फुसके बार – १९ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:47

फुसके बार – १९ नोव्हेंबर २०१५
.

१) मराठी टीव्ही चॅनल्सवरील चर्चेत कनिष्ठ पत्रकार त्यांच्याच चॅनलच्या वा इतर वरिष्ठ पत्रकारांना सर असे का संबोधतात? इंग्रजी चॅनल्सवर ही पद्धत दिसत नाही. महेश म्हात्रे, राजीव खांडेकर व डॉ. उदय निरगुडकर आपल्या सर्वच सहका-यांना तसे न करण्याबद्दल सूचना देतील काय? नाव वा आडनाव वापरून आदरार्थी बोलायला काय हरकत आहे?

२) ढग तरी कोठे खरोखर स्वच्छंदी असतात? त्यांनाही वारे नियंत्रित करतातच की. चंद्राबद्दलची काही गुपिते कळल्यावर काही कवीकल्पना बाद झाल्या किंवा थोड्याशा गैरलागू झाल्या. हाही प्रकार तसाच म्हणायला हरकत नाही.

३) सविस्तार हा शब्द योग्य की सविस्तर?

४) पंतप्रधानानी थेट लंडनमध्ये अल्वरमधल्या इम्रान खान या शिक्षकांनी अनेक शालोपयोगी अॅरप्स तयार केलेली आहेत. हा जाहिर कौतुकाचा उल्लेख त्यांनी थेट लंडनमध्ये केला. हे इम्रानखान अगदी नम्र दिसतात. ते अगदी सहजपणे माझे अमुक अॅयप १५ लाख मुले वापरतात, तमुक अॅपप दोन लाख मुले वापरतात असे सांगत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही अॅसप्स मोफत उपलब्ध करून दिली आहेत. याकामी त्यांना तेथील जिल्हाधिकारी आशुतोष पेडणेकर यांची प्रेरणा आहे असे कळले. ते महाराष्ट्रीय असावेत म्हणून थोडे शोधले तर ते गोव्याचे आहेत असे कळले.

५) राष्ट्रपतींनी देशातल्या असहिष्णु वातावरणाबद्दल लागोपाठ दोन वेळा चिंता व्यक्त केली, त्याचा येथे फेबुवर व एकूणच मेडियामध्ये केवढा गवगवा केला गेला. मात्र काल-परवा ते म्हणाले की पुरस्कार-पदव्या परत करणे योग्य नाही, त्यावर अजिबात प्रतिक्रिया दिसली नाही. ज्याला असहिष्णु परिस्थिती म्हणतात, ती देशात नेहमीच होती, तुम्ही कशाला असहिष्णु म्हणता व समजता त्यावर हे अवलंबून आहे. राजीव गांधी सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम समाजातील महिलांवर शक्य तेवढा अन्याय चक्क कायदा करून केला. या सरकारी असहिष्णुतेचा तर सध्याच्या चर्चेत कोणी उल्लेखही केला नाही. एवढेच नव्हे तर राजीव सरकारचे हे पाप निस्तरण्याचा प्रयत्न तरी आजवर कोणी केलेला आहे का? हे एक उदाहरण म्हणून. म्हणून म्हटले, प्रत्येक कालखंडात हे झालेले आहे. गेली कित्येक दशके बहुमताच्या अभावी विविध आघाड्यांची सरकारे आली, त्यामुळे कितीतरी समाजविरोधी, प्रगतीविरोधी निर्णय घेतले गेले, एवढेच नव्हे तर देशाची प्रगती थांबवणारे निर्णय घेतले गेले. त्यात सहभागी असलेले मायावती, लालू, मुलायम, करूणानिधी यांच्यासारखे दरिंदे आजही सक्रिय आहेत. ही असहिष्णुता कोणाला दिसली नाही. धर्मावरून प्रचार करण्यावरून ज्याचा मतदानाचा अधिकारच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला, श्रीकृष्ण आयोगाने दंगलीसाठी ज्याला व ज्याच्या अनेक साथीदारांना थेट जबाबदार ठरवले आहे, त्या व्यक्तीचे स्मारक करण्यासाठी सरकारी जागा दिली जात आहे, त्यात कोणालाच असहिष्णुता दिसत नाही. पब्लिक ट्रस्ट करण्याच्या नावाखाली त्यात सरकारचा सहभाग नसेल असे भासवले जात आहे, मग त्याला सरकारी जागा वा भूखंड कशासाठी? जसे काही सरकारी जागा वापरणार, म्हणून ही सगळी सत्ये त्या स्मारकात ठळकपणे मांडणार आहेत. तेव्हा असहिष्णुता हे निव्वळ सोयीप्रमाणे वापरण्याचे साधन आहे, हे स्पष्ट आहे. स्वत:ला मोदीफोबिया झालेला असला की काही गोष्टी दिसेनाशा, जाणवेण्याशा होतात, याची किती उदाहरणे द्यायची?

६) शतायुषीच्या दिवाळी अंकात ‘डॉक्टर मला बाळ हवंय’ या दीर्घ लेखात सेक्सबद्दलचे अज्ञान, स्त्रीपुरूषांच्या लिंगासंबंधीच्या काही आजारांबद्दल सांगितले आहे. त्यात हार्निया या त्यातल्या त्यात माहित असलेल्या आजाराबरोबरच हायड्रोसिलबद्दल सांगितले आहे. त्यात पाणी भरल्यामुळे लिंगाजवळच्या अंडकोषाचा (स्क्रोटमचा) आकार छोट्या कलिंगडाएवढा होतो असे वर्णन आहे. एका पुरूष दहा वर्षे तसे लिंग घेऊन फिरत होता, हेच आश्चर्य. आजार असतानाच लग्न झाले. नव्याने आलेल्या बायकोला आठ वर्षे झाली तरी मूल होईना, म्हणून दोघेही तपासणीसाठी आले. बायकोमध्ये काही दोष सापडला नाही. याची तपासणी केली तर हा प्रकार. मग प्रश्न पडला की बायकोनेही हे इतकी वर्षे गुपीत का जपले? पण आपल्या समाजामध्ये हा प्रश्न विचारला जाण्याच्या लायकीचा नाही हे कळावे.

७) बाजीराव-मस्तानीवरील आतापर्यंतचे आक्षेप फक्त पिंगापिंगा गाण्यावरचे आहेत. आणखी काय वाढून ठेवले आहे कोणास ठाऊक. केवळ हा सिनेमा काल्पनिक आधारावर आहे अशी एक ओळ टाकली की हे भन्साळी महाशय व त्यांचे भाऊबंद यांचा कल्पनाविलास करायला मोकळे. मग कल्पनाविलासच करायचा तर सिनेमा व पात्रांची नावे काशीराम-माधुरी का करत नाहीत? कोठपर्यंतचा कल्पनाविलास ग्राह्य धरायचा? अलेक्झांडरसारखा सिनेमा आपल्या हातून चांगला झाला नाही म्हणून ऑलिव्हर स्टोनसारखा दिग्गज दिग्दर्शक माफी मागतो, येथे तर यांची सुरूवातच बनवाबनवीची.

८) अभिमान कशाकशाचा? – मोठ्या कष्टाने शोधून ठेवलेले मुलाचे नाव कोणी दुस-या मुलालाही ठेवलेले दिसले की एकीला अस्वस्थ झालेली पाहिली. सुरू झाला जळफळाट. नाव तरी कुठले? रोहित. आता हे नाव आजच्या जगात जळफळाट होण्याइतके दुर्मिळ तरी आहे का? त्यातही हिचा रोहित एक-दिड वर्षांचा. आणि तिला नुकताच भेटलेला रोहित पंचविशीतला. तरी कोणाच्या उत्थानाची सुरूवात कोठून होईल काय नेम?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेमध्ये ढग मनमौजी, हवे तेथे जाऊ शकणारे वगैरे समजले जातात. तसे नसते.
विस्तार हा मूळ शब्द, तरीही सविस्तर कसे?
आपल्या मुला-मुलींची फार शोधून ठेवलेली व दिर्मिळ अशी नावे दुस-या मुलांचीही आहेत हे कळले तरी काही अायांचा जळफळात होतो.