प्यायलो असलो तरी धुंदीत नाही

Submitted by जयदीप. on 11 December, 2015 - 02:49

प्यायलो असलो तरी धुंदीत नाही
तेवढी सगळ्यांबरोबर पीत नाही

विसरलो मी चेहरा अन् नाव सुद्धा
कोण आहे मी? मला माहीत नाही

पाहतो आहे घरी जाऊन रस्ता
नेहमीचा चेहरा खिडकीत नाही

वाढला आहे किती अभ्यास आता
ती मजा पहिलीतली...दुसरीत नाही !

सांगतो आहेस ते कळते कुणाला
काय अाहे जे तुझ्या शैलीत नाही

.....जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांगतो आहेस ते कळते कुणाला
काय अाहे जे तुझ्या शैलीत नाही<<< वा वा

प्यायलो नसलो तरी धुंदीत असतो 'बेफिकिर'
शुक्रवारी सांगतो की आज गुरुवारे मला -

हा माझा एक शेर आठवला

वाढला आहे किती अभ्यास आता
ती मजा पहिलीतली...दुसरीत नाही !
>>

शेरात लपलेले किमान दोन अर्थ जाणवून अंमळ गंमत वाटली. Happy