वॉटर लिलीज्

Submitted by Snn on 4 February, 2009 - 05:25

काही महिन्यांपूर्वी लंडन मधल्या क्यू (kew) गार्डनमध्ये गेलो होतो.
तेव्हा तिथल्या वॉटर लिलीज् आणि कमळाचे फोटो काढले होते.

DSC00489.jpg

[with vignetting effect]
DSC00488.jpgDSC00494.jpgDSC00496.jpgDSC00475.jpg

काही पाने इतकी मोठी होती कि एखादे लहान मूलही ऐसपैस बसुन खेळू शकेन.
DSC00478.jpg

गुलमोहर: 

मस्त ! २ रा अन शेवटचा सही !

केवढी मोठाली पानं आहेत ती! पांढरं आणि गुलाबी कमळं छान दिसताहेत!
आणि इथल्या म्हणजे कुठे?

prakashkalel, ITgirl, धन्यवाद.
मी सुद्धा प्रथमच इतकी मोठी पाने पाहत होते.

अजुन कुनी काही कविता कशी नाही केली ईथे !

पांढर्‍या,निळ्या,जांभळ्या
फुलांची बसली पंगत..
हिरव्या हिरव्या ताटांमध्ये
जेवणाची न्यारिच रंगत !

ही पानं आहेत असं वाटलंच नाही आधी.. Happy

सुरश्री, झकास आलेत फोटो!
-योगेश

वॅव..
फोटोसाठी अन प्रकाशभौ तुमच्या कवितेसाठीसुद्धा ! Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

अरे वा मला तर त्या फुलांपेक्षा पानेच आवडली. आपल्याकडे ही जात येत नाही. निदान माझ्या बघण्यात तरी नाही. दुसरे म्हणजे कमळ व वॉटर लीली वेगळे हे नुकतेच कळले मला. कमळ (लक्ष्मीचे, भाजपाचे) पहील्या व तिसर्‍या चित्रात आहे ते व इतर पाने निमुळती असलेली वॉटर लीली. बरोबर ना?

त्या मोठ्या पानाच्या कमळाला 'किंग लोटस' म्हनतात Happy
king_lotus.jpg
सौजन्य-गुगल

'किंग लोटस' च्या फोटोसाठी धन्यवाद.
बाकी त्याचे देठ किती मजबूत असतात, याची परिक्षा नाही घेवू शकलो Sad
पाने निमुळती असलेली वॉटर लीली. बरोबर.

वा. मलाही पाने जास्त आवडली. फुलेपण छान.

पानं मस्तच आहेत, पहिल्यांदा अस होतय की कमळांच्या एवजी पानं फारच सुंदर दिसत आहेत. Happy

पानं काय मस्त आहेत ताटं मांडल्यासारखी.

सुरश्री, छान आहेत पाने. इथे US मध्ये PA ला Longwood garden आहे, तिथे पाहिली. माझ्या मुलाला त्यावर बसायचे होते. Happy माझ्याकडे आहेत काही फोटो. हा त्यातला एक-
kamalp1.jpg

सगळ्यांच्या फोटोतली पानं फारच आवडली.

अरे वा, लालु प्रकाश. मस्तच. Happy

सुरश्रि एकदम मस्तच ग. हि खरोखरचि पान आहेत का ग ?

लालु...तुमचा फोटो पन मस्त आहे...ताटांचे(पानांचे) लाल काठ सही ! Happy

सर्व फोटोतली पान जास्त आवडली .

सर्वांना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

lalu धन्यवाद.
jagu खरोखरची आहेत ही पाने.
याची देही याची डोळा म्या पाहिली.
निसर्गाचा चमत्कार आणखी काय !
आपण देवींना कमळात बसलेले बघतो, ती कमळेही अवाढव्य असणार यात शंकाच नाही.
पण मी अजुन मोठी कमळे काही पाहिली नाही .

<<<< pournima -पहिल्यांदा अस होतय की कमळांच्या एवजी पानं फारच सुंदर दिसत आहेत.
Happy Happy Happy