आला आला धागा, धरा आपापली जागा

Submitted by बेफ़िकीर on 26 November, 2015 - 11:02

आला आला धागा, धरा आपापली जागा
दोन पाने होइतोवं शाण्यापरी वागा (२)

नव्या नव्या आयडीचं लकाकतं रुप
चार प्रतिसाद येता कळे चेहरा कुरूप
बोटी दिवा, ओठांवर शिवराळ तागा (२)

आजवरी यांना किती जपलं, जपलं
गोठवून पुन्हा पुन्हा तापलं तापलं
चेतवून प्राण यांना, दिली पुन्हा जागा (२)

-'बेफिकीर'!

(प्रेरणा - आला आला वारा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Lol

Lol मस्त!

जबरीच ! Lol
कसले कसले नवनविन आयडी येतात आणि जे येतात ते सगळे आपणच काय ते जगात शहाणे उरलेले आहोत अशा थाटात. Wink

आउच!!
वैयक्तिक, वैयक्तिक!!
असा कमरेखालचा प्रहार केल्याबद्दल पगारे यांचा निषेध!

Biggrin