फुसके बार – १६ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 15 December, 2015 - 12:53

फुसके बार – १६ डिसेंबर २०१५
.

१) City slickers

केस फार वाढले होते. दोन दिवसांत कमी करायला जायचेच होते.

आमच्या एका मित्राला माझ्याकडून काही कागदपत्रे घेऊन सकाळी लवकरच मुंबईला जायचे होते म्हणून भल्या पहाटे घरी आला.

त्याला भेटताना नीट बसवण्याचा प्रयत्न केलेले पण न बसलेले (पांढरे) केस पाहून त्याने काही कमेंट केली.

त्याला म्हटले, पीक कापणीला आले आहे, त्यामुळे पाणी तोडले आहे.

त्याला वाटले मी अजुनही झोपेतच आहे, म्हणून भलतेच बोलतो आहे. आणि तो कागदपत्रे घेऊन निघून गेला.

Bloody city slickers! पुन्हा झोप येणेसुद्धा अशक्य झाले.

२) चित्रपटातली गाणी आपल्यावर कसे संस्कार करत असतात याची दोन उदाहरणे.

अ) हा म्हणतो, जरा पास आओ, तेरे लब चुम लूं.
हिचे तर तेवढ्यावरही समाधान होत नाही, ती म्हणते, मैं क्या चाहती हूं मैं कैसे कहू?
आ) जानेमन माना हम तुम पे मरते हैं
प्यार तो ठीक है, पर शादीसे डरते हैं

३) नवीन सिनेमांमधील गाणी सिनेमा प्रदर्शित होण्याआधी एकेक करत प्रसिद्ध करणे हा प्रकार फार वाढत चालला आहे. अशा बातम्यांचा माग ठेवण्यामध्ये देशाच्या युवकांचा किती वेळ वाया जात आहे याची गणती कोणीही करत नाही.

देशातील युवकांच्या तोंडात कोणती गाणी आहेत ते मला सांगा, मी त्या देशाचे भवितव्य सांगतो वगैरे कोणीतरी म्हटले होते. सध्याच्या वातावरणात तो वेडाच झाला असता.

४) लग्नाच्या त-हा

गावाकडील मुलगी. बी.ए. किंवा तत्सम शिक्षण. लग्न होऊन शहरात आली. सास-यांना भरीला घालून स्वत:साठी एम.बी.ए.साठी वीस-बावीस लाख फी भरायला लावली. एम.बी.ए. चालू म्हणून मूलबाळ होऊ दिले नाही. एम.बी.ए. झाल्याझाल्या हिचे रंग बदलले. घटस्फोटासाठी क्षुल्लक कारणांवरून सासरच्यांशी भांडणे सुरू.

तिच्या स्वत:च्या आईवडलांनी तिच्या अशा वागण्याबद्दल तिला खडसावले, तर ही त्यांनाच धमकावते की तुमच्या म्हातारपणात मीच तुमच्याकडे पाहणार आहे. तेव्हा गप्प बसा. माझे हित कशात आहे हे मला चांगले माहित आहे. सगळेच गप्प. अखेर सर्वसंमतीने काडीमोड.

सगळेच आनंदी. विविध कारणांनी.

५) शाहरूखखान याने चेन्नईतील पुरग्रस्तांना मदत केली. पण राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना नाही. तेव्हा त्याच्या दिलवाले या चित्रपटावर खर्च करण्यापेक्षा नाना पाटेकरांच्या ट्रस्टला मदत करा. हे आवाहन एरवी संजय बरळु राऊत यांचे असू शकले असते. पण नाही, असंबद्ध बोलण्याचा मक्ता केवळ त्यांनीच घेतलेला आहे असे नाही. यावेळी ही जबाबदारी मनसेची ने सुरू केली आहे. तशी ती एरवीही चालू असतेच. पैसे कोणाचे, कोणी कोणाला द्यावेत, किंबहुना कोणावर खर्च करू नये हे मनसेवाले सांगणार? कमाल आहे.

तिकडे यांचे भावंड म्हणजे एक ठकवणारे मुंबई महापालिकेतून लुटलेले पैसे मराठवाड्यातल्या शेतक-यांना शेळ्या वगैरे घेण्यासाठी वापरून वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि इकडे हे दुसरे ठकवणारे एखाद्या सिनेमावर पैसे खर्च करू नका म्हणून सांगणार.

६) धर्म कुठलाही असो, एका बाबतीत तरी धर्मगुरूंचे एकमत दिसते, ते दाढी वाढवण्याच्याबाबतीत. यामागे काय रहस्य असावे?

७) स्मार्ट सिटीच्या निमित्ताने महापालिकांचा भ्रष्ट कारभार कमी होईल अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री फडणवीसांनी महापालिकांचे अधिकार कमी होणार नाहीत अशी ग्वाही दिली आणि या अपेक्षेवर पाणी फिरले.

कारण महापालिकेचे अधिकार म्हणजे भ्रष्टाचार इतके साधे समीकरण आहे.

८) सवाई गंधर्व महोत्सवातील एक प्रतिक्रिया

प्र. कसा वाटला आजचा सवाईचा कार्यक्रम?

उ: शास्त्रीय संगीतावरील अनेक महोत्सव होत असल्यामुळे सवाईचे महत्त्व कमी होऊ लागले आहे की काय असे वाटते.

प्र: नाही, मला म्हणायचे होते की आज कोणाचे कार्यक्रम होते?

उ: आजच्या जगात लोकांना मांडी घालून खाली बसायला लावतात हे लोक. पायाला मुंग्या येतात. आणि सोफ्यावर बसायचे एवढे पैसे कशाला घेतात? तेवढ्या पैशात सोफासेटच विकत घेता येईल की.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users