माझ्याच श्वासानी

Submitted by MayuMk on 15 December, 2015 - 10:50

चविली जीभ माझी आज माझ्याच दातांनी
कापली बोटे माझी आज माझ्याच हातांनी -

जायचे होते कुठे? भरकटलो मी कुठे?
आणले कुठे मला आज माझ्याच पायांनी

यातना दिल्या ना कधी मी कुणाला
ऐकवले काय आज हे मला माझ्याच कानांनी

तेच झाले परके, समजले होते ज्यांना आपले
फसविले आज मला माझ्याच लोचनांनी

जगलो मी खरा यांनाच जगविण्यासाठी
मलाच मारायचे योजिले या सार्‍यांनी

सारेच बेईमान झाले, इमान आपले विकुनी
घेतला जीव माझा आज माझ्याच श्वासांनी

Group content visibility: 
Public - accessible to all site users