फुसके बार – ०४ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 3 December, 2015 - 13:05

फुसके बार – ०४ डिसेंबर २०१५
.
१) चेन्नईतील भयानक पुराच्या प्रकाराने २००५मधील मुंबईची आठवण आली. अर्थात मुंबईतील पूर यामानाने फारच अल्पकाळ टिकला होता. कंपनीत अडकून पडलेल्यांपैकी एका कंपनीच्या जनसंपर्क अधिका-याचे दूर उपनगरात असलेले तळमजल्यावरचे पूर्ण घर पाण्याखाली गेले होते. लहान मुलांसह कुटुंबातील सारेच सदस्य इमारतीतील उंचावरच्या जिन्यात बसलेले होते. त्यांना कोणी घरातही घ्यायला तयार नव्हते. घरातल्या सा-या वस्तु पाण्याखाली गेल्यामुळे झालेले प्रचंड नुकसान, घरातल्या मंडळींची अशी अवस्था हे सारे मनातच ठेवून तो अधिकारी चेह-यावर उसने हसू आणत कंपनीतील प्रत्येकाला जमेल तशी मदत करत होता.

दुस-या दिवशी पूराचे पाणी उतरल्यानंतर कितीतरी अंतर चालत जाताना फ्लायओव्हरवर बंद पडलेल्या किंवा ठिकठिकाणी सोडून दिलेल्या गाड्यांच्या काचा फोडून आतला ऐवज लांबवलेला दिसत होता. तेव्हाच मुंबईकरांचे संकटकाळी एकमेकांना मदत करण्याचे दावे कसे फोल आहेत हेदेखील लक्षात आले होते. रेल्वे अपघातांमध्ये खरोखर मदत करणारेही असतात, तसेच मृतांच्या किंवा जखमींच्या कानाच्या पाळ्या तोडून, बोटे तोडून सोन्याचा ऐवज लांबवणारेही असतात. हा प्रकारही तसाच.

चेन्नईचा विमानतळ पाण्याखाली आहे. तेथील धावपट्टीच मुळात एका नदीच्या पात्रात बांधली गेलेली आहे असे काहीजण सांगत आहेत. तेव्हा मुंबईची मिठी नदी किंवा पुण्याची राम नदी खाऊन टाकणारे फक्त आपल्याकडेच नाहीत हे कळते. बिल्डरांची धन करण्यासाठी चेन्नईतील पल्लवरम हा मोठा तलावही पद्धतशीरपणे बुजवत जाण्यामध्येे सर्वपक्षीय सहमती आहे असे कळते.

काल चेन्नईमध्ये अन्नवाटप करणा-या लष्कराच्या जवानांकडून एक पाकिट मिळाल्यानंतर ते आणखी देत असतानाही मला एवढे पुरेसे आहे, पुढे जाऊन इतरांनाही द्या असे हातवारे करून सांगणारी एक महिलाही त्या जवानांना भेटली. कोण कोणत्या स्वरूपात माणुसकी दाखवेल याचा नेम नसतो.

मागच्या वर्षीच्या काश्मीरमधल्या पुरानंतर चेन्नईच्या या पुरात लष्कर करत असलेले मदतीचे काम फार मोठे आहे.

२) आजच्या चित्रपटांमध्ये कॉंप्युटर ग्राफिक्सचा इतका मोठा भाग असतो, की एखाद्याने असे चित्रपट कसे बनवले जातात हे पाहिले तर त्यांना पुन्हा सिनेमाच पहावासा वाटणार नाही असे अनिमेशन क्षेत्रातील तज्ज्ञांशी झालेल्या चर्चेतून कळले. धूम ३ या सिनेमात कितीतरीवेळा सुसाटपणे बाइक चालवणारा आमीर त्या सिनेमात एकदाही बाईकवर बसलेला नसल्याचे कळले. अशी अनेक उदाहरणे. एवढेच नव्हे, तर सलमानसारख्याचे सिक्सपॅक्सही सॉफ्टवेअरच्या सहाय्याने काढले जातात व आपल्याला दाखवले जातात म्हणे. अजून नाटकांमध्ये तरी असते तसे दिसते हे आपले भाग्य म्हणायचे.

३) याच तज्ज्ञांशी झालेल्या चर्चेत फिल्म इन्स्टिटयुटचे अनेक विद्यार्थी वेळेत आपला कोर्स का पूर्ण करू शकत नाहीत याचेही एक कारण कळले. या विद्यार्थ्यांकडे पुरेसे कौशल्य आले की त्यांचा कोर्स पूर्ण होण्याआधीच त्यांना सिनेमातून कामे करण्यासाठी बोलावले जाते. ती प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची संधी असल्यामुळे बहुतेकजण त्याच्यामागे जातात. त्याचा परिणाम त्यांचा कोर्स पूर्ण करण्यावर होतो.

४) Cricbuzz नावाच्या लोकप्रिय वेबसाईटची एक जाहिरात दाखवतात. मुलगी पहायला आलेला एक माठ फोनवर या वेबसाइटवरील बातमी वाचून म्हणतो की फाइन लेगवर कॅच सोडला. त्यावर ती मुलगी तिचाच ‘लेग’ आक्रसून घेते. लोक कल्पनाशक्तीच्या बाबतीत एवढे दरिद्री कसे असतात कोणास ठाऊक. शिवाय अशामुळे ती वेबसाईट अशा मठ्ठांसाठीच आहे असा लोकांचा समज होईल अशी शंकाही त्याना वाटत नाही.

५) मागच्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजाच्या बॅटला लागलेला चेंडू आफ्रिकेच्या यष्टीरक्षकाच्या बुटावर लागून उंच उडाल्यावर त्याचा झेल घेण्यात आला. आज फलंदाजाने जोरात मारलेला फटका शॉर्टलेगवरील क्षेत्ररक्षकाला जोरात लागून चांगलाच उंच उडाला व पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने झेल घेतला. अशा प्रकारे लागोपाठ बळी घेण्याचा प्रकारही प्रथमच घडला असेल.

६) बिनडोक पंकजा

शनि-शिंगणापूरमध्ये व मारूतीच्या काही देवळांमध्ये स्त्रियांबाबत जो भेदभाव केला जातो, त्यामुळे महिलांचा अपमान होण्याचा प्रश्न कसा उद्भवतो असा धन्य प्रश्न मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी चिक्कीप्रकरणानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये फार तोंड उघडले नव्हते, तेव्हा बरेच बरे वाटत होते. आता त्यांनी बोलायला पुन्हा सुरूवात केल्यामुळे एकूण शांतता भंग पावणार हे नक्की.

आजच्याच लोकसत्तामध्ये भेदभाव करणा-या अशा रूढींचे समर्थन करणारी वाचकांची पत्रे लोकसत्ताकडे येतच नाहीत, की येऊनही लोकसत्ता ती छापत नाही असा धन्य सवाल एका महिलेनेच केला आहे. पंकजांनी ते फारच मनावर घेतलेले दिसते.

७) दक्षिण भारतातील कडवट दलित नेते कांच्या इल्या यांनी पटेलांबद्दल नुकतेच विधान केले की पटेल पंतप्रधान झाले असते तर त्यांनी डॉ. आंबेडकरांना आताची म्हणजे धर्मनिरपेक्ष व दलितांना आरक्षण देणारी घटना लिहूच दिली नसती. कॉंग्रेसवाल्यांपैकी कोणीही त्याविरूद्ध फार आवाज उठवला नाही की पटेलांची पाठराखण करण्याचा प्रयत्नही केला नाही. पटेलांना कॉंग्रेस वा-यावर सोडते हे असे.

याउलट चिदंबरमसाहेबांनी सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी घालून कॉंग्रेस सरकारने चूक केली असे विधान केले, ते खोडून काढायला मात्र कॉंग्रेस अगदी तत्परेतेने धावली. कमाल आहे.

८) उद्धव ठकवणारे यांची कॉंग्रेसच्या पप्पूशी स्पर्धा

मराठवाड्यात काही शेतक-यांना शेळ्या, रोख रक्कम, वगैरेंचे पक्षपातळीवर वाटप केल्यानंतर जनतेला शिवसेना कसे काम करते हे कळून चुकले आहे. तेव्हा त्या कामाच्या आधारावर आता पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे बालस्वप्नरंजन उद्धव ठकवणारे यांनी केले. या तर्काबद्दल उद्धवना एक लॉलिपॉप बक्षिस म्हणून नक्की द्यायला हवे. बाल आदित्यच्या ऐवजी दिवसेंदिवस कॉंग्रेसच्या पप्पूशी उद्धवच स्पर्धा करत असल्याचे दिसते आहे.

++++++++++++++

सकारात्मक कमेंट्स करणा-या सदस्यांसाठी निवेदन:

गेल्या काही दिवसांपासून माझ्या जवळजवळ प्रत्येक पोस्टवर मायबोलीच्या काही सदस्यांनी निव्वळ टवाळखोरी चालू केलेली आहे. एखाद्याने विषयाला सोडून कमेंट करणे व इतरांनी मग त्यावर पुढे तशाच कमेंट करणे असा प्रकार चालू आहे. येथे एखाद्याला ब्लॉक करणे अथवा विषयाला धरून नसलेल्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नसल्याचा गैरफायदा काही सदस्य घेत आहेत. काही जण मी लिहूच नये किंवा दुसरीकडे कोठे तरी लिहावे असा आग्रह अजुनही धरत आहेत. यातला विकृत आनंद व त्यातून मिळणारे समाधान त्यांना जरूर मिळू देत. काही सदस्य मात्र विषयाला धरून कमेंट करत असतात व मी काहीवेळा त्यांच्याशी त्यांच्या मतांबद्दल चर्चाही करतो. परंतु येथे टवाळखोरी इतकी वाढलेली आहे की मला अशा सकारात्मक कमेंट शोधणेच अवघड होऊन बसते आहे.

तेव्हा सकारात्मक कमेंट्स करू इच्छिणा-या सदस्यांना माझी विनंती आहे, की ऍडमिनने अशा टवाळखोरीच्या विकृतीचा बंदोबस्त करेपर्यंत माझ्या कोणत्याही पोस्टवर काही कमेंट करू नये. आपण माझ्या पोस्ट वाचण्यासाठी वेळ दिलात एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे व त्यासाठी मी आपला आभारी आहे. कमीत कमी मी तरी कोणत्याही कमेंटची नोंद घेऊ शकणार नाही.

मायबोली हे इतर काही संस्थळांप्रमाणे टवाळखोरांचा अड्डा नाही अशी माझी समजूत असल्यामुळे मी येथे लिहित राहिलो आहे. मी कोणाच्याही पोस्टवर जाऊन घाण करत नाही, इतरांकडूनही माझी तेवढीच माफक अपेक्षा आहे. परंतु गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून वस्तुस्थिती वेगळी असल्याचे लक्षात आले आहे. या बाबतीत मी व्यक्तीश: फार काही करू शकत नसल्यामुळे हे निवेदन करत आहे.

वास्तविक या टवाळखोरांपैकी एकहीजण माझ्या पोस्टकडे फिरकला नाही तरी मला काडीचाही फरक पडत नाही. परंतु येथे त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे त्यांना त्यांचे उपद्रवमूल्य दाखवून द्यायचे आहे. या प्रकारातून मायबोलीची प्रतिष्ठा वाढणार असेल तर त्यांनी तसे जरूर करत रहावे. माझी हरकत नाही. तेव्हा टवाळखोरांनो, वर म्हटल्याप्रमाणे तुमची विकृती येथे जरूर दाखवा. तुम्हाला कसलेही भय नाही. तुम्हाला कसलीही लाजलज्जा असेल याची मला अपेक्षाही नाही. तेव्हा तुमचे चालू द्या. उलट हे निवेदन पाहिल्यावर तुम्ही आणखीच चेकाळाल याची मला खात्री आहे.

यापुढे येथील माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये मी हे निवेदन टाकत जाणार आहे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलकर्णी साहेब,
मायबोलीच्या भाषेत, तुम्ही काढत असता, त्याला धागा, बाफ किंवा बीबी म्हणतात.
याखालच्या प्रत्येक प्रतिसादाला 'पोस्ट' म्हणतात.

सिरियसली,
तुम्ही तुमच्या प्रत्येक पोस्टखाली ते इतकं मोठ्ठं कॉपी पेस्ट करणार आहात?

अशा परंपरा तोडायच्या नाहीत कारण त्या जुन्या आहेत म्हणून असे मुन्डेबाईचे मत ती बिनडोक आहे हेच दाखवते. हिच्या जन्माच्या अगोदर बऱ्याच अन्यायकारक प्रथा आपल्या देशात होत्या उदाहरणार्थ सती जाणे , महिला शिक्षण बंदी त्या जश्या बंद झाल्या त्याप्रमाणे बायकाना काही देवळात प्रवेश बन्दीची प्रथा सुध्धा बंद होणे गरजेचे आहे. त्यासाटी महिलानी चळवळ केली पाहिजे. मी ऑस्ट्रेलियात व्हाईट रिबन क्याम्पेनचा कम्युनिटी अम्बासेडर आहे मुन्देबाईच्या मनोव्रुत्तिचे सुशिक्शित भारतिय (यात अनेक मराथि अहेत) लोक आपल्या बायकोचे काय हाल करतात ते मी पाहिले आहे.