फुसके बार – १५ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 14 December, 2015 - 14:46

फुसके बार – १५ डिसेंबर २०१५
.

१) अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिस्तीच्या (ख-या?) इतिहासाबद्दल एक मेसेज व्हॉट्सअपवर फिरताना दिसतो आहे. पृथ्वीराज चौहानला घोरीने मारल्यानंतर त्याची पत्नी संयोगिताने धर्म बदलण्यास नकार दिला. तेव्हा चिस्तीने तिच्यावर अत्याचार करण्यासाठी तिला घोरीच्या सैनिकांच्या हवाली केले होते. त्यानंतर पृथ्वीराजाच्या मुलींनी चिस्तीला ठार केले. अशी कहाणी त्यात दिली आहे.

तेव्हा अशा मोइनुद्दिन चिस्तीच्या दर्ग्याला भेट देण्यापूर्वी हिंदूंनी विचार करायला हवा असा त्याचा आशय आहे.

वरील कथा खरी आहे व चिस्तीकडे कसलीही जादूई किंवा दैवी ताकद नव्हती असे सांगणा-या ब-याच पोस्ट्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. खरेखोटे माहित नाही. पण अफझलखानाच्या दर्ग्यावरही मुस्लिम भक्त जातात, याबद्दल आपल्याकडे आक्षेप घेतला जातो, त्या धर्तीवर अजमेरबद्दल प्रचार सुरू होईलसे दिसते.

२) नटसम्राट नाटक व आता सिनेमा

नटसम्राट नाटकाचा भारदस्तपणा चित्रपटात कसा उतरणार आहे कोणास ठाऊक. नाटकातले ‘आभाळ पाठीवर घेऊन फिरणा-या हत्तींना विचारून पहा, तेही सांगतील कोणीही कोणाचं नसतं’ वगैरे जडजड संवाद वास्तवातले वाटत नाहीत, शिवाय आता त्या नाटकाकडे वळून पाहताना वडील एवढे कर्तृत्ववान असूनही त्यांचे व त्यांच्या मुले-मुली-सुना यांचे त्यांच्या नाटकासंबंधीचे संवाद जवळजवळ नाहीतच असे वाटते. नाटकातले आईवडील हे मुलांनी केवळ दुस्वास करण्यासाठीच उभे केलेले दिसतात.

हे इतके जुने नाटक शिरवाडकरासारख्या सिद्धहस्त लेखकाने लिहिलेले असले, तरी आताच्या काळात ते तसेच्या तसे लागू होईलसे वाटत नाही. त्याकाळातही केवळ शिरवाडकरांचे म्हणून त्याच्याभोवती थोडे अधिकच वलय निर्माण झाले होते आणि त्यातूनच मग नटसम्राट कोणी केले त्यांचे जणू भाग्यच फळफलले असे बोलले जाई. पण मुळात ते नाटक फार ‘नाटकी’ आहे. तेव्हा नाटकातील ‘म्हाता-याचा’ मानसशास्त्रीय किंवा इतर अंगाने काही विचार आगामी सिनेमात झालेला नसेल तर आताच्या काळात त्या सिनेमाचेही अवघड आहे असे वाटते.

मला ते नाटक कधीच फार आवडले नव्हते.

३) एके काळी जानी दुश्मन हा मल्टीस्टारर सिनेमा फार गाजला होता. मधुचंद्राच्या रात्रीच पत्नी पतीला विष देऊन मारते व त्याचे मग भुतात रूपातंर होते. हे भूत मग नवीन लग्न झालेल्या नव-या मुलींना मारते अस काहीसे कथानक होते. नवीन काळामध्ये आपली हॉरर सिनेमाची कल्पनाही कशी बदलते त्याचे हा सिनेमा उत्तम उदाहरण आहे. आजची मुले या सिनेमाकडे हॉरर म्हणून पाहण्याची अजिबात शक्यता नाही. मात्र एके काळी हा सिनेमा हॉरर म्हणून गणला गेला होता.

त्या काळातही हैद्राबादप्रमाणेच बंगलोरमध्ये अतिशय परिणामकारक ध्वनिव्यवस्था असलेल्या सिनेमागृहांमध्ये जो एकटा बसून हा सिनेम पाहून दाखवेल त्याला काही मोठे बक्षिस देण्यात येईल अशी या सिनेमाची जाहिरात केली होती.

सिनेमाला तुडुंब गर्दी असे. अगदी बाल्कनीमध्येही काही जण कठड्याच्या कडेने बसलेले होते. पडद्यावर भूत आलेले असल्यामुळे सगळे जण श्वास रोखून ते दृश्य पहात असताना बाल्कनीतील पहिल्या रांगेतील व्यक्तीने पायांची घडी बदलली तेव्हा तिचा पाय समोर बाल्कनीच्या कठड्यावर बसलेल्या माणसाला हलकासा लागला. तो माणूस कदाचित सिनेमामध्ये फारच रंगला होता त्यामुळे त्या स्पर्शानेही तो घाबरला आणि ओरडला. कठड्यावरून पाय खाली सोडून बसलेला असल्यामुळे तो दचकला आणि त्याक्षणी तोल जाऊन खाली पिटात बसलेल्या प्रेक्षकांमध्ये पडला. खाली बसलेल्या माणसाचे काय झाले कोणास ठाऊक. फारच मोठा गोंधळ झाला. खाली पडताना त्याने मारलेल्या किंकाळीला इतर अनेकांच्या किंकाळ्यांनी प्रतिसाद मिळाला. अखेर सिनेमा थोडा वेळ थांबवावा लागला.

आता हा सिनेमा अगदी विनोदी वाटतो,

४) सनातन संस्थेचा सदस्य असलेला समीर गायकवाड याच्यावर हो-नाही करता करता आता पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

त्याच्याविरूद्ध काही पुरावा मिळत नसल्यामुळे पोलिस तपासाला काहीच दिशा मिळत नसल्याच्या बातम्या होत्या, त्यामुळे आता तसे न होता आरोपपत्र दाखल झाल्यामुळे आश्चर्य वाटले.

५) करमणूककरापोटी सरकारचा प्रचंड महसूल चुकवणा-या केबलचालकांना पायबंद घालण्यासाठी केबलवाल्यांच्या सर्व ग्राहकांकडे सेटटॉपबॉक्स हवा अशी मोहिम राबवण्यात येत आहे. याबातच्या घोषणांचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे, तरीही केबलचालक याबाबतचे दडपण झुगारून आपले उद्योग अव्याहतपणे चालू ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत. आता याबाबतची आणखी एक कालमर्यादा उलटून जाईल आणि केबलचालकांना आणखी एक ‘अखेरची’ तारीख द्यायला आणखी एक नवीन वर्ष उजाडेल.

६) वडलांचे निधन झाल्यावर अमेरिकेत राहणारा मुलगा भारतात घरी येतो. परत जाताना आईला बरोबर घेऊन जाण्याच्या बहाण्याने पुण्यातील घर वगैरे विकून टाकतो. मात्र विमानतळावर आईला तिष्ठत ठेवत स्वत: अमेरिकेला निघून जातो. अर्थातच आईला एक जबरदस्त मानसिक धक्का बसतौ.

या सत्यकथेत थोडा बदल करून मराठीत सांजपर्व हा सिनेमाही निघाला होता.

प्रश्न असा आहे की पत्नीवर अत्याचार केले म्हणून पती परदेशी असेल तरीही त्याच्यावर काही कारवाई करता येण्याची सोय आहे, तर अशा बाबींमध्ये कारवाई होऊ शकते का?

वरील सत्यघटनेला आता बरीच वर्षे झाली. आपल्या आईशी असे क्रूरपणे वागणा-य मुलाचे नाव कोणाला माहित आहे का? तो जिला विमानतळावर तिष्ठत ठेवून गेला त्या आईचे पुढे काय झाले, ती त्या धक्क्यातून कधी सावरली की नाही याबाबत काही माहिती उपलब्ध आहे का? या दिवट्याला काही मुलबाळ असेल तर त्याला आपल्या आइवडलांबद्दल त्याने काही थापा जरूर मारल्या असतील. पण आपल्या बापाच्या कर्तृत्वाबद्दलचे सत्य त्या मुलांना कळायलाच हवे.

७) हेडलीला माफीचा साक्षीदार केले आहे. छोटा राजन ताब्यात आहेच. आता दाउदलाही आवतण देऊन सा-यांनाच माफीचे साक्षीदार बनवा व आपल्याकडील कोणा राजकारण्यांचे, उद्योगपतींचे, सिनेमाक्षेत्रातील लोकांचे त्यांच्याशी संबंध आहेत, हे सहज कळेल. शिवाय मग काल-परवा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तसे दाऊदला फरफटत आणण्याचीही गरज राहणार नाही. त्यांचेही म्हणणे दुस-या प्रकारे का होईना खरे होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमाला तुडुंब गर्दी असे. अगदी बाल्कनीमध्येही काही जण कठड्याच्या कडेने बसलेले होते. पडद्यावर भूत आलेले असल्यामुळे सगळे जण श्वास रोखून ते दृश्य पहात असताना बाल्कनीतील पहिल्या रांगेतील व्यक्तीने पायांची घडी बदलली तेव्हा तिचा पाय समोर बाल्कनीच्या कठड्यावर बसलेल्या माणसाला हलकासा लागला. तो माणूस कदाचित सिनेमामध्ये फारच रंगला होता त्यामुळे त्या स्पर्शानेही तो घाबरला आणि ओरडला. कठड्यावरून पाय खाली सोडून बसलेला असल्यामुळे तो दचकला आणि त्याक्षणी तोल जाऊन खाली पिटात बसलेल्या प्रेक्षकांमध्ये पडला. खाली बसलेल्या माणसाचे काय झाले कोणास ठाऊक. फारच मोठा गोंधळ झाला. खाली पडताना त्याने मारलेल्या किंकाळीला इतर अनेकांच्या किंकाळ्यांनी प्रतिसाद मिळाला. अखेर सिनेमा थोडा वेळ थांबवावा लागला.>>>>:हहगलो:

पृथ्वीराज चौहान मेला तेंव्हा ४२ वर्षाचा होता.. त्याच्च्या मुली तेंव्हा किती वर्षाच्या असतील ?

त्यानंतर सुमारे वीस तेस वर्शानी ख्वाजाजी अल्ला को प्यारे झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९० + होते.

इतका काळ या चौहान कन्या गप्प राहिल्या आणि मग ख्वाजाजी ९० पार करुन गलितगात्र झाल्यावर मग त्यांच्याशी युद्ध केले की काय ?

....

माहितीबद्दल धन्यवाद.

बहुतांश मुसलमान राजे / सरदार संसारसुख मनसोक्त भोगुन दीर्घायुषी झाले आहेत आणि हिंदु राजे अल्पसुखी व अल्पायुषी झाले आहेत , या माझ्या लाडक्या सिद्धांतात भर टाकायला अजुन एक उदाहरण दिल्याबद्दल शुक्रिया !

खुदा आपको खुश रखे और लंबी उमर दे !

ते रात्री लिहिले तेव्हा शब्बाखैर होते.

सकाळी एडिट करताना ते काढले.

सध्या अहमदाबादेत डिप्लोमा प्रॅक्टिकल सुरु आहेत. रात्री बारानंतरच वेळ मिळतो.

ओके, काम चालू द्या. पण रात्री १२ नन्तर जागणे अतीशय धोकादायक. नेमके डॉ आणी पेशन्ट् यान्च्या वाटेलाच असले का येते देव जाणे.

पृथ्वीराज चौहानला घोरीने मारल्यानंतर >>

दोन्ही डोळे काढल्या मुळे, कवीमित्र चांद बरदोई ने केलेल्या वर्णनाचा उपयोग "चार बांस चौबीस गज, अंगुल अष्ट प्रमाण, ता ऊपर है सुल्तान मत चुको चौहान" व शब्दभेदी बाण मारायचा कसब ह्याचा वापर करून पृथ्वीराजानं घोरी चा वध केला असा वाचलं होता.

कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.

मोगा, तुमच्या रुपाने येथील एका डॉक्टरला काहीतरी छान काम मिळाले ह्याबद्दल अभिनंदन!

<<

या वाक्यातून तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, श्री. बेफ़ि?

मोगा अशी आयडी घेतल्याने एका डॉक्टरला काम (?) मिळाले? असं काहीसं स ऐकू येतंय.

शब्दपरबूंची शब्दांवरची पकड ढिली होऊ लागलेली अशी पब्लिकली दाखवणे योग्य नव्हे. जरा ते वाक्य एक्स्प्लेन करा पाहू?

अन हो. "अनुल्लेख" अशी पोस्ट स्वतःबद्दल टाकू नका Wink

moga | 16 December, 2015 - 19:06

पृथ्वीराज ११९२ ला मारला गेला.

घोरी १२०६ ला मेला.
<<

तोफखाना पार "शेता"त नेऊन चिखलात गाडला Rofl

घोरीस काही पृथ्वीराजाने माफ वगैरे केले नव्हते. पहिल्या युद्धात तो हारला, माघार घेतली आणि परत गेला. आणि दुसऱ्या वर्षी घोरी परतून आला, पृथ्वीराजास सरळ मारले.

बाकी संयोगीताच भविष्य बेक्कार होत, येवढच लिहितो.

घोरीस गकार टोळीवाल्यांनी मारले, ते पंजाबीच होते Proud