पडद्यावरचे चिरतरुण कलाकार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2015 - 18:31

चिरतरुण असणे आणि तसेच पडद्यावर दिसणे हे चित्रपट कलावंतांसाठी आणि त्यातही हिरो हिरोईनची भुमिका करणार्‍यांसाठी एक वरदान असते. कारण तुमचे वय उलटले की तुम्हाला साजेश्या भुमिकाही बदलतात आणि एक नवी इनिंग सुरू करावी लागते. जी प्रत्येकाला जमतेच असे नाही.

बस्स अश्याच कलाकारांची चर्चा ईथे करूया.

मला खात्री आहे की चर्चा नक्कीच ईंटरेस्टींग होईल, कारण असे कलाकार कित्येकांच्या खास आवडीचे असतात. तसेच प्रत्येकाला आपल्या आवडीचे कलाकार नेहमीच चिरतरुण राहावेत असेही वाटत असते. जसे सचिन तेंडुलकरने वयाची साठी पर्यंत खेळ राहावे असेच त्याच्या चाहत्यांना वाटायचे, तसेच हे. फक्त फरक ईतकाच की क्रिकेटमध्ये फिटनेस साथ सोडतो, त्यामुळे चाळीशीला येता सचिनला निवृत्ती घ्यावी लागली. पण तेच हा फिटनेसचा मुद्दा चित्रपट कलाकारांना तितकासा लागू होत नाही. अगदी पन्नाशीलाही लागू होत नाही.

तर याच पन्नाशीपासून आणि ज्यावरून हा धागा सुचला त्या किंग खान शाहरुखवरून मी सुरुवात करतो.

शाहरूख खान, जन्म - २ नोव्हेंबर १९६५
आठवड्याभरापूर्वीच याने वयाची पन्नाशी गाठली. येत्या काही महिन्यात त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक चित्रपट ‘दिलवाले’ त्याच्या चितपरीचित रोमांटिक शैलीतला आहे, आणि मला खात्री आहे की पन्नाशीतही त्याचा काजोलसोबतचा रोमान्स रसिकांना तेवढीच मजा देऊन जाईल जेवढे वीस वर्षांपूर्वी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ने दिली होती.

मात्र मला त्याहून जास्त उत्सुकता लागली आहे ती त्याच्या ‘फॅन’ या चित्रपटाची.
फॅनची एक झलक इथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=vKziLmjSVB4
यात त्याची दुहेरी भुमिका असून त्यापैकी एका भुमिकेत तो कोवळा तरुण दाखवला आहे. त्याने आणि त्याच्या मेकअप टीमने हे कसं जमवलंय ही खरेच एक कमाल असणार आहे, आणि त्याचकारणाने हा चित्रपटही हाऊसफुल्लची पाटी झळकवणार यात मला शंका नाही.

याऊपर रोहीत शेट्टी त्याला घेऊन अंगूरचा रिमेक करणार आहे, फरहान अख्तर त्याच्याबरोबर डॉन-३ करणार आहे, त्याच्याकडे आजही एवढे काम दिसतेय की त्याच्या पुढच्या काही वर्षांंच्या तारखा आतापासूनच बूक असतील.

असो, तर धाग्याचा विषय पडद्यावरचे चिरतरुण कलाकार असून शाहरूख खान नाही याचे भान मला ठेवायलाच हवे, अन्यथा त्याच्याबद्दलच मी लिहित बसेन Happy

तर मग शाहरूख खान कडून आपण आता ईतर दोन खानांकडे वळूया.

आमीर खान - जन्म - १४ मार्च १९६५
काय योगायोग बघा, हा सुद्धा पर्रफेक्ट पन्नास!
हा मुळातच बॉलीवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो आणि बच्चा भुमिका करण्यात याची मास्टरी आहे. आठवा थ्री ईडियट्समधील याचा निरागस आणि खोडसाळ कॉलेजकुमार जो माधवनपेक्षाही वयाने छोटा वाटत होता किंवा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पीके मधील नंगापुंगा एलियन लूक जो ईतर कोणा ५० वर्षाच्या कलाकाराला शोभणे निव्वळ अशक्यच!

सलमान खान - जन्म - २७ डिसेंबर १९६५
आणि ही झाली १९६५ सालाची हॅट्रीक. बॉलीवूडच्या ईतिहासात हे वर्ष नोंदवून ठेवायला हवे. या वर्षात जन्मलेले तीन कलाकार आज पन्नास वर्षाचे आहेत आणि तीनही जण आज बॉलीवूडचे तीन सुपर्रस्टार म्हणून ओळखले जातात.
आता या सलमानबद्दल काय बोलावे, भले हा अजून अविवाहीत असला तरी आज लग्नाला उभा राहिला तर बॉलीवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जाईल यातच सारे काही आले.
या वयात देखील हा दबंग (भाग-३) ही जमवू शकतो तसेच ‘प्रेम रतन धन पायो’ सारखा प्रेमपटही. पण यापेक्षा महत्वाचे म्हणजे आणखी दहा वर्षांनीही याचे फिमेल फॅन फॉलोईंग काही घटलेले नसणार याची मला खात्री आहे Happy

बॉलीवूडचा शेहनशाह समजला जाणार्‍या ऑल टाईम सुपर्रस्टार अमिताभ बच्चननेही पन्नाशी उलटल्यावर हिरो म्हणून बरेच चित्रपट केले आहेत आणि त्यातील कित्येक त्याला न शोभल्याने फसलेले आहेत. त्यामुळे पन्नाशीत पोहोचल्यावर पब्लिकने हिरो म्हणून स्विकारावे हे तितकेसे सोपे नाहीये हे समजून येते. पण अखेर तो अमिताभ असल्याने त्याची दुसरी इनिंगही तितकीच जबरदस्त होती ती गोष्ट वेगळी.

मागच्या पिढीसाठी चिरतरुण वा एवरग्रीन म्हटले की पहिलेच नाव देवानंदचे डोळ्यासमोर येत असावे. मात्र मी काही त्या काळातील नसल्याने ऐकीव माहीतीवर वा गूगाळून त्या आधारे आधिकारवाणीने लिहिल्यासारखे करणार नाही. त्यामुळे सर्वच जुन्या कलाकारांना माझा पास. ईतरांनी नक्की लिहा.

नवीन कलाकारांमध्ये कोण किती आणि कितपत टिकेल हा अंदाज तुर्तास वर्तवणे कठीण वाटतेय. कोणीही अजून तितके आश्वासक वाटत नाहीये. वर उल्लेखलेल्या पन्नाशीच्या कलाकारांच्या स्टारपदाला ते फारसा धक्का पोहोचवू शकले नाहीत यातच सारे आले. नाही म्हणायला हृतिकने पदार्पणातच त्या आशा निर्माण केल्या होत्या. किंबहुना अगदी आजही तो लंबी रेसका घोडा वाटतो. पण बहुधा त्याला कुठल्या रेसमध्येच ईंटरेस्ट नसावा असे सध्या वाटते. तरीही अजून पंधरा वर्षांनी जरी त्याने ठरवले की एखादा अ‍ॅक्शन थ्रिलर प्रेमपट करूया तर हॉलीवूडकडूनही त्याला ऑफर येतील असा कातिलाना त्याचा लूक आहे.

हिरोईनबाबत चिरतरुण असण्याचा हिशोब वेगळाच पडतो. मुळात वर्षानुवर्षे अपवाद वगळता हिरोईन हा घटक शोभेची बाहुली म्हणून चित्रपटात मिरवला जातो. त्यामुळे तिथे एखाद्या हिरोईनचे वय उलटले की लगेच दुसरी फळी तयार असते. तिनही खान वा अक्षयकुमार, अजय देवगणसारखी मंडळी स्टारपदावर जसे वर्षानुवर्षे ठिय्या मारून बसले आहेत तसे हिरोईनबाबत फारसे होत नाही. चाळीशीनंतर पब्लिक मुख्य हिरोईन म्हणून स्विकारेल हे अभावानेच होते. म्हणूनच माधुरी दिक्षित (जन्म - १९६७) ही पन्नाशीच्या खान कलाकारांपेक्षा वयाने लहान असली आणि आजही ती कमालीची सुंदर दिसत असली, तरीही तिला आपली पहिली इनिंग फार आधीच संपवावी लागली होती.

मराठी हिरोंमध्ये एका काळापर्यंत लूक हा फॅक्टर फारसा महत्वाचा नसायचा. बरेचदा पंचवीशीचे हिरोच उलट पस्तिशीचे वाटायचे. हल्ली मात्र चित्र बदलतेय. ट्रेंड बदलतोय. तरीही अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी (दोघेही जन्मवर्ष - १९७७) हे चाळीशीच्या दारात पोहोचलेले हिरो या बदलत्या ट्रेंडमध्ये फिट होताना दिसत आहेत ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. आता हे दोघे पन्नाशीपर्यंत मजल मारतात का हे बघणे रोचक राहील. अर्थात सचिन पिळगावकर (जन्म - १९५७) यांनी आयडीयाची कल्पना सारखा चित्रपट पन्नाशी ओलांडल्यावर हिरोच्या भुमिकेत म्हणून केला असा एखादा अपवाद आहेच, पण तो अपवादच.

मराठीबाबतही मला जुन्या काळाबद्दल माहीत नसल्याने नो कॉमेंटस, ईतरांकडून जाणून घ्यायला आवडेल.

मी माझ्या आवडीच्या चिरतरुण कलाकारांची यादी मांडली आहे, आता तुमची पाळी Happy

.

final.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असले फोटो आम्हाला काय हो आवडणार ?

आमच्या वेळी जोडीचे फोटो काढतांना एकच एक पोझ असायची. नवरा मागे. त्याचा भांग दिलीप/राज/देव यांपैकी एकाप्रमाणे. त्याच्या एका खांद्याला पुढ्यात बायको. आणि दोघेही मान तिरकी करून स्टुडीओतल्या एखाद्या वस्तूकडे ( तांब्या, फुटका बल्ब इत्यादी ) कडे पाहत असत, पावडर लावलेली कळून येईल असं कौशल्य फोटोग्राफरकडे असायचं.

काही काही जोड्यांचे जत्रेत फोटो असत. गाडीत बसून चाललेले, किंबा डॉन मधला अमिताभ बच्चन धावतोय आनि त्याच्या एका खांद्यावर हात ठेवून नवरा उभा तर दुस-या खांद्यावर हात ठेवून बायको उभी. हा फोटो खरा चिरतरुण म्हणायला पाहीजे. अरे अमिताभ एव्हढा जीव खाऊन वाकडा तिकडा चेहरा करून धावतोय, पण हे कसे आरामात स्लेट बोर्डवर घरंगळल्यासारखे त्याच्या सोबत अलगद चाललेत. अमिताभचं उदाहरण जरा अलिकडचं दिलं, या पिढीला समजण्यासाठी.

सारखी सारखी तीच पोज काय?
>>>
धन्यवाद नंदिनी, मला आणखी विविध पोजचे फोटो टाकण्यासाठी ऊकसवल्याबद्दल Happy

शाहरूख ५० चा का दिसेना आणि काजोल ५५ ची का दिसेना,
महत्वाचे आहे की या वयातही त्या दोघांचे असे रोमांटीक गाणे आणि रोमांटीक चित्रपट प्रेक्षक स्विकारतात की नाही.

चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा याचे उत्तर मिळेलच, गाणे मात्र लोकांनी लागलीच डोक्यावर घेतलेय.

निव्वळ दिड दिवसात तब्बल ३८ लाख हिटस आणि ५५ हजारांच्यावर लाईक्स.

पुर्ण विडिओ इथे बघा, गेरुवा.. मस्तय. सूरज हुआ मध्यम स्टाईल
https://www.youtube.com/watch?v=AEIVhBS6baE

तिथलीच वरचीच कॉमेंट ज्याला बरेच लोकांनी लाईक्स ठोकल्या आहेत
>>
Both are 40+ ... still looks 25+!!! SRK❤❤❤KAJOL

मला शाहरूख-काजोल जोडी आवडते नेहेमीच. काजोल जास्त आवडते. गाणं बघितलं. आवडलं पण शाहरुखसाठी हा आवाज मला नाही आवडला. पिक्चरायझेशन आवडलं गाण्याचं.

पण दोघांचं वय जाणवतंय. अगदीच २५ वगैरे नाही वाटले मला. ४०- ४५ वाटले.

गाणं पाहिलय, म्हणूनच म्हंटलं कि शारुख वयाने ४५ , काजल ४०+दिसतात.
शहरुख झिपराही फार दिसतोय, काजोलला तो रडका कम आनंदी चेहरा करताना तारांबळ उडालीये, काहीतरीच एक्स्प्रेशन्स !
बाकी लोकेशन्स , कपडे इ. सुंदर आहे.

त्या गाण्यात किती व्हिज्युअल एफेट्स वापरलेत. असे व्हिज्युल ईफेक्ट्स वापरणे हा शाहरूखचा आवडता फंडा आहे, पण सुंदर लोकेशन्स असताना या सर्वांची खरंच गरज नव्हती. सूरज हुआ मद्धमची छाप सरळ सरळ दिसून येतेच आहे.

शाहरूख खान इतका बारीक का दिसतोय? त्याच्या तब्बेतीचं त्यानं हातानं नुकसान करवून घेतलंय. चेहरा हॅपी न्यु इयरपेक्षा बरा असला तरीही अजून आजारकट दिसतोच आहे.

आम्ही कट्टर सलमान फॅन आहोत. आम्ही त्याला अभिनेता मानत नाही. आमच्यासाठी तो केवळ आणि केवळ सलमान खान आहे आणि राहील. सोनमकन्येसोबतदेखील तो पडद्यावर रोमान्स करताना दिसला तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. बाकीचे सुपर्रस्टार्र असतील पण सलमान सुपर्र से भी ऊपर्र आहे.>>>>>>>>>>>>>>> कधी नव्हे ते नंदीनीशी सहमत +१

प्रे र ध च्या वेळी ह्या दिलवाल्यांचे ट्रेलर आले होते. कायच्याकाय वरताण वाटला. मम्मी रीटर्न>>>> Lol

आम्ही कट्टर सलमान फॅन आहोत. आम्ही त्याला अभिनेता मानत नाही. आमच्यासाठी तो केवळ आणि केवळ सलमान खान आहे आणि राहील. सोनमकन्येसोबतदेखील तो पडद्यावर रोमान्स करताना दिसला तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. बाकीचे सुपर्रस्टार्र असतील पण सलमान सुपर्र से भी ऊपर्र आहे. >>> सुपर्ब!!!!!

@ मिलिंद सोमन,
प्रश्न फक्त दिसण्याचा नाहीये, (अन्यथा माझ्या पणजोबांचेही नाव यात आले असते)
प्रश्न आहे तो या वयात तुम्हाला चित्रपटात हिरोच्या भुमिकेत प्रेक्षक स्विकारतात का?
बाकी निव्वळ दिसण्याचा विचार करता तो माझ्याही आवडीचा. काय वय आहे त्याचे सध्या? >>>> त्यानेही आताच पन्नाशी पूर्ण केली .
रच्याकने , गेल्या आठवड्यात "गंध" पहिला . अहाहाहा ..."रावी के उसपार ..."!!!!

Both are 40+ ... still looks 25+!!! SRK❤❤❤KAJOL>>>> ए ए ए काय रे त्या खालच्या फोटोत तर तो किती पन्नाशीतला यन्ग तरुण दिसतोय ना?:फिदी:

आणी काजोलने तो काळा लाल तम्बु का पान्घरलाय? अजय लपलाय का त्या तम्बुखाली?:खोखो:

Both are 40+ ... still looks 25+!!! SRK❤❤❤KAJOL
>>
अरे हे वाक्य शब्दशा घेऊ नका ..
चाहत्यांचे प्रेम बघा ..
ते गणितासारखे दोन अधिक दोन चार मोजणारे नसते ..

जर तो पन्नाशीतील आहे तर त्याने बालिश दिसणे अपेक्षित आहे का?
पन्नाशीतही एखादा रोमांटीक चित्रपट हिट करायची त्याची ता कद बघा ..

काळा लाल तंबू Proud

कडक आहेत पण दोघांचेही कपडे!
शाहरूखचा स्वताचा ड्रेसिंग सेन्स अफलातून आहे याबद्दल शंकाच नाही.
हो, अगदी या वयात सुद्धा, हे विशेष

https://www.youtube.com/watch?v=OJWe_yrHU84
वरचा विडिओ बघा..
हे खरे चिरतरुण .. जे आजही एका पाच मिनिटांच्या गाण्यासाठी एवढी मेहनत घेतात..
हॅटस ऑफ शाहरूख आणि काजोल !!
आता तुमचा चित्रपट २०० रुपये खर्चून थिएटरात जाऊन बघणे ही पैश्यांची नासाडी वाटणार नाही.

..

आणि त्यानंतर मी हा विडिओ पाहिला.
https://www.youtube.com/watch?v=Ixyf7DCpMns
पडद्यामागच्या या अ‍ॅक्शन कलाकारांना एक कडक सॅल्यूट !!

तो खालचा तिसरा फोटु पहा...
दोघांचे बी चेहरे कसे भयताडा सारखे आले हैत...
Lol अगागा माय.... वरुन काय येवुन रायला गा...बद्द्कन पडते गो आपल्या बोडक्या वरती असे पाहुन रायले गा दोघे बी Lol

Pages