डबल सीट सिनेमाचे कथानक व असलेल्या-नसलेल्या असहिष्णुतेचा वाद

Submitted by Rajesh Kulkarni on 2 December, 2015 - 03:34

डबल सीट सिनेमाचे कथानक व असलेल्या-नसलेल्या असहिष्णुतेचा वाद
.

डबल सीट सिनेमातल्या नायकाच्या लग्नानंतर त्याची बायको तो रहात असलेल्या चाळीमध्ये रहायला येते. तेथे खासगी संडासांची सोय नसल्यामुळे तीदेखील संडाससाठीच्या रांगेत उभी असल्याचे आपला नायक पाहतो व त्याला नव्या स्वतंत्र घराची निकड वाटू लागते. इतकी वर्षे त्याची आईही त्याच रांगेत रोज उभी रहात असते, ते त्याच्या लक्षात आलेले नसते. झालेच तर कथेमध्ये त्याची कोणी बहिण असलेली दाखवलेली नाही, एक भाऊच दाखवला आहे. अन्यथा वयात आलेल्या बहिणीला त्या रांगेत पाहूनही त्याला कदाचित तसेच वाटले असते की नसते कोणास ठाऊक.

अलीकडे वाढत्या असहिष्णुतेवरून चाललेल्या वादावरून वाटते, एखाद्या गोष्टीतले वाईट दिसायला व त्याबद्दल काही करायला ती वेळच यावी लागते. कितीही अप्रिय घटना आधीही होत असल्या तरी एक तर त्या आपल्याला जाणवत नाहीत, जाणवल्या तरी त्याबाबत तेव्हा काही करावेसे वाटत नाही - कुठल्याही कारणामुळे. जेव्हा काही करावेसे वाटते, तेव्हा इतर कोणी आधीच काही करावेसे का वाटले नाही, असे विचारणारच. त्यांचेही विचारणे योग्यच असते. मात्र मग प्रत्येकाला याबाबतीतील आपल्याला असलेल्या ‘स्वातंत्र्याचा’ साक्षात्कार होतो व त्याबद्दल कोणी काही टोचून बोलले तरी राग येतो. आम्हाला या टायमिंगबद्दल विचारण्याचा तुम्हाला काही हक्क नाही असेही ते इतरांना सुनवायला कमी करत नाहीत.

फारच कमी जणांना याची जाणीव असते. म्हणून काही पावले उचलताना ते आधीच आपल्या आधीच्या चुकांबद्दल, मर्यादांबद्दलही बोलतात. आम्ही आताच अमुकअमुक का केले हे आम्हाला विचारू नका असा (बोगस) आवेश ते आणत नाहीत.

याची दुसरी बाजू अशी की आपल्याला जेव्हा जे वाटेल ते करावेच, पण आपल्या वागण्यातील विसंगतीबद्दल कोणी काही बोललेच, तर हो, तुमच्या बोलण्यात तथ्य आहे, हे म्हणण्याइतपत मनाची तयारीही असावी.

काही गोष्टींमध्ये दोघांचेही म्हणणे, दोन्ही बाजुंचा युक्तीवाद योग्यच असतो अशा काही मोजक्या गोष्टींपैकी ही एक आहे.

डबल सीटच्या कथेतून असे एखादे वास्तव स्पष्ट होऊ शकेल याची सिनेमाच्या कथाकारांनाही कल्पना नसावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आपल्याला जेव्हा जे वाटेल ते करावेच, पण आपल्या वागण्यातील विसंगतीबद्दल कोणी काही बोललेच, तर हो, तुमच्या बोलण्यात तथ्य आहे, हे म्हणण्याइतपत मनाची तयारीही असावी.

पण अन्यत्र तर तुम्ही प्रतिसाद काढता यावेत असे म्हणालात ते का ? Uhoh
असो, हे तुम्ही जे लिहिले आहे ते सर्वजण आचरणात आणू शकतील तर धरणीवर स्वर्ग अवतरेल. Happy

महेश,
यापूर्वीही तुम्हाला सांगितलेले आहे की पोस्टमधील काही पटले नाही तर त्याबद्दल लिहायला अजिबात हरकत नाही. पण असंबद्ध लिहिणे, टवाळक्या करणारे लिहिणे यावर आक्षेप आहे. तुम्हाला या दोन्हीतला फरक कळत असेल.
हे माध्यम मोफत आहे म्हणून दुस-याला उपद्रव होईल असे लिहायचे हा सभ्यपणा नव्हे. तेव्हा केवळ येथे एखाद्याला ब्लॉक करण्याची सोय नाही, असंबद्ध कमेंट्स काढून टाकण्याची सोय नाही, म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नये. मी कोठे लिहावे, कोठे नको, याबद्दलचा तुमचा सल्लाही मला नको आहे. हे मी तुम्हाला आधीही सांगितले आहे. माझ्या पोस्टवर चांगली-वाईट कमेंट केली नाहीत तरी चालेल, हेही मी तुम्हाला याआधी सांगितले आहे.

अहो तुम्ही या आत्ताच्या सिनेमाचा दाखला देताय, आम्ही पार महाभारतातले वाक्यं वापरतो
'तेव्हा कुठे गेला होता राधासूता तुझा धर्म?'

Happy

मग संडास आहे की नाही हे पाहुनच चाळीत रहायला याय्चे तिने व त्याने ठरवायचे ना?

फारच असहिष्णू आहात बुवा !
तुमचे लिखाण जर तुम्हाला अनियंत्रित हवे असेल तर प्रतिसादांवर नियंत्रण का हवे आहे ? Happy

आम्ही पार महाभारतातले वाक्यं वापरतो
'तेव्हा कुठे गेला होता राधासूता तुझा धर्म?''>>

वापरू नका हं. तुमचे ते हे चिडतात Proud

पगारे राजकारणावरच जास्त लिहीतात.>>>
नाही ते असं हवं आहे..
"पगारे काँग्रेस राजकारणावरच जास्त लिहीतात."
अति अवांतर..
काँग्रेस ... खरतर त्यातला होता नव्हता तेव्हढा "ग्रेस" महात्मांबरोबरच संपला...

smiley-throwing-bomb.gif

आफ्रीदी>>> घ्या. इकडचे कुण्णीच नाही का आठवले. असहिष्णुता म्हणतात ती हीच का? Light 1