Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कटलेट सारखं शॅलोफ्राय करता
कटलेट सारखं शॅलोफ्राय करता येईल, नाहीतर आडा डोसा, त्यात अजून पणी घालून डोशाच्या बॅटर सारखं करून घ्यायचं, डोसे होउ शकतील.
गोळाभात
गोळाभात
ते वाफवून वड्या पाडून बंगाली
ते वाफवून वड्या पाडून बंगाली पद्धतीची ' ढोकार दालना ' होऊ शकते. थोडीफार आपल्या पाटवडीच्या रश्यासारखी.
कोथिंबीर वडीसारखं काही तरी
कोथिंबीर वडीसारखं काही तरी बनवता येईल वाफवून. नाही का?
अनिश्का, मन्या, व्हीबी,लंपन
अनिश्का, मन्या, व्हीबी,लंपन
धन्यवाद!
मोहरी भाजून भरडून घ्या. थोडी
मोहरी भाजून भरडून घ्या. थोडी बडिशेप,जीरे,धने ,मेथी दाणे सेपरेट भाजून बारीक करून घ्या. तेल गरम करून गार होवू द्या. रायआवळे स्वच्छ धुवून कोरडे करायला ठेवा . कोरडे झाले कि मोहरी भरडलेली, वरच मिश्रण, मीठ आणि लाल मिरची पावडर आणि साखर घालून मिक्स करा. एक लिंबु पिळून घ्या. आणि गार झालेल तेल ओतुन घ्या. मिक्स केल कि झाल लोणच तयार. अगदीच छोटी कृती आहे म्हणुन इथे लिहून टाकली. नंतर वाटल्यास डिलीट करते.
घरी मिश्र डाळींचे वड्यांसाठी
घरी मिश्र डाळींचे वड्यांसाठी करतो ते मिश्रण वाटून फ्रिजमधे ठेवलेले आहे. वडे करायचे नाहियत. दुसरे (तळण सोडून)
काय करता येईल?
<<
थालीपीठ
घरी मिश्र डाळींचे वड्यांसाठी
घरी मिश्र डाळींचे वड्यांसाठी करतो ते मिश्रण वाटून फ्रिजमधे ठेवलेले आहे. वडे करायचे नाहियत. दुसरे (तळण सोडून)
काय करता येईल? >>
त्याचे मुटके करून वाफवून नंतर जरा जास्त तेलाच्या फोडणीत तीळ वगैरे घालून खमंग लालसर परतून छान तोंडीलावण्याचा किंवा संध्याकाळच्या खाण्याचा प्रकार होईल.
गोळे करून वाफवून हिंग जिरे
गोळे करून वाफवून हिंग जिरे फोडणीवर परतून मीठ मसालेदार पाण्यात उकळून मस्त गोळ्याची आमटी बनवता येईल.पाणी उकळल्यावर गोळे टाकावे.
संजीव कपूरच्या रेसिपीनुसार
संजीव कपूरच्या रेसिपीनुसार,रायआवळ्याचे लोणचे केले.एकदम भन्नाट लागते.पण हे एकदम थोडे केले.बाकीच्या आवळ्यांची चटणी केली.तिखट लोणच्याचा फोटो काढला नाही.
युक्ती सुचविल्याबददल सर्वांचे
युक्ती सुचविल्याबददल सर्वांचे आभार. योकुंच्या सल्ल्यानुसार त्याचे मुटके करून वाफवून नंतर तेलाच्या फोडणीत खमंग परतून घेतले. मस्त dish तयार झाली.
मी मिश्र कडधान्ये भिजवून,
मी मिश्र कडधान्ये भिजवून, प्रे. कु. मधे शिजवून घेऊन त्याचे बीन बर्गर करते. तव्यावर शॅलो फ्राय करुन. तसं काही करता येईल. त्यासाठी तो मिश्र डाळींचा गोळा आधी शिजवून घ्यावा लागेल.
मोड आलेल्या मटकी ची उसळ सोडून
मोड आलेल्या मटकी ची उसळ सोडून अजून काय करता येईल?
मला माझ्या हातची उसळ त्याच चवीची उसळ खाऊन कंटाळा आलाय
मिसळ नाही बनवू शकत, फरसाण नाहीये आणि त्याशिवाय मजा नाही
वर बर्गरची रेसिपी दिली आहे
वर बर्गरची रेसिपी दिली आहे बघा.
मटकी आणि तांदूळ एकत्र करुन, पुलाव/खिचडी करता येईल.
दुसरी एखादी उसळीची रेसिपी बघा. जिरं-खोबरं/आलं-लसूण-हिमी/चिंच-गूळ ह्या तीन प्रकारे मी उसळी करते. वेगळा मसाला वापरून फरक पडेल.
ती भिजवलेली मटकी आणि आवडीची पिठं एकत्र वाटून धिरडी करता येतील.
दाल के पकोडे म्हणून एक प्रकार इथे एका चाय गल्ली नावाच्या रेस्टो मधे मिळतो. रेसिपी माहीत नाही.त्यात मोड आलेली मटकी असते आणि ती कुरकुरीत/कडकडीत लागते.
पुण्यात जागोजागी मटकी-भेळ च्या पाट्या दिसतात, काय ते माहीत नाही.
मटकी थोडं मीठ घालून उकडून
मटकी थोडं मीठ घालून उकडून घ्या आणि (अगदी मेण शिजवायची नाही!) त्यात मीठ, साखर, लिंबू, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि हिरवी मिरची यांपैकी जे असेल ते घालून सॅलड.
माझ्या ताईने वाफवलेली मोड
माझ्या ताईने वाफवलेली मोड आलेली मटकी घालून जरा हेल्दी SPDP केली होती. मस्त लागते. बटाटा थोडा कमी घालायचा.
मटकी भेळ पण करता येईल. मला जरा कोरडा वाटतो तो प्रकार.
शिजवलेल्या मटकी सोबत कच्चा
शिजवलेल्या मटकी सोबत कच्चा कांदा, टमाटो, उकडलेला बटाटा, पनीरचे क्यूब्ज, पोह्यांचा चिवडा असं एकत्र करून वन डिश मील होईल.
चिवडा सोडून बाकी सगळं एकत्र खाल्लंय एकदा.
चांगलं लागलं होतं.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/4126 या रेसिपीत मुगाऐवजी मटकी घालता येईल .
भिजवलेली मटकी असेल तर त्याचा
भिजवलेली मटकी असेल तर त्याचा मसूराचा पुलाव / भात करतो त्या टाईप करता येईल.
मोडाची मटकी टसटशीत शिजवून पातळ पोह्यांचा चिवडा (तयार असेल तर; नाहीतर पातळ पोहे जरा भाजून ते वापरून) भेळ टाईप करता येइल. हे बर्यापैकी पोटभरीचं होईल.
फरसबी असेल तर मटकी आणि
फरसबी असेल तर मटकी आणि बीन्सची भाजी करता येईल.
अत्यंत कष्टाचा उपाय:
अत्यंत कष्टाचा उपाय:
घरी पाणीपुरी पुऱ्या करा, मस्त चिंच चटणी आणि मिरची ठेचा करा , बटाटे उकडून कापा, आणि हे सर्व त्या मटकी बरोबर पाणी पुरीत टाकून गट्टम करा(त्या संन्याश्याने उंदराचा त्रास म्हणून मांजर,गाय आणि बायको आणली तसे.)
मटकी थोड्य तेलावर परतुन तिखट
मटकी थोड्य तेलावर परतुन तिखट मीठ लिंबू रस कोथिंबीर घालून मस्त लागते. बरोबर बीअर प्या.
मटकी update: (हे लिहायला जरा
मटकी update: (हे लिहायला जरा उशीरच झाला)
अख्खे धणे, जिरे तेलात परतले, त्यात कांदा, कढीपत्ता, किंचित गोडा मसाला, ही मिरच्या,लाल तिखट , मीठ, हळद, हे घालून फोडणी केली. अंकुरित मटकी त्यात घालून परतली. पाणी घालून दणदणीत वाफ येऊ दिली,शिजवली. मग जिरेपूड, चाट मसाला, मिसळ मसाला हे जिन्नस थोडेसे घातले. कोथिंबीर चिरून तीही ढकलली.
घरात खाऊ म्हणून आणून ठेवलेला लक्ष्मी नारायण पोहा चिवडा होता, मका पोहे चिवडा (ह्याच चुरा राहिला होता)
एका खोलगट कुंड्यात ही जरा पाणीदार उसळ घेतली. त्यावर डोमही चिवडे कांदा कोथिंबीर घातली
आणि ही जुगाड मिसळ हादडली
इतर आयडिया देणाऱ्यांचे आभार Happy
पुढच्या वेळेस इतर प्रकार करून पाहीन, पाणीपुरी सकट Happy
मला खरं तर काहीतरी भारी करून
मला खरं तर काहीतरी भारी करून खायचं आहे, पण वक्त की कमी
आणि ही जुगाड मिसळ हादडली>>>>>
आणि ही जुगाड मिसळ हादडली>>>>>> हि जुगाड मिसळ पण भारीच दिसतेय कि किल्ले!
मायबोलीतच ‘मटकी पुलाव‘ कृती
मायबोलीतच ‘मटकी पुलाव‘ कृती आहे. छान होतो तो पुलाव.
आन्बे आणलेत पण अजुन पिकले
आन्बे आणलेत पण अजुन पिकले नाहियेत, तान्दळात ठेवु का पिकायला? का पोत्यात घालुन ठेवु(पोत म्हणजे तान्दळाची पिशवी आहे गोणपाटाची)
कश्यात आले आहेत आंबे?
कश्यात आले आहेत आंबे? त्याच्या बॉक्स मध्ये गवतावर असतील तर तसेच राहू देत. पिकतात १-२ दिवसांत.
आम्ही डझनभर घेतले लास्ट वीक मध्ये त्यातले निम्मे अर्धे-कच्चे होते (अगदी रंगही हिरवा होता) तर तो आक्खा बॉक्सच फ्रिजवर ठेवला होता; (बहुधा) फ्रीजच्या त्या बारक्याश्या उबेमुळे सगळे आंबे २ दिसांत मस्त पिकले.
प्राजक्ता, तुमच्याकडे
प्राजक्ता, तुमच्याकडे भारतातले आंबे आले की सा. अमेरिकेतुन?
रवा फ्रीजमध्ये ठेवाय्ला विसरले. वरवर जाळी दिसताहेत पण वास खवट नाही. काय करु? फेकू की काही पद्धत आहे नीट करायची?
धन्यवाद
Veka,
Veka,
जाळी काढून रवा चालू घ्या. नंतर रवा 1 चमचा तूप भाजून ठेवा.हा भाजलेला रvaa thand झाल्यावर डब्यात भरून बाहेरच ठेवा.
जास्त आल्या दिसल्यास रवा फेकून द्या.
Pages