आत्म बंध..

Submitted by अत्रुप्त आत्मा on 10 December, 2015 - 01:29

होतो अत्रुप्त आत्मा
मग आत्म-मुक्त झालो..
आता कळून आले
मी आत्मबंध आहे.

अतृप्त मूळ माझे
आत्मस्वरूप तेच.
परी मूळबीज म्हणजे
मी आत्म-बंध आहे.

आत्मा बदलता-हा
अतृप्त वर्तमान!
तो भूत काळ त्याचा
प्राचीन बंध आहे.

मी बदलताच असतो
वैविध्य तेच माझे.
या जाणिवेत नुकता,,,
"तो" आत्मबंध आहे.

जाणिव आज झाली
बदलून मीच मजला..
त्या जाणिवेत आता
मी पूर्ण लिप्त आहे.

दिसते स्व रूप त्याचे
जगता जरा स्वतःशी!
शोधीत जात असता
तो एक गंध आहे.

आहे असा मी आज
असतो असाच नेहमी!
ते सत्यरूप असते
इतुका स्वबंध आहे.

ठरवू कशास मग मी?
राहीन-आत्मबंध???
जर मूळरूप त्याचे
तैसे सबंध आहे!

स्विकार आज याचा
केला मी मजं-मतीने
पाहू कितीकं टिकतो!?
"तो" मुक्त छंद आहे!

कळले मलाही काही
सांगून टाकले मी..
घेतो रजा जराशी
तो मूळ छंद आहे!

https://scontent-nrt1-1.xx.fbcdn.net/hphotos-xfp1/v/t1.0-9/12342371_936965349723085_5862105682522929738_n.jpg?oh=7c3a324835df3a34d371ca15b7f5c7cd&oe=56DE5F51

Group content visibility: 
Public - accessible to all site users