तुझ्यासारख्यांच्या पोस्टना मी "धन्यवादच " देतो Wink

लिंब्या इतक्या वर्षांपासून विष कोण कालवत होते हे सगळ्या समाजाला माहीत आहे उगाच फोकस ब्रिगेडी ब्रिगेडी म्हणत वळवू नकोस. यशस्वी कधीच होणार नाही

Pages