होकार द्यायचा की नाही म्हणायचे

Submitted by जयदीप. on 6 December, 2015 - 21:36

जाऊन यायचे वा येऊन जायचे
येथून जायचे अन् येथेच यायचे !

होकार द्यायचा? की.... नाही म्हणायचे...
इतक्यात आपले जर नाही ठरायचे ...

आहे तसे कुणाला नाही दिसत कधी
आहे तुला कशाला हे जग बघायचे

पर्याय दोन देतो आहे तुला, ठरव.
झोकून द्यायचे की उतरून जायचे

केव्हातरी तुलाही मिळतील उत्तरे
शॊधत तुला स्वतःला आहे निघायचे

.....जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users