रात्रीच्या निळ्याशार डोहात डुबताना

Submitted by कविता१९७८ on 7 December, 2015 - 04:16

रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना

विसरते मी दिवसभराचे सर्व कष्ट

तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात

पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज

सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात

जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या आईचाही तिरस्कार करु शकतोस

तिथे दुसर्‍या बायकांची काय बिशाद

तरीही तुझ्याकडुन सन्मानाची वेडी आशा केलीच मी

आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु

तरीही जा तुला माफ केले

कारण एक आई दुसर्‍या आईच्या कुसेचा अवमान करुच शकत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users