हरवलेला किनारा…….. भाग 5

Submitted by ईशुडी on 17 November, 2015 - 09:49

हरवलेला किनारा…….. (भाग १) http://
www.maayboli.com/node/54496
हरवलेला किनारा…….. (भाग 2) http://
www.maayboli.com/node/54508
हरवलेला किनारा…….. (भाग 3) http://
www.maayboli.com/node/55352
हरवलेला किनारा…….. (भाग 4) http://www.maayboli.com/node/56419

तिने या सर्व गोष्ट तिच्या मैत्रिणीला म्हणजे मिनुला सांगितल्या , मिनुलाही तीच हे अस वागणं बघवत न्हवता तिलाही खूप वाईट वाटायचं म्हणून तिने २ - ३ वेळा तिला हे नातं इथेच थांबव म्हणूनही सांगितलं पण आकांक्षाला
हे मान्य न्हवतं . एक दिवस समीर लग्नाबद्दल बोलायचं म्हणून गावी गेला , तो खरच गावी गेला होता कि मुद्दाम खोटं बोलत होता हे त्याच त्यालाच माहित, मात्र तिकडून आल्यावर दुसर्याच दिवशी त्याला कंपनीतर्फे बाहेरगावी जायची ऑफर आली होती त्याने आकांक्षाला फोन केला, आकांक्षा त्याच्याच फोनची वेड्यासारखी वाट पाहत होती "हेल्लो आकांक्षा मी बोलतोय समीर कशी आहेस ?" त्याने विचारले
"ठीक आहे तुझ्याशिवाय नाही रे करमत मला , तुला नाही का रे आठवण येत माझी " आकांक्षा थोडी रडवेली झाली होती
"समीर तू गावी गेला होतास न आई-बाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलायला ! काय झालं? , काय बोलले आई - बाबा !!" ती म्हणाली
" आकांक्षा मी बोललो आई- बाबांबरोबर त्यांना तुझ्याबद्दल सांगीतलंही , पण ……… " आणि मधेच थांबला
" पण काय समीर बोल न " ती काकुळतीने म्हणाली .
" आकांक्षा त्यांनी आपल्या लग्नाला नकार दिला , आणि मला घराबाहेर काढण्याची धमकीही दिली त्यांनी" समीर म्हणाला
"काय हे काय म्हणतोयस समीर तू , अरे तूच तर म्हणाला होतास न कि तुझे आई - बाबा लग्नाला नकार देणार नाहीत मग अस का केलं त्यांनी " आकांक्षा फोनवर रडत होती .
इतक्या दिवसात समीरसाठी रडून रडून आकांक्षाने स्वतःची खूप खराब अवस्था करून घेतली होती . कोलेजमधली ती खळखळून हसणारी खोडकर आकांक्षा आता उरलीच न्हवती. आता उरली होती ती फक्त एक शांत , चेहऱ्यावर कसलंही तेज नसलेली आकांक्षा. मग समीर पुढे म्हणाला कि त्याला त्याच्या कंपनीतून बाहेरगावी जाण्याची ऑफर आलीय , आणि त्याला तिकडे compulsary जाव लागणार होतं आणि त्याच्या घरचेही अकांक्षाबाबत माहित पडल्यापासून तिकडे जाण्यासाठी मागे लागले होते .
आता आकांक्षा एकदम हतबल झाली होती , तरीही ती थोडा धीर करून म्हणाली कि ,"मग समीर तुझ म्हणणं काय आहे ?"
"आकांक्षा कस सांगू गं, आता तुला मलासुद्धा पुढे बोलवत नाहीये आणि काय कराव तेच सुचत नाहीये, या टेन्शनमध्ये काल रात्रभर मी घराबाहेरच फिरत होतो , तूच सांग मी काय करू ? आणि कंपनीची हि ऑफर मी नाकारू शकत नाही कारण हे खूपच इम्पॉर्टंट आहे, नाहीतर माझी नोकरीही जाऊ शकते यामुळे ." मग काही क्षण कोणीच काही बोलल नाही.
मग अकांक्षानेच मन घट्ट केल आणि त्याला म्हणाली ," ठीक आहे मग समीर मला वाटतं आपण आता इथेच थांबवलेलं बरं , उगाच माझ्यामुळे तुझ्या नोकरीवर संकट नको आणि तुझ्यात आणि तुझ्या आई-वडिलांमध्ये गैरसमज हि नकोत आणि तसाही तू न सांगताच मला तुझ उत्तर कळलंय,"
"हे काय म्हणतेयस आकांक्षा तू plz मला चुकीच समजू नकोस अक्षु माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर पण मी नाही काही करू शकत गं . plz मला माफ कर , एखादं चांगला मुलगा पाहून त्याच्याशी लग्न करून तू सुखी हो अक्षु , तो तुला माझ्याही पेक्षा जास्त प्रेम करील , आणि आयुष्यभर तुझी साथ देईल " समीर म्हणाला .
का कुणास ठाऊक पण आकांक्षाला आता त्याच्यावर विश्वासच उरला न्हवता म्हणून ती त्याला म्हणाली,"समीर तू किती साथ देतोयस मला जो उद्या तो जो कोणी असेल तो देईल माझी साथ , खैर तुझ्या advice बद्दल thanx इथून पुढे माझं मी पाहून घेईन काय करायचं ते , आणि म्हणूनच आजचं हे आपलं बोलणं शेवटचं असेल इथून पुढे आपण कसलाही contact ठेवायचा नाही, बरं काळजी घे स्वतःची , आणि ……जमलं तर विसरून जा मला " आणि तिने फोन कट केला. कारण कुठेतरी आकांक्षाला हे पटलं होत कि हे नातं टिकावं अस फक्त तिलाच वाटतंय समीरला नाही, कारण समीर आता खूप बदलला होता.
त्या दिवशी आकांक्षा दिवसभर आणि रात्रभर खूप रडली, तिला थोडा तापही भरला होता .समीरलाही खूप वाईट वाटलं पण …… मग तो काही दिवसांनी बाहेरगावी निघून गेला, जाताना त्याने आकांक्षाला फोन केला पण तिने तो उचलला नाही. असेच काही महिने निघून गेले आकांक्षाला सगळ एकदम विसरून जाणं खूप कठीण होत होतं , म्हणून मग तिने नोकरी करायला सुरवात केली , तरीही कधी कधी तिला समीरची खूप आठवण येत असे पण तिने स्वतावर खूप नियंत्रण ठेऊन स्व:ताच लक्ष दुसरीकडे गुंतवायची.
**************************
अशातच एक दिवस facebook वर तिची स्वप्निलशी ओळख झाली आणि तिच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं.स्वप्नीलचा स्वभाव खूप बोलका होता , अगदी जसा आकांक्षाचा कॉलेजमध्ये स्वभाव होता तसा , तो पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला होता, त्याच्याशी बोलताना आकांक्षाला कुठेतरी जे काही हरवलं होत ते परत मिळाल्याची जाणीव होत होती . त्याच्याशी बोलताना तिच्या मनात समीरची जराही आठवण येत नसे. हळू हळू आकांक्षा पुन्हा पहिल्यासारखी हसू लागली होती . बर्यापैकी ती तिच्या दुखातून सावरली होती. पण स्वप्नील अकांक्षासाठी फक्त एक चांगला मित्र होता , पण स्वप्नीलला मात्र आकांक्षाचा स्वभाव खूप आवडायचा म्हणून तीही त्याला खूप आवडू लागली होती.
एकदा बोलता बोलता त्याने तिला proposeहि केलं , आधी हे आकांक्षाला बिलकुल आवडलं नाही म्हणून ती त्याच्यावर रागावली पण नंतर त्याने तिची माफी मागितल्यानंतर ती पुन्हा त्याच्याशी बोलू लागली , पण स्वप्नील मात्र मनातल्या मनात तिच्यावर खूप प्रेम करत होता . पण ती रागवेल म्हणून त्याने पुन्हा अस बोलन टाळलं . तिला वाईट वाटेल अशी प्रत्येक गोष्ट करायची तो टाळायचा . तिचा अजून होकारही मिळाला न्हवता कि याने तिच्याबद्दल आपल्या घरी सांगितलं होतं, त्याच्या घरच्यानाही यावर काहीच हरकत न्हवती, पुण्यातच एक सुंदर घरही घेतलं होतं, कारण त्याला विश्वास होता कि कधी ना कधी आकांक्षाही त्याच्यावर प्रेम करेल आणि लग्नासाठी त्याला होकार देईल. एक दिवस त्याने आकांक्षाला surprise द्यायचं ठरवलं आणि म्हणून तो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अचानक मुंबईत येवून तिला भेटायला बोलावलं पण एकदम अस त्याने बोलावल्याने ती थोडी गोंधळली तिला अस अचानक कामातुन निघण शक्य न्हवत म्हणून त्याने तिथेच स्टेशनवर तिची दिवसभर वाट बघितली मग संध्याकाळी ऑफिसमध्ये सांगून ती लवकर निघाली आणी स्टेशनवर त्याला भेटली तर समोर स्वप्नील एका बाकावर बसला होता तिची वाट बघत , मग आकांक्षा त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली . समोर आकांक्षाला पाहून स्वप्नीलला खूप आनंद झाला होता . आकांक्षा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती
ती म्हणाली ,"स्वप्नील तू अचानक इकडे कसा रे ?"
"अगं तू माझी बेस्ट फ्रेंड न मग तुझा वाढदिवस मी तिकडे बसून सेलिब्रेट करू का? म्हणून तुला surprise द्यायला इकडे आलो काय कस वाटल माझं surprise ?" स्वप्नील हसून म्हणाला.
ज्या गोष्टी आकांक्षाने समीरकडून अपेक्षित केल्या होत्या त्या गोष्टी स्वप्नील करायचा , प्रत्येक लहान लहान गोष्टी ती कशी खुश राहील याचाच प्रयत्न तो करायचा . मग दोघे एका कॉफी शॉप मध्ये गेले आणि तिकडे दोघांनी केक कापून तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला "खरच आकांक्षा आता अस वाटतंय कि सकाळपासून मी जी तुझी वाट पहिली ना ती सार्थ झाली " स्वप्नील म्हणाला
"म्हणजे ?" आकांक्षाने विचारले "म्हणजे असं कि , किती मस्त वाढदिवस सेलिब्रेट केला ना आपण तुझा , आणखी एक सांगू आकांक्षा तुला जसं मी तुला imagin करत होतो ना, तू त्यापेक्षाही आज खूप सुंदर दिसतेयस" स्वप्नील तिच्याकडे पाहत म्हणाला . आकांक्षा थोडी लाजली .
मग स्वप्नील म्हणाला ," आकांक्षा मला तुला एक गोष्ट विचारायची आहे "
"काय विचारायचं आहे रे स्वप्नील विचार ना " आकांक्षा सहज म्हणाली .
"आकांक्षा आज खरच तुला मनापासून सांगतोय ,मी मला तू खूप आवडतेस , मला माहितेय आधीही तू या गोष्टीवरून रागावली होतीस माझ्यावर पण विश्वास ठेव माझ्यावर मी इतर मुलांसारखा नाहीये गं , हे बघ मला नाही माहित कि प्रेमापासून तुला इतकी अलर्जी का आहे पण एकदा माझ्यावर विश्वास तर ठेऊन बघ , तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही मी , आणि मी हे फक्त तुला इम्प्रेस करण्यासाठी बोलत नाहीये , मी आधीच माझ्या घरच्यांना तुझ्याबद्दल सांगितलंय , आणि त्यांनाही यावर काहीच हरकत नाहीये , अक्षु मला आता तुझ उत्तर हवंय " स्वप्नील बोलत होता आणि आकांक्षा शांतपणे सर्व ऐकत होती. आणि अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले,
ती म्हणाली ," खर तर माझा विश्वासच उरला नाहीये प्रेमावर , भीती वाटते कि आपण एखाद्यावर इतकं जीवापाड प्रेम करायचं आणि एकदिवस खूप सारी स्वप्नं दाखवून तोच एखाद्या अनोळख्यासारखा अर्ध्या वाटेवर आपला हाथ सोडून सोडून गेला तर ?"
"एक विचारू अक्षु तुझ्या आयुष्यात आधी अस काही घडून गेलय का?" स्वप्नीलने विचारलं. आकांक्षाला पुन्हा दुख उकरून काढायचं न्हवतं म्हणून ती त्याला म्हणाली ,"नाही माझ्या आयुष्यात अस काही घडलं नाही पण कित्येक उदाहरणं डोळ्यांसमोर पहिली आहेत म्हणून भीती वाटते मला "
"नाही आकांक्षा मी अस कधीच करणार नाही. मला असं करायचं असतं तर तुझा होकार मिळवण्याआधीच मी तुझ्याबद्दल माझ्या घरच्यांशी बोललो नसतो, आणखी एक plz माझ्यावर विश्वास ठेव अक्षु , आज जितकं प्रेम करतोय न तुझ्यावर तितकच कायम करत राहीन , कधीही तुला वाईट वाटेल असं कधीच करणार नाही मी.आणि हे फक्त मी नुसतं बोलत नाहीये मी हे खरंही करून दाखवीन " स्वप्निल तिला विश्वासाने म्हणाला आणि तिचे डोळे पुसले.
का कोण जाने पण आकांक्षाला त्याच्या डोळ्यात एक सच्चेपणा दिसला स्व:ताबद्दल अमर्याद प्रेम दिसलं , पण तिला सहज सहजी हे सगळं स्वीकारणं सोपं न्हवतं , म्हणून तिने त्य्च्याजवळ थोडा वेळ मागितला आणि म्हणाली " ठीक आहे पण मला वाटतं इतक्यातच लग्नाची घाई नको करायला, आधी एकमेकांना भेटून एकमेकांचे स्वभाव समजून घेतले पाहिजेत , खरच आपण अख्खं आयुष्य एकत्र घालवण्याइतपत खरंच इतकं घट्ट नातं होईल का हे पाहिल्याशिवाय मी हो म्हणून शकत नाही आणि त्यानंतर तुला माझ्या घरच्यांशी भेटावं लागेल, मगच मी हो म्हणेन कारण मी माझ्या घरच्यांच्या परवानगीशिवाय लग्न करायचं नाही असं ठरवलंय " आकांक्षा म्हणाली
“ठीक आहे आकांक्षा मला तुझे विचार खूप आवडले खरंच कोणताही निर्णय घेण्याआधी तू किती खोलवर त्याचा विचार करतेस न आणि हाच तुझा स्वभाव मला खूप आवडतो, कारण तू तुझ्या मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलतेस, ठीक आहे मग मी माझ्या घरच्यांनाच तुझ्या घरी येवून , तुला मागणी घालेन मग तर तयार होशील कि नाही हा तसाही माझ्यात नकार देण्यासारख काही कारणही नाहीये I am स्मार्ट , चांगली नोकरी आहे , आणि तुझ्यासाठी एक छानसं घरही घेऊन ठेवलाय मी पुण्यात, " स्वप्निलने हसत तिला म्हणाला.
"काय? अरे पण तुला काय माहित मी तुला हो बोलेन कि नाही ते ?" तिने प्रश्न केला.
"अगं माझ खर प्रेमच मला सांगत होत कि आज न उद्या तू मला हो म्हणशील म्हणून, पण त्याआधी मी असाच तुला अधूनमधून भेटायला येत जाईन चालेल ना " स्वप्नील हसत म्हणाला.
आकांक्षाने मान हलवून त्याला हो म्हंटलं. मग आकांक्षा स्वप्निल बरोबर त्याची पुण्याची ट्रेन येईपर्यंत बोलत उभी राहिल ,
मग स्वप्नीलनेच तिला उशीर होईल म्हणून परत घरी जायला सांगितला .
पुण्याला गेल्यानंतर स्वप्निलने घडलेली सगळी घटना आपल्या आई- बाबांना सांगितली त्याच्या आई- वडिलांनाहि फार आनंद झाला . त्यानंतर स्वप्निल अधूनमधून तिला मुंबईत भेटायला येत राहिला दोघांनी एकमेकांना समजून घेतला , त्याला भेटल्यानंतर आकांक्षाला जाणीव झाली कि ह्या वेळी स्वप्निलची निवड करणं हा तिचा नक्कीच चुकीचा निर्णय नाहीये, त्यानंतर आकांक्षाने त्याला आपला होकार कळविला. मग काही दिवसानंतर स्वप्नीलने सहपरिवार आकांक्षाच्या घरी जाऊन तिला मागणी घातली तिच्या घरच्यांना स्वप्निलचं स्थळ आवडलं. मग मग एका छानश्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात दोघांच लग्न पार पडलं. या लग्नामुळे आकांक्षा खुप खुश होती कारण ज्या ज्या अपेक्षा तिने समीरकडून केल्या होत्या , त्या सर्व गोष्टी स्वप्नील तिच्या नकळत करत असे , सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या bussy शेड्युल्ड मधून वेळात वेळ काढून तो तिला भेटायला येत असे आणि तेही कोणतंही कारण न देता , आणि हे फक्त त्याने त्यावेळीच केलं नाही तर लग्नानंतरही त्याचं तितकंच प्रेम आकांक्षावर होतं आणि आताही तो कसं का होईना पण थोडातरी वेळ तिच्यासाठी काढतच असे, आणि म्हणूनच आकांक्षाही हळू हळू त्याच्यावर प्रेम करू लागली होती . आता फक्त तिच्या या सुखी संसारावर तिच्या भूतकाळाची सावली पडू नये आणि स्वप्निल तिच्यापासून दूर जाऊ नये म्हणून तिने त्याला आपल्या भूतकाळाबद्दल त्याला सांगणं टाळलं . कारण तिच्या नजरेत आता समीरबद्दल तिळमात्रही प्रेम उरलं न्हवतं म्हणून तिने त्या कडू आठवणी कायमच्या आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या ठरवल्या “
हाच विचार करत असताना अचानक आकांक्षाला मागून कुणीतरी मिठी मारली तशी स्वप्नातून भानावर येत आकांक्षाने उठून मागे वळून पाहिलं तर समोर स्वप्निल उभा होता. त्याला पाहून आकांक्षाला आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाला होता . " स्वप्नील तू इथे अचानक कसा " आश्चर्याने तिने स्वप्निलला विचारले.
"बायको !! तुझ्यावरच प्रेमच मला इथपर्यंत खेचून घेऊन आलं म्हणून आलो " स्वप्नील तिच्या खांद्यांवर दोन्ही हात ठेवत म्हणाला.
"गप्प बस मस्करी नको रे करू, सांग ना तू इथे कसा तुझी खूप महत्वाची मिटिंग होती न मग?" पुन्हा तिने विचारलं
" अगं होती पण मधेच ती कॅन्सल झाली मग म्हटलं चला इकडेच य़ेऊन तुला surprise देऊयात खरं तर मी तुलाच फोन करून सांगणार होतो म्हणून तुझा नंबर लावत होतो तर तुझा नंबरच लागत न्हवता, म्हणून मी प्रियाला फोन केला तर ती म्हणाली कि तू खूप अपसेट आहेस म्हणून तू अचानक इकडेच येउन तिला surprise दे म्हणून आलो," म्हणून सरळ इकडेच निघून आलो.
इतक्यात प्रिया तिथे आली आणि म्हणाली, "काय अक्षु कसं वाटल surprise , मला सकाळीच जीजूंचा कॉल आला होता मी तुला सकाळीच सांगणार होती. पण मॅडम तुम्ही तर उदास होतात न म्हणून म्हंटल जीजूंनाच इथे बोलावून घेऊयात " प्रिया हसत म्हणाली . आकांक्षा तिच्या कडे पाहून हसली मग प्रिया म्हणाली,
“बघितलं का स्वप्निल जीजू हिचे गाल कसे लाजून लाल झालेत ते चला मी तर जाते बाबा इथून उगाच कबाब मध्ये हड्डी कशाला " आणि आकांक्षाला डोळा मारून प्रिया तिथून निघून गेली , दोघेही तिच्याकडे पाहून हसत होते मग स्वप्नील म्हणाला, "ए यडू!! काय झालं उदास व्हायला , पण आता उदास व्हायचं नाही , स्वप्निल इथे असताना त्याच्या बायकोने असं उदास होणं म्हणजे माझ्यासाठी किती लाजीरवाण आहे हे”
"नाही रे स्वप्निल तूच तर पुन्हा हसायला शिकवलयस मला, मग आता का उदास होईन मी" आकांक्षा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
"म्हणजे ?" स्वप्निलने तिला विचारले आकांक्षा त्याच्याकडे पाहतच उभी राहिली मग तिने स्वप्नीलला मिठी मारली आणी
म्हणाली ,
"म्हणजे !!! मी खूप lucky आहे जो मला तुझ्यासारखा जोडीदार मिळाला”
"आह !! lucky तू नाही मी आहे जी मला इतकी गोड बायको मिळाली , luv U अक्षु " आणि मग आकांक्षाने हळूच स्वप्नीलच्या खांद्यावर डोक ठेवलं आणि दोघे त्या समुद्राकडे काहीवेळ पाहत उभे राहिले.
आज खऱ्या अर्थाने आकांक्षाला तिला हवं असलेलं खरं प्रेम आणि प्रेम करणारा जोडीदार मिळाला होता. तिचा हरवलेला किनारा तिला मिळाला होता. खूप सुंदर क्षण होता तो , समोर सूर्यास्ताच्या वेळी ढळणारा लालसर सुर्य आणि दोन प्रेमी आपल्या गोड स्वप्नात रंगून गेले होते.

******समाप्त******

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Katha Chaan zali aahe, pan mazya mater Aakansha ne sarv kahi Swapnil la sangayla pahije hot.

vaishali jya mansabaddal tichya manat hya kshani kahich premachi bhavna nahiye tyachyabaddal sangun ky fayda na, ani sagal surlit chalu astana ugach "Mithacha khada " ka taka. Happy

pan ishudi aapan mhanto ki sagle kahi surlait chalu asttana nako sangayla, pan jar tya goshti nantar mahiti padlyavar tyache parinam vaiet hoil kiva changle hoil he sangta yet nahi. mi asly goshtiche example baghitle aahe mhanun sangtiye..hya goshtimule mazya eka maitrini cha jeev sudha gela aahe.. aani aamchya off madhlya ekach tar lagn suddha modle.