फुसके बार – ०९ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 8 December, 2015 - 13:35

फुसके बार – ०९ डिसेंबर २०१५
.
१) टीव्हीवर टेलिशॉपिंगच्या जाहिरातींमध्ये अनेक धार्मिक वस्तुंचीही विक्री होते. त्यात गळ्यातली लॉकेट्स, विविध मूर्ती, मंतरलेले खडे असे अनेक प्रकार दिसतात. अगदी छोट्या आकारातली हनुमानचालिसा असलेले हनुमानचे लॉकेटही त्यातून विकले जाते. अशा वस्तु कोण विकत घेत असेल किंवा खरेच कोणी विकत घेत असेल का असा प्रश्न पडत असे. अलीकडे मात्र एकाजणाकडे मायक्रोस्कोपमधून हनुमानचालिसा दिसेल असे पदक पाहिले आणि धन्य झालो. त्या यंत्राचे त्याला काय लाभ झाले वगैरे ऐकण्यापूर्वीच तेथून सटकलो.

२) परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या पाकिस्तानात गेल्या तेव्हा त्यांच्या स्वागताला गेलेल्या अधिका-याने त्यांना चक्क दोन हात जोडून नमस्कार केला. बाकी तिथल्या दौ-यातून काय निष्पन्न होईल हा प्रश्न वेगळा.

३) मुंबईतील लोकलप्रवासात लोकलचे दरवाजे बंद करण्याच्या प्रस्तावाला विरोध होत आहे, त्यातच आता लोकलमधली आसनव्यवस्था मेट्रोसारखी करण्याचा विचार आहे. त्यामुळे प्रवाशांची बसण्याची हक्काची चौथी सीट तर जाईलच, शिवाय बसण्याच्या जागांची संख्याही बरीच कमी होईल. तसे झाले तर वयस्कांसह सर्वांनाच उभ्याने जावे लागेल. पण त्यामुळे दरवाजात उभे राहून जाण्याची गरज न राहता दरवाजे बंद करण्याची व लोकल गाडीच वातानुकूलीत करता येईल.

४) पप्पू व त्याची आई कायद्यापेक्षा मोठे असल्यासारखे त्यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश निघाल्यावर कॉंग्रेसमधल्या लाळघोट्यांनी हे सुडाचे राजकारण असल्याच्या नावाखाली संसदेचे काम ठप्प केले. कोर्टाचा आदेश हे सुडाचे राजकारण कसे होऊ शकते हे त्यांच्यापैकी कोणीही सांगत नाही. शिवाय मुळात हे प्रकरण कॉंग्रेसची राजवट असतानाच न्यायालयात गेलेले आहे.

तिकडे पप्पूही घसा कोरडा करून मी न्यायालयात जाण्यासा घाबरत नाही व सरकारचे सुडाचे राजकारण मला रोखू शकत नाही असे उसना आव आणून सांगत आहे. मग जर तसे आहे, तर सुडाच्या राजकारणाखाली संसद ठप्प का केली जात आहे हे पप्पूला विचारायला हवे.

सोनियाबाईही मी इंदिराजींची सून आहे अशी डायलॉगबाजी या निमित्ताने करत आहेत. झाशीच्या राणीचा उल्लेख केला नाही हे बरे. तीदेखील तिच्या मुलाला पाठीला बांधून लढली होती म्हणून.

एरवी लिहून दिलेले वाचण्याची सवय असलेला पप्पू कोर्टात तशी सोय नसल्यामुळे काय बोलेल कोणास ठाऊक. मागे अर्णबने १९८४च्या दंगलीचा विषय काढला त्यावर मी तेव्हा राजकारणात नव्हतोच असे काहीसे उत्तर देणारा पप्पू कोर्टातही नॅशनल हेराल्डवगेरेच्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता असे काहीसे म्हणलेले पहायला मिळेल कदाचित.

या सगळ्या नादात जीएसटीवरील प्रस्तावित विधेयकाचे जे धिंडवडे निघत आहेत, ते पाहता वरवर त्या विधेयकाला आमचा मर्यादित विरोध आहे असे म्हणणा-या कॉंग्रेसचा खरा डाव काय हव लक्षात येणे अवघड नाही.

५) सावधान इंडियामध्ये एका भागामध्ये आपल्या गर्भवती सुनेला मुलगाच व्हावा या हट्टापायी एक सासू सुनेकडून शेजा-याच्या मुलाचे अपहरण करवून तिला तुरूंगात धाडते असे दाखवले आहे. कारण काय तर तुरूंगात असताना प्रसुती झाली तर हमखास मुलगाच होतो ही अंधश्रद्धा.

धन्य आहेत लोक. आपल्याकडे सर्वोत्कृष्ट अंधश्रद्धा शोधण्याची स्पर्धा घेतली तर किती खजिना बाहेर येईल.

६) ईद, दिवाळी असे मुहूर्त साधून त्यावेळी आपले चित्रपट प्रदर्शित करून शंभर-दोनशे कोटीचा धंदा करण्याचे खान कंपनी वगैरेंचे उद्योग आता नियमितपणे होत आहेत. या सगळ्या व्यवस्थेमुळे रतन धन पायोसारख्या तद्दन फालतू सिनेमानेही हात धुवून घेतले. पण या प्रकारात काय होते आहे म्हणे की या लोकांच्या चित्रपटासाठी त्यांच्या आवडत्या मुहुर्ताच्या जवळपास हवी तेवढी चित्रपटगृहे बरीच आधी बुक करून ठेवली जातात. व त्यावेळी इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित करू दिला जात नाही. अशा पद्धतीच्या तटबंदीमुळे असा सिनेमा एक आठवडा सहज पार करतो, तेव्हाच त्याचा तेवढा धंदा होणार हे निश्चित झालेले असते.
या चित्रपटमाफियाचे गौडबंगाल उज्वल गोडबोलेंनी छान उलगडून सांगितले आहे. असे असताना आपल्याकडचे सिनेपत्रकार अशा शंभरकोटीक्लबच्या सिनेमांची फुकट जाहिरात व हवा करतात तेव्हा त्यांच्या पत्रकारितेची कीव येते.

७) केशव बन्सल हा आयपीएलमधील राजकोट या नवीन संघाचा मालक आहे. मी प्रथमपासूनच स्पोर्ट्स एन्थुजियास्ट असल्याचे तो उत्साहाने म्हणत आहे. मागच्या आयपीएलमध्ये या शब्दाच्या उच्चारावरून कोणते रामायण झाले हे याला माहित नाही वाटते.

८) सलमानखानने भरधाव गाडी चालवत काही जणांना चिरडले, त्याप्रकरणी उच्च न्यायालयातली सुनावणी चालू आहे, त्याचा निकाल याच आठवड्यात येईल असे वाटते. त्यामुळे या सुनावणीचा निकाल काय लागतो हे पाहिल्यावर आता कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहेच, तरीही सलमानखान हा एक भला माणूस आहे, तो असे करणेच शक्य नाही वगैरे बरळणा-यांना टीव्हीवाल्यांनी आताच बुक करून ठेवले असेल.

+++++++++++++++

सकारात्मक कमेंट्स करणा-या सदस्यांसाठी निवेदन:

गेल्या काही दिवसांपासून माझ्या जवळजवळ प्रत्येक पोस्टवर मायबोलीच्या काही सदस्यांनी निव्वळ टवाळखोरी चालू केलेली आहे. एखाद्याने विषयाला सोडून कमेंट करणे व इतरांनी मग त्यावर पुढे तशाच कमेंट करणे असा प्रकार चालू आहे. येथे एखाद्याला ब्लॉक करणे अथवा विषयाला धरून नसलेल्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नसल्याचा गैरफायदा काही सदस्य घेत आहेत. काही जण मी लिहूच नये किंवा दुसरीकडे कोठे तरी लिहावे असा आग्रह अजुनही धरत आहेत. यातला विकृत आनंद व त्यातून मिळणारे समाधान त्यांना जरूर मिळू देत. काही सदस्य मात्र विषयाला धरून कमेंट करत असतात व मी काहीवेळा त्यांच्याशी त्यांच्या मतांबद्दल चर्चाही करतो. परंतु येथे टवाळखोरी इतकी वाढलेली आहे की मला अशा सकारात्मक कमेंट शोधणेच अवघड होऊन बसते आहे.

तेव्हा सकारात्मक कमेंट्स करू इच्छिणा-या सदस्यांना माझी विनंती आहे, की ऍडमिनने अशा टवाळखोरीच्या विकृतीचा बंदोबस्त करेपर्यंत माझ्या कोणत्याही पोस्टवर काही कमेंट करू नये. आपण माझ्या पोस्ट वाचण्यासाठी वेळ दिलात एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे व त्यासाठी मी आपला आभारी आहे. कमीत कमी मी तरी कोणत्याही कमेंटची नोंद घेऊ शकणार नाही.

मायबोली हे इतर काही संस्थळांप्रमाणे टवाळखोरांचा अड्डा नाही अशी माझी समजूत असल्यामुळे मी येथे लिहित राहिलो आहे. मी कोणाच्याही पोस्टवर जाऊन घाण करत नाही, इतरांकडूनही माझी तेवढीच माफक अपेक्षा आहे. परंतु गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून वस्तुस्थिती वेगळी असल्याचे लक्षात आले आहे. या बाबतीत मी व्यक्तीश: फार काही करू शकत नसल्यामुळे हे निवेदन करत आहे.

वास्तविक या टवाळखोरांपैकी एकहीजण माझ्या पोस्टकडे फिरकला नाही तरी मला काडीचाही फरक पडत नाही. परंतु येथे त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे त्यांना त्यांचे उपद्रवमूल्य दाखवून द्यायचे आहे. या प्रकारातून मायबोलीची प्रतिष्ठा वाढणार असेल तर त्यांनी तसे जरूर करत रहावे. माझी हरकत नाही. तेव्हा टवाळखोरांनो, वर म्हटल्याप्रमाणे तुमची विकृती येथे जरूर दाखवा. तुम्हाला कसलेही भय नाही. तुम्हाला कसलीही लाजलज्जा असेल याची मला अपेक्षाही नाही. तेव्हा तुमचे चालू द्या. उलट हे निवेदन पाहिल्यावर तुम्ही आणखीच चेकाळाल याची मला खात्री आहे.

यापुढे येथील माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये मी हे निवेदन टाकत जाणार आहे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>त्यामुळे प्रवाशांची बसण्याची हक्काची चौथी सीट तर जाईलच<<< Lol

मुद्दा क्रमांक चारबाबत काहीही म्हणायचे नाही.

बाकीचे मुद्दे खुसखुशीतपणे लिहिलेले आहेत नेहमीच्याच! Happy

छान लिहीत आहात... मी फुसके बार आवडीने वाचतो...

<<पप्पू व त्याची आई कायद्यापेक्षा मोठे >>
------ पप्पू च्या जागी राहुल गान्धी वाचायला जास्त आवडले असते... मग इतरही केजरी, फेकू करतात ते सम्बोधन चुकीचे वाटते. ते राष्ट्रिय नेते आहेत, आणि प्रत्येकाला नाव आहे... राहुल लिहीले असते तरी खुसखुशीत पणा कमी होणार नाही.

मी गान्धी आणि कॉन्ग्रेस भक्त नाही तसाच भाजपा आणि केजरीवाल यान्चाही चहाता नाही.... असो. पुढिल लेखनास शुभेच्छा.

पप्पू, पप्पूची आई असे म्हणणे योग्य (वाटत) नाही.

योग्य ती नांवे लिहिण्याने खुसखुशीतपणा कमी होणार नाही ह्याबाबत उदय ह्यांच्याशी सहमत!

ती उज्ज्वल गोडबोले वाली लिन्क आहे का?

पप्पू, पप्पूची आई असे म्हणणे योग्य (वाटत) नाही. >>> सहमत. मला पूर्वी पप्पू हे राहुल गांधींचे टोपणनाव आहे असे वाटायचे - कपूर खानदानात जशी ती चिंटू, डब्बू वगैरे आहेत, तसे. निदान पूर्वी हे एकदम कॉमन टोपणनाव होते. पण म्हणे नॉर्थ च्या भागांत पप्पू हे तुच्छतादर्शक विशेषण आहे. नेत्यांचे उल्लेख अगदी दरवेळेस "माननीय..." टाईप करणे खूप कृत्रिम होईल पण वैयक्तिकरीत्या अपमानास्पद नसावेत. उदय व बेफिंनी लिहील्याप्रमाणे हे टाळूनही ती पोस्ट तितकीच खुसखुशीत होईल.

माहीती न करून घेता बिनडोकपणा करणे हे आता सवयीचे झाले आहे
इतरांना नीट प्रतिक्रिया द्या म्हणे स्वतः नीट लेख लिहायला कधी शिकणार?

उदय, बेफिकीर, फारएण्ड, _तात्या_,
पप्पू व मम्मी हे येथे दोघांचाही एकत्र संदर्भ असल्यामुळे म्हटले आहे. एरवी मी सोनियांचा उल्लेख सोनिया असाच करतो.
पप्पू म्हणण्याबद्दल: चाळीशीच्या उत्तरार्धात असलेला राहूल हा केवल कॉंग्रेसवरच नव्हे तर देशावर थोपलेला अतिशय निर्बुद्ध माणूस आहे असे माझे स्पष्ट मत आहे. काडीचाही अभ्यास नसला तरी पक्षाचे नेत्ृत्व त्याच्याकडेच आल्यासारखी परिस्थिती असल्यामुळे देशाचे फार नुकसान होत आहे. या वयातही सरकारवर टीका करायलासुद्धा त्याला हातात कागद लागतो. तुम्हाला आठवत असेल तर अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्यावेळी त्याने संसदेत एक भाषण वाचून दाखवले की लोकपाल हे पद निर्माण केलेच तर त्याला घटनात्मक दर्जा असावा वगैरे. त्यातले एक अक्षर तरी त्याला समजले असेल का शंका होती. तेव्हापासून आजपर्यंत त्याचे वय वाढण्याव्यतिरिक्त कोणताही बदल झालेला दिसत नाही. तेव्हा न झेपणारे उद्योग त्याला करू देण्यात कॉंग्रेसी लोकांचा लाळघोटेपणाच कारणीभूत आहे. बरे, कॉंग्रेसकडे लायक पर्याय नाही असेही नाही. म्हणून तो पप्पू. यात मी कॉंग्रेसविरोधी आहे की कसे याचा काही संबंध नाही.
मी जरी त्याला पप्पू म्हणत असलो, तरी सोनिया काय किंवा तो काय, अश्लाघ्य चित्रे तयार करणे वा विनोद प्रसारित करणे असे उद्योग मी स्वत: तर करत नाहीच, साधे कोणाकडून अाले तर फॉरवर्डही करत नाही.
मोदींबद्दल भले कोणाला काहीही आक्षेप असोत, त्यांच्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या व्यक्तीची पप्पूशी त्याची बरोबरी करायला खरोखरच हिंमत किंवा अतिशय अज्ञान हवे.

जयंत.१,
माझ्या पोस्टवर तुमचे स्वागत नाही व तुमच्यासारख्याला येथे येऊन काही कमेंट करण्याचे निमंत्रणही नाही. हे आधीही सांगितलेले आहे. तरीही तुमच्यासारख्या टवाळखोरांना ब्लॉक करण्याची येथे सोय नसल्यामुळे तुम्ही येथे नियमितपणे येत रहा. मी त्याबाबत काहीही करू शकत नाही.

अच्छा!
म्ह्णजे मी कुणाला गालिप्रदान करतो, ते का, याचे माझ्यादृष्टीने 'योग्य' लॉजिक सांगितले की मी कुणाचाही डिरोगेटरी उल्लेख करायला मॉरली एन्टायटल्ड!
वावावा!
उत्तम.

गैरसमज क्लिअर होत चालले आहेत हळूहळू.

दीड मायबोलीकर,
त्याला पप्पू म्हणण्यावरच मी माझा उद्वेग शमवू शकतो. पप्पू म्हणणे ही शिवी आहे हे तुमच्याकडून कळले. प्रत्येकवेळी त्याला पप्पू म्हणण्यापेक्षा निर्बुद्ध असे म्हटले तर चालेल का असे मी कोणाला विचारत बसण्यापेक्षा मी माझ्यापुरता त्याच्याबद्दल तो शब्द वापरतो.

फारएन्ड, राहूल गांधींना पप्पू हे नाव पडण्यात " पप्पू कान्ट डान्स साला" हे गाणं कारणीभूत आहे. दिखता अंग्रेज, लाईट ब्लू वगैरे वगैरे.

दिमा,

पप्पू ही शिवी नाही. त्यामुळे तो उल्लेख डिरोगेटरी नाही.

पण उद्या राहूल गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना पप्पू म्हणाले तर ते डिरोगेटरी होईल. उदा मोदींना फेकु ( हे तर अगदी माईल्ड आहे ) आणि आणखी काय मायबोलीवर म्हणले जाते ते डिरोगेटरी आहे. कारण ते एका उच्च पदावर आहेत.

(मी ही पप्पू म्हणत नाही ते वेगळे ! )

मला ह्या विषयावर काल प्रसिद्ध झालेले कार्टून आवडले मात्र.

cartoon.JPG

तसेही न्यायालयीन प्रक्रियेचा सरकारशी काय संबंध असतो? उपस्थित राहायचे. कर नही तो डर नाही. हे त्या (सोनियाजी) काँग्रेस नेत्यांसमोर लिड बाय एक्झांपल ने ठेवू शकतात. असे मला वाटले.

केदार!
शाब्बास, म्हणजे तुमच्याकडून अशीच अपेक्षा होती आणि तुम्ही ती पूर्ण केलीत.
धन्यवाद!
Happy

आँ? ठिक आहे.

बाकी मी लिहिलेले कोणते शब्द तुम्हाला लागले? पप्पू, कार्टून की न्यायालयीन प्रक्रिया? त्यात काय चूक आहे? असो !

निदान माझ्याकडून अपेक्षा असतात हे काय कमी आहे? चांगल वाटलं !

उदा मोदींना फेकु ( हे तर अगदी माईल्ड आहे ) आणि आणखी काय मायबोलीवर म्हणले जाते ते डिरोगेटरी आहे. कारण ते एका उच्च पदावर आहेत.

केदार,

अभिनंदन व धन्यवाद!

म्हणजे उच्च पदावर (उर्फ पंतप्रधानपद. खासदार हे नीच पद असावे) असले, तरच असले उल्लेख डिरोगेटरी ठरतात.

राकु हे कुठल्याही पदावर आहेत असे ठाऊक नाही. तेव्हा, यापुढे राकु यांचा उल्लेख चंपू असा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडतो Wink

बाकी सध्याचे शिवसेनेचे प्रमुख श्री उद्धव यांचे आडनांव या सभ्य कुलकर्णींच्या भाषेत काय आहे बरे? (एकेक डिरोगेटरी घेऊ आपण उदाहरणात)

पण उद्धव ठाकरे पंतप्रधान कुठे आहेत?
मुख्यमंत्रीही नाहीत. साधे खासदारही नाहीत.
त्यामुळे बहुदा त्यांच्याबद्दल राकु वापरत असलेले संबोधन केदार यांच्यामते डिरोगेटरी नसणार.
Happy

आम्हाला राजेश कुलकर्णी निर्बुद्ध वाटतात
आणि आमचा उद्वेग हा सुध्दा आम्ही आपल्याला "निर्बुद्ध" म्हणण्यावरच शमवू शकतो.

जयंत.१,
माझ्या पोस्टवर तुमचे स्वागत नाही व तुमच्यासारख्याला येथे येऊन काही कमेंट करण्याचे निमंत्रणही नाही. हे आधीही सांगितलेले आहे. तरीही तुमच्यासारख्या टवाळखोरांना ब्लॉक करण्याची येथे सोय नसल्यामुळे तुम्ही येथे नियमितपणे येत रहा. मी त्याबाबत काहीही करू शकत नाही. >>

आधी स्वतःची लायकी बघावी मग इतरांना टवाळखोर म्हणावे.

पण उद्धव ठाकरे पंतप्रधान कुठे आहेत?
मुख्यमंत्रीही नाहीत. साधे खासदारही नाहीत.
त्यामुळे बहुदा त्यांच्याबद्दल राकु वापरत असलेले संबोधन केदार यांच्यामते डिरोगेटरी नसणार.
<<
छे छे. नसणार कसले? नाहीच्च!

अगदी मी कुलकर्णींना वापरलेले 'सभ्य' हे संबोधनही डिरोगेटरी नाही.

पप्पू म्हणण्याबद्दल: चाळीशीच्या उत्तरार्धात असलेला राहूल हा केवल कॉंग्रेसवरच नव्हे तर देशावर थोपलेला अतिशय निर्बुद्ध माणूस आहे असे माझे स्पष्ट मत आहे. काडीचाही अभ्यास नसला तरी पक्षाचे नेत्ृत्व त्याच्याकडेच आल्यासारखी परिस्थिती असल्यामुळे देशाचे फार नुकसान होत आहे. या वयातही सरकारवर टीका करायलासुद्धा त्याला हातात कागद लागतो. तुम्हाला आठवत असेल तर अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्यावेळी त्याने संसदेत एक भाषण वाचून दाखवले की लोकपाल हे पद निर्माण केलेच तर त्याला घटनात्मक दर्जा असावा वगैरे. त्यातले एक अक्षर तरी त्याला समजले असेल का शंका होती. तेव्हापासून आजपर्यंत त्याचे वय वाढण्याव्यतिरिक्त कोणताही बदल झालेला दिसत नाही. तेव्हा न झेपणारे उद्योग त्याला करू देण्यात कॉंग्रेसी लोकांचा लाळघोटेपणाच कारणीभूत आहे. बरे, कॉंग्रेसकडे लायक पर्याय नाही असेही नाही. म्हणून तो पप्पू. यात मी कॉंग्रेसविरोधी आहे की कसे याचा काही संबंध नाही.

>>

तरीही ते असभ्य आणि चूकच!

प्रत्येक व्यक्तीच्या काही एक मर्यादा असतात तसेच त्या राहुल गान्धी यान्च्या पण आहेत. या मर्यादा आहेत आणि त्यात खरोखरच तथ्य असेल तर आपण त्यान्ना पप्पू या नावाने सम्बोधणे नक्कीच टाळायला हवे. येथे आपली जबाबदारी अजुनच वाढते.

आज पप्पू म्हटलेले चालते पण उद्या जर ते देशाचे पन्तप्रधान झाले तर तसे सम्बोधणे अयोग्य ठरेल हे पटत नाही. पद, व्यक्ती यान्ची सरमिसळ होते आहे. पदावर नसलेल्या व्यक्तीन्ची हेटाळणी, टिन्गल करणे योग्य आहे असाही अर्थ निघतो.

माझी धडपड चर्चा करा, विनोद घडवा, पण एखाद्याच्या `मर्यादे`च्या थट्टा करु नका... आक्षेप घेण्यामागे येथिल एकन्दरित चर्चेचा स्तर आहे त्या पेक्षा थोडा वर नेता येतो का हा होता.

शेवटी तुम्ही त्यान्ना काय सम्बोधावे ह्याचे स्वातन्त्र्य तुम्हाला आहे. त्यान्ना तसेच इतरान्नाही एकेरी, किव्वा अजुन काही नावाने सम्बोधल्याने राहूल गान्धी यान्ना काडीचाही फरक पडत नाही पण तुमच्या बद्दल येथिल वाचकात निर्माण झालेला किव्वा होत असलेला आदर कमी होतो.

असो. या पेक्षा जास्त चर्चा करण्याची क्षमता तसेच कसब माझ्याकडे नाही आहे.... Happy शुभेच्छा.

केदार,

अभिनंदन व धन्यवाद!

म्हणजे उच्च पदावर (उर्फ पंतप्रधानपद. खासदार हे नीच पद असावे) असले, तरच असले उल्लेख डिरोगेटरी ठरतात.

>>

दिमा

राहूल हे पंतप्रधान नाहीत. शिवाय पप्पू ही शिवी आहे असे तुमचे म्हणणे आहे का? तसे असेल तर हॉर्न ओके प्लिज थंक्युं ! फिर मिलेंगे !

ती शिवी नसेल तर मात्र तुम्ही मनात विचार करा. मी ही पप्पू म्हणत नाही हे मी लिहिले आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की ती शिवी आहे म्हणून म्हणत नाही.

त्यामुळे बहुदा त्यांच्याबद्दल राकु वापरत असलेले संबोधन केदार यांच्यामते डिरोगेटरी नसणार. >>

तुम्ही गल्लत करत आहाता. मी कुणालाही डिरोगेटरी संबोधित नाही. जे मी म्हणालोच नाही ते माझ्या तोंडात घालण्याचे तुमचे कसब मात्र खूप चांगले आहे.

परत एकदा पंतप्रधान किंवा कॅबिनेट मध्ये ( आणि राष्ट्रपती) असणे वेगळे आणि इतर कोणी असणे वेगळे. ते समजून घ्याल अशी तुमच्या कडून अपेक्षा करावी की नाही? ( आजकाल अपेक्षा शब्द गाजतोय म्हणून वापरतो. )

ते पंतप्रधान पद मी इथे आणले कारण तुमचे मित्र व खुद्द तुम्हीत्यांना काय काय भाषेत संबोधतात ते तुम्हालाही ठावूक आहे.

- कृपया परत - मी कोणाला डिरोगेटरी उद्देशून बोला असे कधीच म्हणत नाही. पण इथे पप्पू ह्या शब्दाबद्दल लिहितोय. सकाळ मधील एका सदरात राज ठाकर्‍यांना चुलतराज असे संबोधले जाते. ते लगेच काय डिरोगेटरी झाले काय?

केदार,
लोकांना उद्देशून डिरोगेटरी शब्द वापरण्याबद्दल बोलणे सुरू आहे. तेही त्यांच्या वापरातले शब्द. तुमच्या नव्हे. तुम्ही उगंच पदावर असलेल्या व्यक्तींना सूट वगैरे फुबा फोडलात Wink

शिवाय डिरोगेटरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायला हवा का? डिरोगेटरी म्हणजे शिवी नाही.

पण ते ज्ञान उगाच वाटेल तसे उधळू नका, तसेच इतरांनाही काही कमीजास्त ज्ञान असू शकते यावर विश्वास ठेवा. आणि दुस-याचे ज्ञान-शिक्षण वगैरेचा उल्लेख न करता कमेंट आली तर पहा. कारण ते सभ्यपणाचे लक्षण नाही, एवढे तरी ज्ञानाने गच्च भरलेल्या तुमच्या मेंदूला कळत असेल (पुन्हा तुमची भाषा वापरण्याचा प्रयत्न केला आहे. मला तशी सवय नसल्याने जमले नसल्यास माफ करा) अशी आशा आहे.व >>

हे एके ठिकाणी धागा कर्त्याने लिहिले आहे. स्वतःवर आल्यावर काय उपदेश देतात बघा.

Pages