सल्ला हवा आहे: लग्नासंबाधी

Submitted by अश्विनि दिक्षित on 20 November, 2015 - 05:57

मी आता जी घट्ना नमुद करत आहे , ती माझ्या सख्हया भावाविशयी आहे. माझा भाऊ वय २७, MSC-IT, झालेला असुन Mumbai मध्ये IT company मधे गेल्या २ वर्श्या पासुन काम करत आहे. त्याच्या लग्नाचे त्याने स्वताहा एक प्रसिध्द internet site वर registration केले. काही कौटुम्बीक कारणाने त्याच्या शिक्शन आणी करीयर याला उशीर झाला. आम्हा कुटुबीयन्चे म्हणणे असे की, त्याने आजुन एक वर्श थाम्बुन मग लग्नाचे पाहवे असे होते. पण त्याने आमचे ऐकले नाही.असो.
आता माझ्या घरच्या परिस्थीती विशयी, वडिल,सेवनिव्रुत्त आहे HAL नासिक येथुन, आई, ग्रुहिणी, वड्लाना ३ वर्श्यापुर्वी Brain Hamrage -left side paralysis झाला.परन्तु ते चालणारे फिरणारे आहे. एकटे प्रवास देखिल करतात.मुलावर अर्थिक द्रुश्त्या आवलम्बुन नाहीत. नसिकला स्वतहाचे घर आणी एक वड्लोपर्जित घर आहे. भाउ दिसयला देखणा, निरोगी, निर्व्यसनी आहे.थोडक्यात घर खाऊन पिऊन सुखी आहे.
आता या internet site वरुन भावासाठी एक स्थळ आले. इन्दोरची family आहे.मुलगी Hotel management च्या शेवट्च्या वर्श्याला असुन अहमदाबाद येथिल एका होटेल मध्ये टेर्निग घेते आहे. भावाची आणी मुलीची जुजबी प्रत्रिका जमल्यावर, औगस्त मध्ये भाऊ तिला भेटन्यासथी अहमदाबाद येथे गेला. त्याच्या दुसर्या दिवशी लगेच मुलीच्या वड्लाचा 'होकार' आला दरम्यान ,भावाने मुलीला आणी तिच्या वड्लाना आमच्या साधारण परिस्थितिची कल्पना दिली, याच कारण ही family सधन आणी उच्च्च वर्गतली आहे. ते लोक नसिकला आमचे घर येउन पहुन गेले.भावाच्या company मध्ये जाउन भेटुन/ चौकशिई करुन आले.माझीहि धाकटी बहीण इन्दोरला जाउन भेटुन/ घर पाहुन आली.हे सर्व औगस्त मध्ये घडले. या नन्तर आम्ही ही होकार कळवला.(Spet. first week la).
आम्ही होकार कळवन्या आधी भावाने मुलीला फोन वर contact करन्याचा प्रयत्न केला २-३ वेळा, पण मुलीने फोन उचलला नाही, मग तिच्या वड्लन्चा फोन आला कि होकार कळवल्याशीवाय, मुलगी बोलणार नाही. आम्ही विचार करुन होकार कळवाला. आता काही दिवसनी परत२-३ वेळा भावाने मुलीला फोन केला.पण मुलीने परत फोन उचलला नाही. दरम्यान मी भावाला समाजावले की, आरेन्ग्ज मरेज मध्ये एकदम बदल स्विकारता येत नाहीत .थोडा मुलीला वेळ दे. परत भाउ किन्वा आम्ही कुनिही मुलीशी फोन वर सम्पर्क केल्यास ति फोन उचालत नसे.तिच्या वडलना या बद्दल विचारले असता, ति खुप बिझि असते, शिफ्ट मध्ये काम करते, फोन लोकर मध्ये असतो, आमचे पण फोन ति घेत नाही, अशी उत्तरे मिळाली.माझ्या वडलानी शेवटी मुलीच्या वडलाना विनन्ति केली कि स्वभाव समजन्यासथी मुलाला आणी मुलीला बोलु द्या, आम्ही होकार कळवला आहे, आमचा शब्द आम्ही राखतो. त्यानन्तर भावाने मुलीला फोन केला असता ति जुजबी बोलत असे.त्यावर तिच्या विचरले असता,साखरपुड्याच्या आत मुली फारस्या बोलत नाहीत अशी मखलाशी केलि गेली.आता आम्ही सर्व कुटुब्मीय -भाउ पन इन्दोरला लग्नाच्या बोलणी साथी गेलो. मुलीच्या अनुपस्थित रुपाया-नारळ आणी लग्नाची बोलणी झाली. मुलीच्या अनुपस्थितीचे कारण दसरा आसल्याने सुट्टी असल्याने, तीला रजा मिळाली नाही.
लग्नची बोलणी करताना आम्ही स्वछ सान्गीताले कि मुलाच्या सन्सरा करता मदत करावी,लग्न खुप मोटे, भपकेबाज करण्याची गरज नाही.त्यावर मुलीच्या वडलनी सान्गीतले की आम्हाला लग्न मोथे करायचे आहे आणी लग्न इन्दोरला होइल, आम्ही यालाही तयार झालो. मग माझ्या धाकट्या बहीणीने मुलीच्या वडलना विनन्ती केली की दिवाळी ला मुलीला सुट्टी असेल , तुम्ही सर्व जण पुण्याला तिच्या घरी या. त्यावर तिच्या वड्लानी मान्य केले. कारण आम्ही दोधी बहीणी मुलीला भेटलो नव्हतो.याच लग्नच्या बोलणी दर्म्यान मुलीच्या वडलनी साखर पुड्याचा खर्च अर्धा अर्धा करा असे सन्गितले. त्यावर आम्ही लग्न लवकर केलेत तरी चालेल , पण आम्ची मोठा सखर पुडा करन्याची परिस्थिती नाही असे सान्गितले. या मध्ये कुथेही मुलीकडच्यान कडुन काहीही उकळण्याचा हेतु नव्हता.
हे सर्व ऐकल्यावर मुलीच्या वडलाचा नूर पालट्ला.परतु मुलीची आइ समजुतदार होती, तिने आम्हा सर्वशी निट बोलुन बोलणी पुर्ण केली. पण या दर्म्यान मुलीच्या वडलानी आमच्यशी फरसे न बोल्णे वगैरे केले. बोलणी पुर्ण झाल्यावर मुलीच्या वडलानी आमच्या समोर मुलीला फोन लावला आणी माहीती दीली.
दुसर्यादिवशी आमची मुलीच्या वडलानी उज्जैन ला जाण्याची व्यवस्था केली. आम्ही उज्जैन पाहुन रात्रि नसिकला परत आलो.
इन्दोरला जाण्याआधी भावाचे मुलीशी बोलणी झाले आसाता खालील बाबी निदर्शनास आल्या:
१) मुलीने कधिहि भावाला फोन केला नाही
२) भावाने फोन केल्यास बोलता बोलता झोपुन जाणे
३) फोन होल्ड वर थेवणे
४) भावाशी बोलता बोलता रुमी शी बोलने, कधी कधी फोन न उचलाणे.
५) मुलीने स्वताहुन होकार कळवाला नाही, तिच्या वड्लनी होकार दिला, ति स्वताहा न्युटॡ होति.
६)तीचे कुथेही अफेअर नव्हते.
आम्ही सर्व तिकडुन आल्यावर दुसर्यादिवशी मुलीच्या वडलाचा मला फोन आला कि तुम्ही उज्जैन्च्या गाडी चे पैसे न देताच गेलात? असो मी आता ते पैसे देतो. यावर मला असे वाट्ले कि गाडीच्या पैस्याविशयी आपण खात्रि न केल्यने हे झाले. म्ह्णुन मी त्याना म्हणाले कि मी online trasnfer करते. तर एक तासा भारात त्याचा फोन आला कि पैसे मिळाले नाहीत. मग माझ्या online trasnfer ला प्रोब्लेम आल्यने मी बहीणीच्या नवर्याकदुन पैसे त्याना दिले. त्याच रत्रि मुलीच्या वडलाचा बहीणीला फोन आला कि, मुलगी दिवळी येउ शकत नाही,पुण्यचा बेत रद्ध .शेवटी हे सर्व भावाच्या कानावर गेले. त्याने मुलीच्या आइ ला फोन केला आणी सान्गितले कि माला तुम्हच्याशी आणी मुलीशी Conf-Call बोलायचे आहे. त्या हो म्हनाल्या. आणी जेन्व्हा भावाने फोन केला तेव्हा मुल्गी Conf-Call येउ शकली नही. मग त्याने फ्कत आइशी बोलाय्चे थर्वले. फोन केला असता आइने झलया प्रकरा बद्दल कानावर हात थेवाले. भावाने सन्गितले कि पैसे मी देणे लागतो माझ्या बहीणी नाही, तुम्ह माझ्याकडे मागायचे होते, या वर त्यानी सन्गितले तुम्हच्या वड्लाच्या विनान्ती वरुन आम्ही ति त्रिप केली.आणी जर तुम्हाला समन्ध थेवय्चे असतिल तर थेवा. एव्हाना भावाचा तोल गेला होता आणी तो म्ह्णाला की लग्न मोड्ले समजा.़एव्हाना मझ्या वड्लान्च्या कानावर सगळे गेले , त्यनी मुलीच्या वडलाना फोन करुन माफ मागीतली आणी सामाजावले. परत मझ्या वड्लानी मुलीचा मागीतला आणी तिलाही शान्त करतो असे ंम्हणाले. त्यावर मुलीच्या वडलानी ति upset आहे, फोन वर बोल्णार नाही असे सन्गितलेमाअग ३-४ दिवसनी बहीणीच्या नवर्याला फोन आला, त्यानी गानीचे पैसे परत केले आनी ८ दिवस्ने फोन करतो असे म्हनले, आजुन्हि फोन नही. भाउ मुलीमध्ये गुन्त्ल्यने आता लग्नचे नाही म्ह्णतो, मझ्या वड्लानी मुलीच्या वडलाना स्वछ विचर्ले होते कि आम्ही मोडल असे साम्जय्चे का ? त्यावर ते म्ह्णुआले फोन करतो. आता ते हो ही म्हणत नाहीत आणी नाहीही म्हणत नहीत.
४ ज्योतीश्याना विचर्ले , त्या पैकी दोधानी + आणी दोधानी - openion दिले

तुम्हाला काय वाट्ते, काय कारावे?

टीपः मी मायबोलीची वाचक आहे, येथे वैयक्तिक समस्यावर मायबोलीकरानी योग्य सल्ला दिला आहे,आता असाच सल्ला मिळेल अशी अपेक्शा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे, जे झाले ते दुर्दैवी आहे.
तुमच्या भावानेच जर सांगितले "लग्न मोडले असे समजा" तर तिथेच विषय संपायला हवा होता.
आणि त्याने असे स्वतःच सांगितले होते तर तोच परत त्या मुलीमधे गुंतला आहे हे कसे काय ?
असो, तुम्ही सर्वांनी मिळून भावाला आणि वडिलांना समजावून सांगा आणि मुलीकडच्यांना स्पष्ट नकार कळवा.
तसेच जे झाले ते विसरून दुसरे पर्याय शोधायला सुरूवात करा.

मुलीने एकुणच संपर्क साधायला टाळल्यामुळे संशयास्पद वाटते आहे.
मुलीकडच्यांना स्पष्ट नकार कळवा. तसेच जे झाले ते विसरून दुसरे पर्याय शोधायला सुरूवात करा.>+१

दुर्दैवी आहे खरेच. भावाची तिच्याशी लग्न करायची इच्छा नसेल तर तसे लेखी कळवा. तसेच लग्नासाठी त्याच्यामागे लागू नका, त्याला सावरायला वेळ द्या. घरात विषयही काढू नका. काही काळ गेल्यानंतर सुरळीत होईल सगळे. नकार मात्र लेखीच कळवा ( कारणे द्या. )

मुलीकडूनही काही कारणे असतीलच, पण तिचीही या लग्नाला तयारी नाही हे स्पष्टच आहे.

तुमचा भाऊ किती वेळा प्रत्यक्ष त्या मुलीला भेटला आहे ??? तुम्हीच वर लिहल्याप्रमाणे ती मुलगी स्वतः फार काही इंटरेस्ट घेत नाहीये.तिचे वडीलच तिच्यावतीने होकार देत आहेत ??? मग भाऊ कसा काय एवढा गुंतला ???
ती तुम्हाला ही भेटली नाही.पुण्यात ही यायचा बेत रदद.
तसेच जे झाले ते विसरून दुसरे पर्याय शोधायला सुरूवात करा.>>>>+१

बाप रे! सगळेच विचित्र वाटत आहे. होकार प्रकरणापासूनच ती मुलगी अथवा मुलीकडचे कोणीच याकडे " आयुष्यभराची साथ / संबंध" या दृष्टीने बघत नाही आहेत असे दिसत आहे. तुमचा भाऊ तिच्यामधे गुंतला आहे याला तरी काय अर्थ आहे ? फक्त "बघून" आवडली एवढंच. मने जुळणे वगैरे काही झालेले दिसत नाही. मुला मुलीची ओळख झाल्याशिवाय, त्यांना एकमेकासोबत आयुष्य घालवण्याइतपत कंफर्ट आल्याशिवाय कसलीच कमिटमेन्ट करू नये ही सधी गोष्ट आहे!! सुरुवातीपासून लक्षणे दिसत होती तिथेच थांबायला हवे होते. आताही उशीर झाला नाहीये, ते लोक सरळ तुटले तर तुटू दे, ठेवायचे तर संबंध ठेवा असे म्हणत आहेत. लग्न मोडले म्हटल्यावरही फोन पण करत नाही आहेत. "काय करावे" हा प्रश्न पण पडू नये इतके सगळे स्वच्छ आहे! त्या लोकांचा विचार सोडा. भावाला थोडा वेळ द्या. थोड्या दिवसांनी होईल सगळे ठीक. नेक्स्ट टाइम लग्न ठरवताना नीट काळजी घ्या!
अन हो, ज्योतिष्यांना विचारून आयुष्याचा निर्णय करण्यावर विश्वास असेल तर मात्र वरच्या सगळ्या पोस्ट ला इग्नोर करा. गुड लक टू यू इन एनी केस!

संशयास्पद आहे सगळे. झाले ते बरे झाले.
१) हॉटेल मॅनेजमेन्ट करणारी मुलगी- म्हणजे सोशल असणार (तिच्या पेशा ची ती गरज आहे-म्हणुन ग्रुहीत धरुया की असेल) -शिफ़्ट मधे काम करते- एकटि राहते तरिही होणार्‍या नवर्‍याशी बोलायला तयार नाही--का तर सापु च्या आधी बोलत नाहीत. हे पटत नाही.
२) बाकी पैसे इ. व्यवहार तुम्ही स्पष्ट बोलुन ही त्यांनी गोंधळ घातलेला दिसतोय.
३) न भेटुन ही भाऊ त्या मुलीत कसा काय गुंतला? का एकुण प्रकाराचा त्याला उद्वेग़ आला आहे ज्याला तुम्ही 'गुंतणे' समजताय.
देवाने योग्य सुचवले आहे.
तसही तुम्ही भावला थोड थांबायला सांगत होताच मग थोडा वेळ जावुदे. तो आपोआप बाहेर येईल. लागल्यास विवाह समुपदेशकाची मदत घ्या.
लग्न होवुन संसार मोडण्या पेक्षा आधी कळणे केंव्हाही चांगलेच.
देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवो -/\-

लग्न होवुन संसार मोडण्या पेक्षा आधी कळणे केंव्हाही चांगलेच. +१
तसेच जे झाले ते विसरून दुसरे पर्याय शोधायला सुरूवात करा.>>>>+१

लग्नाच्या बाबतीत risk न घेणेच उत्तम. नंतर काही problem झाल्यास निस्तरणे कठीण जाईल. वेळीच बाहेर पडणे चांगले.

नमनालाच इतकी कटकट व वैताग... हे असंच चालू राहिलं तर कठीण आहे! लग्न जरी झाले तरी आयुष्यभर रूसवे, फुगवे, नाकदुऱ्या, संगीत मानापमान वगैरे. जो हुआ सो हुआ... झालं तेवढं पुरे झालं. आणखी ताणण्यात काही अर्थ दिसत नाही. संपवता आलं तर संपवा. काळ हेच उत्तम औषध आहे. 

दिनेश. ह्यांनी सांगितल्यानुसार व्यवस्थित लेखी नकार कळवा...

थोडा वेळ जाऊ द्या आणि मग भावाला समजवा..

टेन्शन लेने का नई देने का..

हा प्रतिसाद , भरल्या डोळ्यानी देत आहे, कुथेतरि आम्ही बहीणी या सगळ्यला स्वताहाला जबाबदार समजत होतो. आम्ही जर पैश्यचा उल्लेख केला नसाता तर हे सगळे झाले नसाते असे वाटत होते, पण आंम्ही चुकीचे होतो.

दुर्दैवी आहे खरेच. भावाची तिच्याशी लग्न करायची इच्छा नसेल तर तसे लेखी कळवा. तसेच लग्नासाठी त्याच्यामागे लागू नका, त्याला सावरायला वेळ द्या. घरात विषयही काढू नका. काही काळ गेल्यानंतर सुरळीत होईल सगळे. नकार मात्र लेखीच कळवा ( कारणे द्या. )

मुलीकडूनही काही कारणे असतीलच, पण तिचीही या लग्नाला तयारी नाही हे स्पष्टच आहे.<<<+१

लग्न ताबडतोब मोडा.

.
.स्वतःचे मत नसणारी व माहेरची साखळी गळ्यात घालून घेतलेली बाई परवडत नाही. मी पस्तावलो आहे.

हे लग्न मोडा. लेखी नकार रजिस्टर पोस्टाने देऊन मोडा.

मुम्बै पुण्याची मुलगी बघा

माझ्या एका नातेवाईकाबाबत असाच काहीसा प्रकार गेल्या वर्षी झालाय. मुलगी इंदोरचीच होती. अजिबात मुलगी बोलायला तयार नव्हती. साखरपुडा झाला तरी अजिबात बोलायची नाही. आमच्याशी तो या बाबत बोलला तेव्हा अरेंज्ड मॅरेजमधे ओळख-देख व्हायला कमी-जास्त वेळ लागू शकतो असे आम्ही त्याला सांगायचो. एक दिवस तिनी त्याला फोन करून भेटाय्ला बोलावले आणि सांगितले की मला दुसराच कोणीतरी आवडतो आणि घरचांमुळे लग्न करते आहे. तो त्याच्या भाऊजींसोबत मुलीच्या घरी गेला. स्टँपपेपरवर मुलीकडून आणि तिच्या आई-वडिलांकडून स्वेच्छेने दुसरा आवडत असल्याने लग्न मोडत आहे, असे लिहून सह्या घेतल्या. आता त्या मुलीचे डिटेल्स काही आठवत नाहीत. पण न बोलणे कॉमन वाटते आहे.

अश्विनी,
वर दिलेल्या सल्ल्याप्रमाणे नकार लेखी कळवा. संयत भाषेत कारणे द्या. पत्रात मुलीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देवून विषय संपवा. तुमचा भाऊ ज्याला गुंतणे म्हणतोय ते गुंतणे नाही. झाल्या प्रकारात झालेला मानसिक त्रास तसेच कुठेतरी या सगळ्यात इगो दुखावणे याचा एकत्रित परीणाम आहे. त्याला थोडा सावरायला वेळ द्या.

साथ साथ सारख्या संस्थेत जोडीदार निवडीबाबत मार्गदर्शन करतात. http://www.saathsaath.com/
जोडीदाराबाबतच्या आपल्या अपेक्षा तपासुन बघायला तसेच स्वतःलाच चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी मदत होइल. तुमच्या भावाला शुभेच्छा!

ताबडतोब लग्न मोडून टाका
तुमच्या परिचयातील दोन चार समंजस लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या घरी जा
हे लग्न मोडले व आमची काही तक्रार नाही लेखी लिहून त्यावर तुम्ही सह्या करा ,मुलीच्या वडिलांची सही घ्या आणि ४ साक्षीदारांची सही घ्या ,वाटल्यास नोटरीकडे जाउन stamp paper वर करा लेखी

आणि झाल गेल विसरून जा ,तुमचा भाऊ काही दिवसांत सगळ विसरून जाईल
२७ म्हणजे काही फार वय वाढलेले नाही लग्न सहज जमेल
६ महिने जाउन द्या आणि एखादी परिचयातली मुलगी बघून लग्न करा

आयुष्यात खूप मोठी मोठी संकट झेलतात लोक
जे घडल ते वाईटच घडल पण एवढ्याश्या गोष्टीने काही आयुष्य थांबत नसत
सगळ काही छान होईल ,तुम्हाला व तुमच्या भावाला शुभेच्छा

लग्न होवुन संसार मोडण्या पेक्षा आधी कळणे केंव्हाही चांगलेच. +१

अश्विनी, अशी नाती जोड्ण्यात काय अर्थ आहे, जी एवढी कुचकामी असतील. तुम्ही स्वतःला दोषी ठरवू नका. उलट जे झाले ते चांगलच झाले.

अश्विनी
इथे लिहिलंत ते बरं केलंत.
ऑनलाईन लग्न ठरवणं ही आजकाल उपलब्ध झालेली सोय असली तरिही त्यात अनेक धोके आहेत. ओळखित लग्न जमवताना जितकी खबरदारी घ्यावी लागते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट खबरदारी अशा लग्नात घ्यावी लागते.
तुमच्या संपुर्ण लिखाणात तुम्ही मुलीकडच्यांनी मुलाची चौकशी केल्याचं स्पष्ट लिहिलं आहे, मुलीची चौकशी केली होतीत काय? त्याचा कुठे ही उल्लेख नाही म्हणून विचारलं.
लग्नाच्या बाबतीत काही गोष्टींपर्यंत मुलीच्या आई वडिलांनी फ्रंटएंडिंग करणं समजू शकतं पण लग्न ऑलमोस्ट ठरलं तरिही मुलगी फोनवर बोलत नाही, स्वतःहून फोन करत नाही या मागे अनेक कारणं असू शकतात.
मला वाटतंय की मुलीला काही डिसऑर्डर वगैरे असेल जी लपावी म्हणून मुलीला फोनवर न येऊ देणं, सापु ची बोलणी करायला गेले असता मुद्दाम तिथे गैरहजर ठेवणं.
तिच्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट आणि तीच नाही? हे थोडं पचायला जड जातंय.
शिवाय जर लग्ना आधी त्या मुलीच्या बाजूने इतर लोकच इतके निर्णय घेत असतील तर लग्नानंतर त्यांनी यांच्या संसारात ढवळाढवळ कोणत्या लेव्हल पर्यंत केली असती याची कल्पना न केलेलीच बरी.
मुलगा लग्नाळू असावा असं स्पष्ट दिसतंय, त्यात गैर नाही पण घाईत उगिच कुणाशीही लग्न करणं म्हणजे आयुष्य धोक्यात घालणं आहे.
देव करतो ते नेहमी आपल्या भल्यासाठीच.
व्यवस्थित बोलून्/लिहून मुलीकडच्यांना नकार कळवा. आणि भावाला सांभाळा.
हे नातं एकूणच एकतर्फी दिसतंय, (भावाकडून सगळी धडपड) अशी नाती फार काळ टिकट नाहीत.
स्पष्ट लिहिल्याबद्दल माफ करा.

भावाला खूप शुभेच्छा!

हम्म, थोडे वाईट वाटले वाचून.

भावाला समजावा. आताच इतका मनस्ताप तर पुढे काय होईल? मुलीवर लग्नाला हो म्हणण्याचे प्रेशर असावे असे वाटतेय. तिच्या बाजूने तिचे आई बापच बोलताहेत.

साखरपुडा मोडणे फार मोठी गोष्ट नाही, उलट यात स्वतःला अपराधी न वाटौन घेता भावाच्या पाठी खबिर उभ्या रहा, (झाल ते नाशिकच्याच गन्गेला मिळाले समजा) २७ म्हणजे फार वय नाहीये भावाचे, मला वाटत गुन्तण्यापेक्षा
काही कारण नसताना उगाच पुढच्या वेळेस उगा १० एक्ष्प्लेनेशन द्यावी लागतिल ही गोश्ट भावाला लागली असेल.
थोडा वेळ जाउ द्या!

लग्न होवुन संसार मोडण्या पेक्षा आधी कळणे केंव्हाही चांगलेच. +१

अश्विनी, अशी नाती जोड्ण्यात काय अर्थ आहे, जी एवढी कुचकामी असतील. तुम्ही स्वतःला दोषी ठरवू नका. उलट जे झाले ते चांगलच झाले.>>>>>>> +१

लेखी नकार ... हे असे द्यायचे असते का? माझ्यासाठी ही माहिती नवीन आहे.
पण सगळे म्हणताहेत तर तसे करा.

बाकी सर्व प्रतिसादांशी अनुमोदन.
इथे जो तुम्हाला दिसतोय तोच समाज आहे. तुम्ही दिलेले डिटेल योग्य मानले तर तो तुम्हाला साथ देतोय. त्यामुळे आता ईतर समाजाचा विचार करायची गरज नाही.

तुम्हाला स्वत:ला वाटणे की तुम्ही याला कुठेतरी जबाबदार आहात हा तुमच्या संवेदनशील मनाचा हळवेपणा आहे ईतकेच!

त्या लोकांचाही काही प्रॉब्लेम असेल, मुलीचे दुसर्‍यावर प्रेम वगैरे, तर कोणता आकस मनात न ठेवता थांबा ईथेच. शुभेच्छा Happy

तुम्ही जबाबदार आहात असे वाटत असले तर ह्यापुढे काय सुधारणा करणार?
भावाला वेळ द्या वगैरे सगळं खरं पण अशा गोष्टीवर कुणाचा कंट्रोल नसतो. एखादी भेटली चांगली व्यक्ती ह्या २ आठवड्यात आणि म्हणाले दोघे हो लग्नाला, तर तुम्ही किती, कसा सहभाग ठेवणार?

मुलीने लग्नाला नकार दिला म्हणजे तिचे दुसर्‍या कोणावर प्रेम असेलच असा अर्थ काढणे premature आहे. कदाचित तिला मुलगा आवडला नसेल किंवा She may be having second thoughts. अशा मुलीबरोबर लग्न करुन मुलगा किती सुखी होइल माहित नाही. आणि दोन्ही बाजु पैशांबद्दल particular दिसत आहेत. असे नाते पुढे वाढवण्याऐवजी इथेच संप(व)लेले बरे.
भावाची काळजी करु नका. He will get over it in time.
(देवाचे आभार माना की लग्न झाल्यावर असे काही घडले नाही.)
तुम्हा सर्वाना शुभेच्छा..

अश्विनी, जर शक्य असेल तर पुढे काय घडामोडी झाल्या हे येथे कळवाल का ? असेच उत्सुकता म्हणुन.
जर शक्य नसेल तर नाही दिलेत तरी चालेल. कोणती माहिती किती प्रमाणात कोठे द्यायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे.

तुमचा भाउ खुप नशिबवान आहे. लग्न होण्याआधी हे घडलं ते खुप चांगलं झालं अस समजा, जर लग्नानंतर असं काही झालं असतं तर ते किती किचकट, प्रचंड त्रासदायक झालं असतं ह्याचा विचार करा आणि पुढिल वेळी अधिक सावध राहुन निर्णय घ्या. शुभेच्छा!!

तुमचा भाउ खुप नशिबवान आहे. लग्न होण्याआधी हे घडलं ते खुप चांगलं झालं अस समजा, जर लग्नानंतर असं काही झालं असतं तर ते किती किचकट, प्रचंड त्रासदायक झालं असतं ह्याचा विचार करा आणि पुढिल वेळी अधिक सावध राहुन निर्णय घ्या.

>> असेच म्हणते.

Pages