सुंदरतेची साक्ष द्यायला आज कुणीच नाही

Submitted by जव्हेरगंज on 13 December, 2015 - 09:26

सुंदरतेची साक्ष द्यायला आज कुणीच नाही
केवड्याच्या सुगंधाला वाली कुणीच नाही

अंधारवाटा तुडवत गेल्या किती भळभळ राती
रानवारा झोंबतोय गारठायला कुणीच नाही

ठिपक्यांतुनी फुलत जाई अतृप्तांची पालवी ही
चाले नीबीड अरण्यदान सोबत कुणीच नाही

तरंग निथळे अश्रुंचे सावरण्या कुणीच नाही
पालवी फुटून गेली बहरण्या कुणीच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलाच प्रयत्न आहे!!
ऊणिवा जरुर सांगा!!
गझलेच्या तंत्राची काहीच माहीती नाही!!

धन्यवाद भुईकमळ!

जव्हेरगंजजी,
गझलतंत्रासाठी 'गझलेची बाराखडी' वाचून पहा.तसेच या विषयावर बेफिकीरजींनी लिहिलेला लेखही भरपूर मार्गदर्शक आहे.

धन्यवाद मंडळी,

सहज सुचलं तसं लिहीलं.
बाराखडी वाचल्यावर थोडाबहुत अंदाज आला आहे. मात्रा वगैरे सांभाळणे जाम किचकट वाटतयं. असो.
बिरुटे सर तुम्हाला पाहून आनंद झाला.
तुमची ' वाटेल तेवढा त्रास दे...' आत्ताच वाचली. धन्य झालो Happy