टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)

Submitted by Rajesh Kulkarni on 20 November, 2015 - 23:18

टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)

कोणाच्या व्यवसायाबद्दल एरवी बोलू नये असे वाटते. कारण ब-याचदा तो त्यांच्या पोटापाण्याचा मार्ग असू शकतो.

माझ्या मते या रेम्या डोक्याच्या सिरियल्स समाजाला मानसिकद्ृष्ट्या अधु करण्याचे काम करत आहेत; मराठी-हिंदी- बहुतेक सगळ्याच. समाजाला चांगला मार्ग दाखवणारे किंवा स्फुर्तिदायक असे विषय हाताळणा-या अगदी क्वचितच.

महिनोंमहिने वा वर्षानुवर्षे हे दळण दळत राहणे हे यामागचे मुख्य कारण आहे असे वाटते. चांगला विषय घेऊन मोजक्या वेळेत तो पूर्ण करणे असे असायला हवे. पण त्याऐवजी प्रेक्षकांना व्यसन लावण्याचे आणि निर्बुद्ध बनवण्याचे काम केले जाते या मतिमंद मालिकांमुळे.

तेव्हा टीआरपी हे तांत्रिक वा आर्थिक कारण असो की इतर काही, हे स्वत:ला विकलेले लेखकच या प्रकाराला जबाबदार आहेत यात शंका नाही.

एरवी कोणतेच काम कमी दर्जाचे नसते. पण हे पांढरपेशे लेखक (खरे तर लेखक म्हणायला हे नालायक - पाट्या टाकणा-या या जातीला समर्पक काहीतरी नवा शब्द हवा. उदा. पोभपाटालेखक - पोटभरूपाट्याटाकणारे लेखक).

मनोरंजनाच्या नावाखाली सतत दुस-याचा मत्सर, कटकारस्थाने, बटबटीतपणा, अतिसोशिकपणा, अचकटविचकट विनोद या गोष्टींचा मारा करत असतात. त्यांना खरोखरच लेखनाची आवड असती तर त्यांनी असे कचरा लेखन केले असते का? त्यामुळे असे विकले जाण्यास त्यांनाच जबाबदार धरायला हवे.

चांगले कार्यक्रम दिले तर कोणाला नको आहेत? टीव्ही पाहण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही वा करायची इच्छा नाही, अशा लोकांनी तो कार्यक्रम पाहिला काय आणि न पाहिला काय, काय फरक पडतो?

वर्तमानपत्रात जे विकते ते छापणा-यांना आपण माफ करतो का? अशांना पोटभरू पत्रकारच म्हणतो ना! क्रिकेटच्या मैदानात केवळ चॅनलला किंवा स्पर्धेच्या आयोजकांना सामना रंगतदार व्हायला हवा म्हणून नको त्या गोष्टी केल्या तर आपण त्या सहन करू का? (मॅच फिक्स्ड की काय हे कळायला सहसा मार्ग नसतो ही गोष्ट वेगळी). प्रत्येकाने आपले काम दर्जा राखून करणेच अपेक्षित असायला हवे ना? तेव्हा हे समाजात उजळ माथ्याने वावरणारे हे समाजद्रोही निव्वळ पोटभरूच आहेत आणि त्यांच्यातले काही जेव्हा उठसुट विविध पुरस्कार स्विकारायला जातात तेव्हा त्या पुरस्काराचे नावही पोटभरू आणि विकला गेलेल्यासाठीचा पुरस्कार असेच हवे.

टीआरपीच्या नावाखाली चॅनलला हवे ते द्यायला यांचे डोके तरी यांच्याकडेच असते ना!
व्यावसायिकता म्हणजे स्वत:ला असे विकणे असे तरी अपेक्षित नको.

कोणी म्हणेल, की दाखवतात ते न पाहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. मात्र ते सोयीस्करपणे विसरतात की जे सुबुद्ध आहेत ते हे टाळू शकतील, किंबहुना पाहिले तरी विसरून जाऊ शकतील. मात्र येथे बहुसंख्य प्रेक्षक तेवढे सुबुद्ध नसतात. यात कोण किती श्रीमंत, किती शिकलेला किंवा अडाणी, कोणत्या समाजातला, हे अध्याहृत नाही. हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा प्रश्न आहे. तेव्हा असेच लोक बहुसंख्येने असतात. अमेरिकेसह अनेक देशांमधील सामाजिक अभ्यासांवरून लक्षात आलेले आहे की अशा मालिका समाजाला निर्बुद्ध, मठ्ठ बनवतात, स्वत:ची विचारशक्ती गमवायला भाग पाडतात, दुस-याचा हेवा, मत्सर, द्वेष करायला शिकवतात. आक्रस्ताळेपणा शिकवतात. तेव्हा कोणाला या वरकरणी हार्मलेस प्रकार वाटत असेल तर त्यामागचे सत्य हे आहे. तेव्हा यांचे पोट भरावे म्हणून कामाच्या दर्जात तडजोड करणारे हे लोक समाजाचे गुन्हेगारच आहेत.

जे मनापासून वाटते ते लिहीले.

शीर्षकातील लेखक या शब्दापुढील प्रश्नचिन्ह यांना लेखक म्हणावे तरी कसे यासाठी आहे.

आता धडाडू देत तोफा.....मी यापूर्वी ऐकलेले प्रतिवाद....लिहिणारे लिहितात, पाहणारे पाहतात, माझे काय जाते, टीव्हीचा रिमोट तरी आपल्याकडेच असतो ना...तू नॅशनल जिओग्राफिक पहा, तुला कोणी थांबवलेले अाहे.....यात लेखकाचा/लेखिकेचा दोष नसतो, का तर ते जाहिरातदारांच्या म्हणजे टीआरपीच्या रेट्यामुळे मालिकानिर्मात्यांच्या दबावामुळे तसे लिहितात..........वगैरे. तेव्हा यापेक्षा वेगळा प्रतिवाद पहण्यास आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरीचशी चर्चा ही एखाद्या मालिकेबद्दल, त्यात काय आवडले नाही वगैरेची उदाहरणे देऊन होते. येथे कोणत्याही एका मालिकेचा संदर्भ, नाव न देता, या सर्व प्रकारास कारणीभूत जे लेखक आहेत, त्यावर चर्चा अपेक्षित आहे.

अगदीच गरजेचं असेल तर आणखी दोन आयडी घ्या आणि एकदा या बाजूने आणि एकदा त्या बाजूने जोर लावा. हाकानाका. तांत्रिक अडचणी आल्या तर अनेक अनुभवी तज्ञ आहेत ते स्वतःहून मदत करतील.

kapoche, हा हा हा. नाही हो, तेवढा वेळ मिळत नाही हो ही व्हर्च्युअल लढाई खेळत बसायला.

राजेश कुलकर्णी उत्कृष्ट मुद्दे. तुमचे सर्वच लेखन सेन्सिबल आणि विचारप्रवर्त क असते. ते काहीना सोइस्कर नसते तो मुद्दा सोडून देऊ. आता बघा गुलजार याणी अत्यंत दर्जेदार अशी मिर्झा गालिबर सिरियल काढली शक्य झाले असते तर त्यात पुषकळच दळता आले असते पण १३ भागातच आटोपली मालिका. १९८७ सालची ही सिरियल अजूनही लोकांच्या स्मरणात आहे.

कमॉन!!!!

नुकतेच दिवाळीत मला एका (नाव नाही सांगत) चॅनेलकडून डेली सोप मालिका लिखाणाची ऑफर आली आहे, सध्या पार्टटाईम करून जमतेय का बघ असे सांगताहेत, ते कसे जमवता येईल हा विचार करण्यात अर्धी दिवाळी गेली आणि आज आपण त्या पेश्याचीच चीरफाड केली ..

च्याईला आयुष्यात काही बनायच्या आधीच बदनामी... आणि हे प्रत्यक्षात घडल्यावर मी मोठेपणात इथे फुशारक्या मारणार होतो की मी जे लिहितो, मी जे घडवतो, ते महाराष्ट्रातील तमाम ताई, माई, अक्का, मावश्या बघतात.. Sad

आता काय सांगू त्यांना, मला अक्कल आहे, मला निर्बुद्ध लिखाण देऊ नका..

आता काय सांगू त्यांना, मला अक्कल आहे, मला निर्बुद्ध लिखाण देऊ नका..>

काय सांगतोस. एकच नंबर आवडलं राव.

@ धागाकर्ता, एक शंका

लेखकच का?

दिग्दर्शक, निर्माता, हिरो, हिरोईनी, सहकलाकार, हे का नाहीत?

लेखकच का?

ऋन्मेऽऽष,
बाकीचेही जबाबदार असतात. जसे अभिनेते त्यांच्या भयानक अभिनयाने. दिग्दर्शक: आठ जणांना एखाद्या घटनेने आश्चर्य वाटले असेल तर एकापाठोपाठ एक असे आठांचे चेहरे दाखवतात, त्यामुळे जवळजवळ आठ ते दहा सेकंद हे आश्चर्य वाटणे चालू असते. अशाने मालिका हास्यास्पद होते.
पण सर्वात महत्त्वाची जबाबदारी लेखकाची. एकवेळ चांगला अभिनेता, चांगला दिग्दर्शक असेल तरी चांगले संवाद नसतील तर काही करू षकणार नाहीत. त्यामुळे लेखक-संवादलेखकाची जबाबदारी सर्वात अधिक. मालिकेचे जे चांगलेवाईट होते ते त्याच्यामुळे.

कुलकर्णी साहेब ( ल कि ळ ? ) चाळीस आठवडे आहात ना मायबोलीवर, मग १५ तारखेपासून म्हणजे गेल्या आठवड्याभरातच का असे धागे काढू लागला आहात ? तूमच्या धाग्यावरचे विषय आधीच इथे चघळून झालेत, ते तूम्ही वाचत होतात असे दिसतेय. मग का हा अट्टहास ?

असो, माझ्या पोस्टची दखल घ्या, असा अजिबात आग्रह नाही.

दिनेश,
बाकी अनेक विषय आधीच झालेत, असतील. मी वाचत होतो का, नव्हतो.
मी कोणाची पोस्ट कॉपी करत नाही एवढे तुम्हाला सांगतो.
धन्यवाद.

अच्छा म्हणजे या मालिकांना लेखक असतो, तो मालिकेची गोष्ट लिहितो, मग जोडीने पटकथा आणि संवाद लिहिणारी मंडळी पण असणार नैतंर लेखकाने लिहिलेले पडद्यावर कसे दिसावे... हे सगळे खरे काय हो??

अधून मधून जे काही मालिकादर्शन होते त्यावरून निर्माता नट मंडळींपैकी जे हजर असतील त्यांना आज मालिकेत अमुकतमुक घडावे असे माझे मत आहे तर तुम्ही लोक त्या अनुषंगाने जी काय वाक्ये आठवतील ती बोला आणि काहीच बोलायचे सुचत नसेल तर चेहरे संभ्रमित करून ठेवा, बाकीचे कॅमेरा मन पाहून घेईल. असे सांगत असावा असेच मला वाटत होते.

धाग्याचं शीर्षक वाचून मला राहून राहून रवीवारी मूकबधीर लोकांसाठी दूरदर्शनवर हातवारेवाल्या बातम्या असत, त्याम्ची आठवण येतेय.

राजेश कुलकर्नी,
ओके
म्हणजे लेखक हा मालिकेचा सर्वेसर्वा असतो आणि दिग्दर्शकापेक्षाही लेखक आधी असतो असे आपल्याला म्हणायचे आहे का?

मग एखादी कलाकृती, मालिका असो वा चित्रपट हा लेखकाच्या नावाने का ओळखला जात नाही?
हिरो हिरोईनी तरी पडद्यावर दिसतो म्हणून भाव खाऊन जातात असे म्हणू शकतो पण पडद्यामागच्या कलाकारांमध्ये एखाद्या जमलेल्या कलाकृतीचे श्रेय दिग्दर्शक का घेऊन जातो?
हा लेखकांवर अन्याय नाही का?
म्हणजे दिग्दर्शक श्रेय तेवढे घेणार आणि अपयशासाठी आपण लेखकांचे अक्कल काढणार.. वा रे वा राजा अकबरा हा कोणता तुझा न्याय !!!

ऋन्मेऽऽष, तुमच्याच प्रश्नात उत्तर आहे. लेखकावर अन्याय होतोच. चित्रपटात आणखी अंगे असतात. पटकथा व संवाद. दुसरे उदाहरण, संगीतकारापेक्षा गायकाला थोर समजले जाते. आपण समोर दिसणा-यामागे वाहवत जातो.
कथा द्ृश्य माध्यमातून व्यक्त कशी करायची यात दिग्दर्शकाचे कौशल्य असते. त्याचे बहुतेक मालिकांमधून दिसणा-या भ्रष्ट स्वरूपाचे थोडक्यात वर्णन मी वरच्या कमेंटमध्ये लिहिलेलेच आहे.

रॉबिनहूड,
धन्यवाद.
तुम्ही दिलेले मिर्झा गालिबवरील मालिकेचे उदाहरण चपखल आहे. अशा अनेक चांगल्या मालिका होत्या. खासगी वाहिन्यांचा सुळसुळाट झाल्यापासून हे टीआरपीचे झेंगट मागे लागले आहे व जाहिरातदारांच्या दबावापोटी मालिकांची कथा अतर्क्य गटागळ्या खाते. त्यात प्रेक्षकांना काही सकस मिळण्याची शक्यताच रहात नाही.
यावरचा एक शक्य होऊ असेल अशा उपायाबद्दलची पोस्ट मी मागे दुस-या व्यासपीठावर टाकली होती, ती येथे शेअर करेन. पाहुया त्यातून काही निष्पन्न होते काय.

राजेश कुलकर्नी मग सर्वांना एका रांगेत उभे करून झोडपून काढा ना. माझे एवढेच म्हणने आहे.

तसेच सरकारचीही जबाबदारी आहे की देशातील जनता मतिमंद कार्यक्रमांच्या आहारी जात देशाच्या विकासाची गती मंद तर होत नाही ना हे बघणे ..

अश्या मालिकांच्या बौद्धिक पातळीवर सेन्सॉर बसवणे..
लांबलेल्या हजारो भागांच्या रटाळ मालिका एका लिमिटनंतर बंद करणे..
काही कायदेही बनायला हवेत..

आपण लेखकांनाच किंवा कोणत्याही कलाकाराला दोष देऊन त्याचा रोजगार कसा हिरावून घेऊ शकत नाही..

आता जसे दारू हे एक व्यसन आहे. दारूने जनतेचे नुकसान होतेय, कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होताहेत, पण जर दारू बंदीचा काही कायदाच नसेल तर आपण एखाद्या दारू विक्रेत्याला आरोपीच्या पिंजर्‍यात नाही उभे करू शकत.. की बाबा दूध पौष्टिक आहे तर तू दूध विक, दारू का विकत आहेस Happy

अरे,
तुमचं लिखाण अन्यत्र असल्याचं पाहीलं. मालिकांबद्दलचं म्हणणं बरोबर आहे. पण निरुत्साह आहे लोकांच्यात. लेखातले मुद्दे योग्य आहेत पण मांडणी संयत असायला हवी होती असं वाटलं. अर्थात टीव्ही मालिकांविरुद्ध जनमत आहेच, पण एकजूट होऊन वातावरण बदलवण्यासाठी उत्साह दिसून येत नाही.

जनलोकपाल बिलाप्रमाणे लढा उभारला तरच शक्य आहे.
( उद्या संकेतस्थळांवाच्या लेखमालिकांबद्दल क्षोभ व्यक्त होण्याआधीच आवरतं घ्यावं म्हणतो Happy )

अरे,
तुमचं लिखाण अन्यत्र असल्याचं पाहीलं. मालिकांबद्दलचं म्हणणं बरोबर आहे. पण निरुत्साह आहे लोकांच्यात. लेखातले मुद्दे योग्य आहेत पण मांडणी संयत असायला हवी होती असं वाटलं. अर्थात टीव्ही मालिकांविरुद्ध जनमत आहेच, पण एकजूट होऊन वातावरण बदलवण्यासाठी उत्साह दिसून येत नाही.

जनलोकपाल बिलाप्रमाणे लढा उभारला तरच शक्य आहे.
( उद्या संकेतस्थळांवाच्या कथामालिकांबद्दल क्षोभ व्यक्त होण्याआधीच आवरतं घ्यावं म्हणतो Happy )

तुम्ही फ्युचर तो ब्राईट है जी नावाचा चित्रपट पाहिलेला दिसत नाहीये. जरूर पाहावा:-

http://www.dailymotion.com/video/x29481x_future-toh-bright-hai-ji-comedy...

लेखक मतिमंद असतात का? या प्रश्नाचे उत्तर मिळेल. गरजवंताला अक्कल नसते अशी एक म्हण आहे. म्हणजे खरोखरीच अक्कल नसते असे नव्हे तर ती बाजूला ठेवून सांगकाम्यासारखे वावरावे लागते. समाजात असे अनेक गरजवंत आहेत. त्यातल्याच काही व्यक्ति मग बारगर्ल, वेश्या, इतक्या टोकाच्या वाईट व्यवसायात पडतात तर उरलेले सगळे मग काही प्रमाणात तडजोड करीत कधी कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर कुली, मंत्र्यांच्या दबावाखाली चूकीचे निर्णय घेणारे तथाकथित उच्चशिक्षीत प्रशासकीय सनदी अधिकारी, खर्डेघाशी करणारे कारकून, मालकाचा शासनाला देय असलेला कर वाचविण्याकरिता खोटे हिशेब लिहिणारे लेखापाल, तर कधी उलट जास्त कर भरून मालकाचे उत्पन्न प्रचंड असल्याचे दाखवून त्या उत्पन्नावर आधारित बँकेकडून भरमसाठ कर्ज घेण्याची तजवीज करणारे महाभाग, असे चूकीचे हिशेब तपासून ते योग्य असल्याचा निर्वाळा देणारे हिशेब तपासणीस (संदर्भ सत्यम कॉम्प्युटर्सचा घोटाळा), अशा घोटाळेबाज उद्योगांना (संदर्भ किंगफिशर एअरलाईन्स) कर्ज देणार्‍या व नंतर ते बुडित खात्यात टाकणार्‍या बँकांचे (एसबीआय) उच्चाधिकारी इत्यादी भूमिकेत शिरतात. या प्रत्येक भूमिकेत अनेकदा अक्कल व सद्सद्विवेकबुद्धीला तिलांजली द्यावीच लागते. तसेच त्यांच्या या तिलांजली देऊन घेतलेल्या निर्णयाचा समाजाला मोठ्या प्रमाणात तोटा होतो. त्या तूलनेत मालिकेचे लेखक बिचारे फारच निरूपद्रवी म्हणावेत. रिमोटचे बटण व्यवस्थित हाताळले तरी त्यांचा उपद्रव झटक्यात दूर सारता येतो.

२००४ मध्ये प्रदर्शित झालेला किस्मत ( https://www.youtube.com/watch?v=7UqIM9AscXA ) हा चित्रपट पाहावा. एका गुंडाने (बॉबी देओल) एका शासकीय वैद्यकिय अधिकार्‍याला (मोहन जोशी) शस्त्राच्या धाकाने एका आदेशावर सही करायला भाग पाडून जीवघेणे औषध बाजारात उतरविले जाते. या औषधाच्या सेवनाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते तेव्हा खटला चालविला जाऊन दोषींना शिक्षा होते तेव्हा धमकी देऊन आदेशावर बळजबरीने सही मिळविणार्‍या गुंडाला जितकी शिक्षा होते त्यापेक्षा जास्त शिक्षा सही करणार्‍या वैद्यकिय अधिकार्‍याला होते कारण त्याचे पद मोठे असते व जनतेला होणार्‍या हानीत त्याच्या निर्णयाचा सहभाग मोठा असतो (जरी तो निर्णय प्राणाच्या भयाने व दबावाखाली घेतला गेला असला तरीही) असे न्यायालयाचे मत पडते.

तद्वत कुठल्याही व्यक्तिचे समाजातील पद किती लहान वा मोठे आहे आणि त्याच्या निर्णयाचा समाजाच्या जीवनावर किती दूरगामी परिणाम होणार आहे याचा विचार करता त्याचे उपद्रवमूल्य कमी अथवा जास्त ठरते. मालिका लेखकांचे उपद्रवमूल्य अतिशय क्षुल्लक असल्याने त्यांच्यावर टीका करण्यात वेळ व उर्जा खर्ची पाडण्याचे काहीच कारण दिसत नाही.

बिपीन चन्द्र हरीश्चन्द्र कामुळकर,
धन्यवाद. तुम्ही म्हणता ते योग्य आहे. पण यांना स्वत:ला गरजवंत म्हटलेलेही आवडत नाही. एक आघाडीची मालिकालेखिका तर तुम्हाला आवडत नसेल तर टीव्ही बंद करा किंवा दुसरे काही पहा, पण आम्हाला टीआरपीच्या दबावामुळे काही बदलता येणार नाही असे जाहिरपणे सांगते.
तुम्ही उपद्रवमुल्याबद्दल म्हणता, ते दुर्लक्षणीय अजिबात नाही. सगळीकडेच असे कार्यक्रम चालत असतील तर तो समाज स्वत:ची विचार करण्याची शक्ती गमावून बसतो, आक्रस्ताळा होतो, असे अनेक देशविदेशातल्या अभ्यासांमधून दिसुन आले आहे. त्यामुळे हे गांभिर्याने घ्यायला हवे.

सगळीकडेच असे कार्यक्रम चालत असतील तर तो समाज स्वत:ची विचार करण्याची शक्ती गमावून बसतो

या विधानाचा व्यत्यास असा की समाज आधीच स्वत:ची विचार करण्याची शक्ती गमावून बसलेला असल्यानेच सगळीकडेच असे कार्यक्रम चालत असतात. समाज सुधारला अर्थात शून्य बेकारी, शून्य भ्रष्टाचार, सर्वांना पुरेसे व पौष्टिक अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण आणि विचारस्वातंत्र्य मिळाल्यास असले अर्थहीन व तथ्यहीन कार्यक्रम बघण्यात कोणी वेळ घालवणार नाही.

केकता कूपर ने ह्याची सुरुवात केलिये असं एका "जाणकाराने" सांगितल्याचं स्मरतय...
बाकी डीस्कवरी, हिस्ट्री ह्यांचीही परिस्थिती वेगळी नाही, महिन्याभराच दळण तयार करुन ठेवतात आणि पहिला आठवडा सोडला तर तेच तेच दळत राहतात. तो हवेच्या सायकल / बोट / विमान वाला बाबा पाहिला तर डॉस्क्यात जातो, एव्ह्ढ्या वेळेला तो प्रकार दाखवलाय अजुनही दाखवत आहे.
ह्या चॅनेलांचही भारतीयीकरण झालय. पण सध्या तरी ही चॅनेलेच एक दिलासा आहे, तिथेही "टॉलेरंस" वाढला की केकता कुपर होउन जाइल ह्यांचही.
एव्हढ्या बरबाद सिरेली/सिनेमे/फिक्स्ड मॅचेस दाखवायची सोय असताना, ह्यांना कस्काय इन्टोलरन्स वाढलाय अस वाटतं तेच कळलं नाय ब्वो.
बाकी सध्या एकंदर परिस्थिती बघता घरातल्या चपट्या टिव्हीला एच्डिएमआय जोडुन त्याचा मानिटर करुन त्यावर शेअर मार्केटचे ग्राफ बघावेत असं वाटतय, गेला बाजार त्यावर इपब वाचायची सोय करता येइल का हे पडताळुन पाहाव लागेल एकदा. (डोळे पाणावतिल बहुतेक)